195.00

माझ्या विद्यार्थी मित्रांनो

स्व.यशवंतराव चव्हाण यांची दीक्षान्त समारंभातील भाषणे

[taxonomy_list name=”product_author” include=”456″]

मुत्सद्दी राजकारणी, विचारवंत आणि एक रसिक व्यक्तिमत्त्व म्हणून चिरपरिचित असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते देशभरातील विविध विद्यापीठांचे दीक्षान्त समारंभ संपन्न झाले. तेथे केलेल्या शिक्षणाविषयीच्या चिंतनशील भाषणांचं संपादित पुस्तक म्हणजेच – `माझ्या विद्यार्थी-मित्रांनो…’
या पुस्तकातली सगळी भाषणं यशवंतरावांनी उच्च शिक्षण देणारया विद्यापीठांमध्ये दिलेली असली, तरीही त्यात ते प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व ठळकपणे अधोरेखित करतात. शिक्षणाचा हेतू व्यक्तीचा विकास करणं एवढाच मर्यादित नसून त्यातून समाजाचाही विकास व्हायला हवा, ही त्यांची धारणा ते यात मांडतात. म्हणूनच समाजाच्या फार मोठ्या विभागाला शिक्षणाची गरज असल्याचं प्रतिपादन ते वेळोवेळी करतात, जे आजघडीलाही तितकंच लागू होतं.
शहरी व ग्रामीण शिक्षणातील तफावत, विकसित देशांसोबत जाण्यासाठी आवश्यक असणारे आधुनिक शिक्षण, उच्च शिक्षण घेतलेल्यांची समाजाप्रति असणारी जबाबदारी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांची मांडणी यशवंतराव एखाद्या कसलेल्या शिक्षणतज्ज्ञाप्रमाणे करतात. विशेष म्हणजे ही मांडणी करताना स्नातक अर्थात नव-पदवीधरांविषयी म्हणजेच देशाच्या तरुण उच्चशिक्षित पिढीविषयी त्यांना वाटणारं प्रेम आणि आशावाद त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होताना दिसतो.

978-93-82591-72-6 Paper Back 279
Share
291 978-93-82591-72-6 Majhya Vidyarthi Mitranno माझ्या विद्यार्थी मित्रांनो स्व.यशवंतराव चव्हाण यांची दीक्षान्त समारंभातील भाषणे Yashwantrao Chavan यशवंतराव चव्हाण मुत्सद्दी राजकारणी, विचारवंत आणि एक रसिक व्यक्तिमत्त्व म्हणून चिरपरिचित असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते देशभरातील विविध विद्यापीठांचे दीक्षान्त समारंभ संपन्न झाले. तेथे केलेल्या शिक्षणाविषयीच्या चिंतनशील भाषणांचं संपादित पुस्तक म्हणजेच – `माझ्या विद्यार्थी-मित्रांनो…’
या पुस्तकातली सगळी भाषणं यशवंतरावांनी उच्च शिक्षण देणारया विद्यापीठांमध्ये दिलेली असली, तरीही त्यात ते प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व ठळकपणे अधोरेखित करतात. शिक्षणाचा हेतू व्यक्तीचा विकास करणं एवढाच मर्यादित नसून त्यातून समाजाचाही विकास व्हायला हवा, ही त्यांची धारणा ते यात मांडतात. म्हणूनच समाजाच्या फार मोठ्या विभागाला शिक्षणाची गरज असल्याचं प्रतिपादन ते वेळोवेळी करतात, जे आजघडीलाही तितकंच लागू होतं.
शहरी व ग्रामीण शिक्षणातील तफावत, विकसित देशांसोबत जाण्यासाठी आवश्यक असणारे आधुनिक शिक्षण, उच्च शिक्षण घेतलेल्यांची समाजाप्रति असणारी जबाबदारी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांची मांडणी यशवंतराव एखाद्या कसलेल्या शिक्षणतज्ज्ञाप्रमाणे करतात. विशेष म्हणजे ही मांडणी करताना स्नातक अर्थात नव-पदवीधरांविषयी म्हणजेच देशाच्या तरुण उच्चशिक्षित पिढीविषयी त्यांना वाटणारं प्रेम आणि आशावाद त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होताना दिसतो.
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 279 21.6 14.1 1.5 350
This is a compilation of Hon. Yashwantrao Chavan’s
speeches given on the occasion of Convocation ceremonies at different Universities all over India. He has mainly discussed the importance of education in our lives.
Educational शैक्षणिक 195 MajhyaVidyarthiMitrano_RGB MazyaVidyarthiMitrano_BackBC.jpg
Weight 350 g
Dimensions 21.6 × 14.1 × 1.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.