274 | 978-93-82591-67-2 | Kovalya Aai-Bababsathi | कोवळ्या आई बाबांसाठी | नवख्या पालकांसाठी आधुनिक पध्दतीचं परिपक्व बालसंगोपन | Dr. Lily Joshi | डॉ. लिली जोशी | झटपट शिक्षण…झटपट नोकरी…झटपट लग्न…आणि झटपट पोरं-बाळं! थांबा… सर्वच झटपटच्या या जमान्यात मूल होऊ देण्याचा निर्णय मात्र असा झटपट नाही हं घेतला जात. आजची तरुण पिढी विचारपूर्वक आणि सजगपणे पालकत्वाचा निर्णय घेताना दिसते. मात्र माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात माहितीचं ज्ञान कितीही पालथं घातलं तरी अनुभव तर पहिलाच असतो ना? म्हणूनच आजच्या कोवळया आणि नवख्या आई-बाबांसाठी डॉ. लिली जोशी यांचं हे पुस्तक म्हणजे हसत खेळत मार्गदर्शन करणारा आणि पालकत्वाच्या जबाबदारीची ओढ निर्माण करणारा एक आनंददायी अनुभवच आहे. आजकालच्या प्रेग्नन्सीचे वेगवेगळे फंडे, प्रसूतीचे विविध प्रकार, आईच्या दुधाचं महत्त्व, बाळाची झोप-अंघोळ, त्याचे कपडे, त्याचा आहार, त्याचे ताई-दादा, बाळाच्या संगोपनामधला बाबांचा सहभाग, बाळाचं पाळणाघर, दत्तक घेतलेल्या मुलाचं संगोपन…अशा बाळाशी निगडित सर्व कळीच्या मुद्दयांवर लेखिकेने सहज सुंदर मार्गदर्शन केलं आहे. या पुस्तकात पारंपरिक चाली-रीती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांची सुंदर सांगड घातलेली आपल्याला दिसेल. … नवरा-बायकोच्या नात्यातून आई-बाबांच्या भूमिकेत पदार्पण करणार्या सर्व कोवळया आई-बाबांसाठी! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 144 | 21.5 | 13.9 | 0.8 | 180 |
Dr. Lily Joshi is a well known and experienced practitioner. This book is a guide book to all married couples who are expecting child or for those who have become ‘parents’! She has dealt with all the critical issues related to new born baby. She deals with the medical, psychological & social factors. In this book she has discussed different types of delivaries, importance of breast feeding, baby’s sleep and bath, nutritional food for babies, role of grandparents & cresh etc.
|
Parenting | पालकत्व | 125 | Kovalya AaiBabansathi | Kovalya Aai BabansathiBC.jpg |
सुजाण संगोपन
उमलणार्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी…
[taxonomy_list name=”product_author” include=”356″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]
मुलांच्या उत्तम संगोपनासाठी तुम्ही ‘आदर्श’ पालक आहात का? ‘पालकत्वाचा’ अनुभव घेणाऱ्या जोडप्यांना मुलांच्या संगोपनाची कोणतीच पूर्वतयारी, प्रशिक्षण आणि अनुभव नसतो. त्यांना आपल्या क्षमतेविषयी बऱ्याच शंका वाटू लागतात आणि प्रश्नही पडतात. मूल जन्मल्यापासून ते पौगंडावस्थेत येईपर्यंत ‘पालकत्वाची’ ही मोठी जबाबदारी पेलण्यासाठी प्रत्यक्ष उपाय सांगणारं, विविध शंकांचं निरसन करणारं हे पुस्तक सर्वच पालकांना उपयुक्त वातेल. या पुस्तकात… ० तुम्ही तुमच्या मुलांचे प्रभावी गुरू कसे व्हाल? ० स्वत:बरोबरच तुमच्या मुलांची स्वभाववैशिष्ट्यं कशी जाणून घ्याल? ० तुमच्या मुलांचं व्यक्तिमत्व कसं जोपासाल, कसं फुलवाल? ० मुलांना चांगल्या सवयी कशा लावाल? ० मुलांना मोकळेपणाने बोलतं कसं कराल? ० मुलांचा हट्टी आणि तापट स्वभाव कसा हाताळाल? ० मुलांचे नैतिक आणि चारित्र्यशील संगोपन कसं कराल? ० मुलांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण कराल? अशा विविध पैलूंची चर्चा करून मार्गदर्शन करणारं पुस्तक… सुजाण संगोपन!
Reviews
There are no reviews yet.