Reading Time: 3 Minutes (256 words)
978-93-92374-38-8 | MAJHYA DHADPADICHA KARYANAMA | माझ्या धडपडीचा कार्यनामा | उद्योग , व्यवस्थापन … लेखन , समाजकार्य . एक उद्बोधक मुशाफिरी | Anand karandikar | आनंद करंदीकर | माझ्या धडपडींचा कार्यनामा ‘ आयआयटी ‘ आणि ‘ आयआयएम ‘ सारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधून साठ – सत्तरच्या दशकांत विद्यार्थी म्हणून घडताना , एक तरूण भवतालच्या समाजाकडेही संवेदनशीलतेने बघत होता …. तर करियर घडवताना , लठ्ठ पगाराच्या विळख्यात अडकून नोकरी एके नोकरी न करता विविध क्षेत्रांत कल्पक संकल्पनांचा अवलंब करत होता … अनेक प्रयोग करत खऱ्या अर्थाने कार्यरत होता . मॅनेजमेन्ट क्षेत्रातील गुरू आणि सामाजिक चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ता अशा दोन ध्रुवांवरच्या भूमिका निभावत विधायक काम करू पाहणारा हा धडपड्या म्हणजे आनंद करंदीकर … ‘ इंडसर्च ‘ या प्रसिद्ध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या स्थापनेमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे . ‘ मेट्रिक कन्सल्टन्सी लि . ‘ ही भारतातील अव्वल दर्जाची मार्केट रिसर्च आणि कन्सल्टन्सी फर्म त्यांनी दूरदृष्टी ठेवून उभारली . या कंपनीच्या माध्यमातून शहरी , निमशहरी आणि ग्रामीण भागातील युवकांमधील कौशल्य विकसित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या . सामाजिक कामाच्या आघाडीवर ‘ युक्रांद ‘ , ‘ जनवादी महिला संघटना ‘ , ‘ लोकविज्ञान संघटना ‘ अशा संघटनांसोबत अनेक संघर्षात्मक आणि विधायक कामं त्यांनी केली . या पुस्तकात त्यांनी आपल्या अशाच अनेक धडपडींना स्वतःच्या खास शैलीत शब्दबद्ध केलं आहे . हे सर्व कार्यानुभव वाचतांना जाणवते ती त्यांची काम करण्याची तळमळ , कामाकडे बघण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन , कमालीची कल्पकता आणि अचंबित करणारा उत्साह ! एका प्रसिद्ध कवीचा मुलगा ही ओळख मागे टाकत दोन टोकांवरच्या प्रवासातील उड्या घेत केलेल्या आनंदी धडपडीचा हा प्रामाणिक लेखाजोखा … अर्थात माझ्या धडपडीचा कार्यनामा ! | Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | आत्मचरित्र | 395 |
Reviews
There are no reviews yet.