978-93-92374-37-1 | Mitta kalokh…Lakkha Ujed | मिट्ट काळोख … लख्ख उजेड | एक व्यसनी गर्दुल्ला ते सफल जीवन … दत्ता श्रीखंडेचा स्तिमित करणारा जीवन प्रवास | Sumedh Wadawala (Risbud) | सुमेध वडावाला ( रिसबूड ) | उजड काळोख्या वाटेवरून प्रवास करता करता प्रकाशाचे किरण दिसू लागतात काय आणि तो प्रवास एक एक अकल्पनीय वळसे घेत घेत उजेडाकडे झेपावतो काय …. लहानपणापासून दत्ता श्रीखंडेला असलेल्या व्रात्य सवयी अधिक व्रात्य संगती … त्याला जोड दुर्दैवी प्रसंगांची आणि प्रतिकूल परिस्थितीची … मग घरून पळून जाणं , कमाईसाठी लहान – सहान कामं करणं , तिथले खचवून टाकणारे अनुभव घेणं हे सर्व अपरिहार्यपणे आलंच . त्यातूनच मग दत्ता अवैध धंद्यांतील नोकरीत गुरफटत जातो आणि नकळतपणे अधोविश्वात प्रवेश करतो . चोऱ्या , पाकीटमारीचे धंदे , दारू – गर्दच्या व्यसनांचा विळखा , जेलच्या वाऱ्या अशा न संपणाऱ्या दुर्दैवी फेऱ्यांत दत्ता अडकून जातो . काळोख्या गल्ल्यांमधून प्रवास करता करता मिट्ट काळोखाच्या हमरस्त्यावर जाऊन पोचतो … ४ … पण एके दिवशी त्याला ‘ मुक्तांगण ‘ नावाचं मोकळं पटांगण सापडतं … आणि त्याला स्वतःमधल्याच नवीन दत्ताचा शोध घेण्याची संधी मिळते . मग सुरू होतो लख्ख उजेडाकडे जाण्याचा त्याचा प्रवास ! थक्क करणारी आत्मकथा – मिट्ट काळोख … लख्ख उजेड ! | Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | आत्मचरित्र | 340 |
लोककवी साहिर लुधियानवी
जनाभिमुख काव्य, गीतं व जीवनाचा मागोवा
अक्षय मनवानी
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है…’, ‘जिन्हे ना़ज है हिंद पर वो कहाँ है…’, ‘वो सुबह कभी तो आएगी…’, `तुम न जाने किस जहाँ मे…’, `मांग के साथ तुम्हारा… , `औरत ने जनम दिया मर्दों को…, `फैली हुई है…’, `आसमाँ पे है खुदा…’, `मन रे तू काहे ना धीर धरे…’, `संसार से भागे फिरते हो…’, ‘अल्ला तेरो नाम…’, ‘अभी न जाओ छोडकर…’, यासारखी चित्रपट-गीतं असोत किंवा ‘परछाइयाँ’, ‘ताज महल’, ‘तरहे-नौ’ यांसारख्या कविता आणि ‘तल्खियाँ’, ‘आओ कि कोई ख्वाब बुनें’ यांसारखे कवितासंग्रह असोत, साहिर आपल्या कवितांमधून गीतांचं सर्जन करत राहिले आणि आपल्या गीतांमधून कवितांची प्रतिभा प्रसवत राहिले. कधी त्यांनी सामाजिक वास्तवावर कठोर भाष्य केलं, कधी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं, तर कधी स्त्री-पुरुष नातेसंबंधांमधले विविध पदर हळुवारपणे उलगडून दाखवले.
या प्रतिभासंपन्न कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या जीवननिष्ठांचा, गीत-कवितांचा आणि लेखन प्रेरणांचा सूक्ष्म वेध लेखक अक्षय मनवानी यांनी या पुस्तकात घेतला आहे. तसंच अमृता प्रीतमसह अनेकांचा साहिर यांच्यावर कसा प्रभाव पडला याचा शोधही घेतला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रेरणास्रोतांचाही वेध घेतला आहे. अनेक संबंधित व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन मनवानी यांनी विपुल संशोधन केलं आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक मिलिंद चंपानेरकर यांनी या पुस्तकाचा तितक्याच समर्थपणे मराठी अनुवाद साकारला आहे.
आपल्या काव्यप्रतिभेने रसिकांच्या मनात कायमचं घर केलेल्या एका मनस्वी कवीची ही जीवनगाथा… लोककवी साहिर लुधियानवी
Reviews
There are no reviews yet.