17 | 978-81-86184-62-2 | Madhumeh Ani Sukhi Samruddha Jeevan | मधुमेह आणि सुखी, समृध्द जीवन | Dr. Pradeep Talwalkar | डॉ. प्रदीप तळवलकर | मधुमेहाचा प्रादुर्भाव आजकाल समाजाच्या सर्व थरांमध्ये मोठया प्रमाणात आढळतो. एकेकाळी तापदायक व्याधी वाटणार्या मधुमेहाचा मुकाबला वास्तविक सर्वांनाच सहजपणे, अगदी हसतखेळत करता येईल. परंतु त्यासाठी हवी मधुमेहाविषयी परिपूर्ण माहिती. मुंबईचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मधुमेह-तज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांनी या पुस्तकात आवश्यक अशी माहिती पध्दतशीरपणे देऊन योग्य मार्गदर्शन केले आहे. मधुमेहावर काबू मिळविण्यासाठी हे पुस्तक जणू गुरुकिल्लीच आहे. अत्याधुनिक संशोधन व प्रयोग यावर आधारित अद्ययावत माहितीचा साठा, पुस्तकाची सोपी रचना, सुलभ भाषा यामुळे हे पुस्तक मधुमेह्यांनाच नव्हे, तर त्यांच्या ‘फॅमिलीला’ आणि ‘फॅमिली डॉक्टरांनाही’ एक वरदानच वाटले. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 132 | 21.6 | 14 | 0.4 | 140 |
Living healthyly with Diabetes
|
Health | आरोग्य | 125 | Madhumeh Ani Sukhi Samruddha Jeevan.jpg | MadhumehaBC.jpg |
बहुगुणी वनौषधी
[taxonomy_list name=”product_author” include=”394″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]
अनेक वनस्पतींमध्ये (Herbs) विविध औषधी गुणधर्म असतात, शरीराची झीज भरून काढण्याची क्षमता असते. तसेच बर्याचशा आधुनिक औषधांचा मूलस्रोत वनस्पतींमध्ये असतो, हे सर्वचजण जाणतात. परंतु त्याची शास्त्रशुध्द मांडणी करणे व जनसामान्यांना
नेमकी माहिती देणे, हे कार्य निष्णात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू सातत्याने करीत आहेत. अनेक व्याधींवर वनौषधी गुणकारी कशा ठरू शकतात याबद्दलची माहिती बाखरू यांनी या पुस्तकात दिली आहे. या वनौषधी सहजपणे उपलब्ध होतात आणि काही तर आपल्या स्वयंपाकघरातच असतात. एकूण शंभरच्यावर उपयुक्त वनौषधींची माहिती या पुस्तकात आपल्याला मिळते. विविध वनस्पतींचे गुणधर्म, त्यांची शास्त्रीय माहिती, झीज भरून काढण्याची त्यांची क्षमता, या वनस्पतींची मात्रा कोणकोणत्या व्याधींवर चालू शकते; याविषयीचे विस्तृत विवेचन या पुस्तकात उपलब्ध होते. उत्तम आरोग्य राखण्यासाठी वनौषधींद्वारे नैसर्गिक उपाय सुचवणारे हे पुस्तक घराघरात पोहोचावे ही अपेक्षा.
Reviews
There are no reviews yet.