343 | 978-93-86493-23-1 | Khara Sangaycha Tar… | खरं सांगायचं तर… | AN UNSUITABLE BOY (मराठी अनुवाद) | Karan Johar | करण जोहर | Neeta Kulkarni | नीता कुलकर्णी | खरं सांगायचं तर…मी करण जोहरचे चित्रपट फार कधी फॉलो केले नाहीत. दुसरं असं की, या पूर्वी चित्रपटविषयक जी पुस्तकं मी प्रकाशनासाठी निवडली त्याचे विषय होते – ‘लिजेंड’ म्हणता येतील असे कलाकार…गुरुदत्त, एस.डी.बर्मन, साहिर लुधियानवी, वहिदा रहेमान…!
अशा पार्श्वभूमीवर करणचं पुस्तक माझ्या निवडीत कसं काय बसलं? करणचे चित्रपट मला आकर्षित करत नव्हते, मात्र ‘कॉफी विथ करण’ त्याच्याविषयीचं कुतूहल मनात निर्माण करत होतं. स्टार अॅक्टर्स घेऊन ‘कॉफी’चे एपिसोड्स धीटपणे कन्डक्ट करण्याची हातोटी, हजरजबाबीपणा, नर्मविनोदी शैली असे त्याच्यातील गुण त्याच्या तल्लख बुद्धीची चुणूक दाखवत होते. म्हणूनच नंतर ‘AN UNSUITABLE BOY’ हे त्याचं आत्मचरित्र उत्सुकतेने वाचलं आणि मला असं जाणवलं की, करण प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो. त्याच्याकडे स्वत:चे विचार आहेत, ते स्पष्टपणे मांडण्याएवढा धीटपणा आहे, मोकळेपणा आहे, स्वत:कडे तो पारदर्शीपणे पाहू शकतो, आपल्या खासगी जीवनाविषयीही तो खुलेपणे बोलू शकतो. हातून घडलेल्या चुका तो प्रांजळपणे शेअर करतो. जीवनात नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व देणा-या करणच्या जीवनविषयक काही स्वत:च्या व्याख्या आहेत…आपल्या दिग्दर्शक ते निर्माता या प्रवासाचा आढावा तो घेतो, पण त्रयस्थपणे. बहुतेक आत्मचरित्रात यशापयशाचेच पाढे वाचलेले असतात. मात्र या आत्मकथनाचा मुख्य सूर ‘खरं सांगायचं तर…’ अशा रोखठोक स्वरूपाचा आहे… आणि म्हणूनच या पुस्तकाचे प्रयोजन! ———- “पूर्वी मी यशाला फार महत्त्व द्यायचो. आता वाटतं, एखादा सिनेमा पडला तर पडला. पुढचा चालेल. “माझे सिनेमे तुम्हाला आवडले नाहीत तर त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नसतं. तुम्हाला माझं काम आवडलंच पाहिजे किंवा मी तुम्हाला आवडलोच पाहिजे, असं माझं अजिबात म्हणणं नाही.” “रोज सकाळी माझ्या ऑफिसमध्ये अत्यंत उत्साहाने आणि एनर्जीने मी जातो. एकापाठोपाठ एक अविरत काम करण्याची माझी उमेद असते. मी आयुष्य नावाच्या ट्रेडमिलवर सतत धावतो आहे. त्याचे गिअर्स माझ्या डोक्यात आहेत, तर लिव्हर्स माझ्या हातात आहेत.” “मी जाणीवपूर्वक काही गोष्टी आत्मसात केल्या. मला सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहायचं होतं. मला सर्वांपासून वेगळा राहणारा, लांब राहणारा चित्रपट दिग्दर्शक-निर्माता बनायचं नव्हतं. मला `सोशलाईट’ दिग्दर्शक बनायचं होतं.” “मला जे मैदानात खेळांमध्ये करता आलं नाही त्याची कसर मी स्टेज गाजवून पुरेपूर भरून काढली. मी स्पर्धांमधला सर्वोत्तम वक्ता बनलो.” “आज मागे वळून पाहिलं आणि आयुष्याला निश्चित वळण देणा-या घटना कोणत्या असा विचार केला तर मी बोर्डींग स्कूलमधून परत येणं, माझ्या आईने त्यावरून मला खणखणीतपणे सुनावलेले चार शब्द आणि स्पर्धेत पटकावलेला तो पहिलावहिला पुरस्काराचा कप या तीन गोष्टी सांगाव्या लागतील.” “मी जसा आहे त्याच्याही पलीकडे सभ्यपणा आणि माणुसकी या दोन महत्त्वाच्या गोष्टी माझ्याजवळ आहेत. त्यामुळे मी आता लोकांच्या बोलण्याकडे काही लक्ष देत नाही.” “व्यभिचार हे आयुष्यातलं वास्तव आहे. ज्यामध्ये, व्यभिचाराला संधी होती पण ते अजिबात बळी पडले नाहीत, असं एक लग्न, एक वैवाहिक नातं मला दाखवावं.” |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 228 | 21.6 | 14 | 1.1 | 320 | Autobiography of Karan Johar. Marathi translation of the bestseller ‘An Unsuitable Boy’. | व्यक्तिरंग | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | Cinema – Music | चित्रपट – संगीत | 250 | KharaSangaychaTarKaranJohar | KharaSangaychaTarBC.jpg |
कृष्णाकांठ
यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र
[taxonomy_list name=”product_author” include=”456″]
गेल्या ४० वर्षांत राज्य विधानसभेची धरून, दहा निवडणुका मी लढवल्या. कधी चुरशीच्या, कधी थोडया मतांनी, कधी लाख मतांनी, तर कधी बिनविरोध अशा सर्व निवडणुका मी जिंकल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीतील अनुभव वेगळा, राजकीय कसोटया वेगळ्या, त्यावेळचे विरोधी राजकीय पक्षही वेगळे, अशा होत्या. पण १९४६ सारखी सर्वमान्य निवडणूक कधीच झाली नाही. ही आणि नाशिकची पार्लमेंटची निवडणूक सोडली, तर माझ्या सर्व निवडणुका मोठया वादळी होत्या. प्रतिपक्षांनी आपापल्या मुलुखमैदानी तोफा डागल्या होत्या. अभद्र आणि कटुतेच्या प्रचाराचा त्यांनी कळस केला. या सर्व निवडणुकांत माझा सर्वात मोठा प्रचारक माझा मीच असे. संभाषणशैलीतील मनमिळाऊ, सुसंस्कृत, तत्त्वनिष्ठ आणि प्रांजळ प्रचार ही माझी मोठी शक्ती आहे, असे माझ्या लक्षात आले; आणि या सर्व वादळात जनतेच्या आशीर्वादाने व माझ्या कार्यकर्त्या मित्रांच्या संघटित सहकार्याने मी अपराजित ठरलो. लोकशाहीच्या राजकारणात याच्यापेक्षा अधिक काय अपेक्षा करायची!
Autobiography Of First Chief Minister Of Maharashtra Yashwantrao Chavan Quote : “In The Past Forty Years, Including The Ones Of The Assembly, I Have Fought Ten Elections. I Have Won All Of Them. At Times With A Huge Margin, At Times, With A Narrow One, Sometimes Amidst Intense Competition And At Times Unopposed. Every Election Was A Different Experience, Every Time The Political Criteria Were Different, Every Time The Political Parties In Opposition Were Different. But There Was No Other Election Like The One In 1946, Which Was Based On Total Consensus. With The Exception Of This One And The Parliament Election Of Nasik, All Of Them Were Stormy. The Rivals, At Times, Went All Out To Attack Me And Plumbed New Depths Of Indecency And Bitterness. I Was My Own Chief Campaigner In All Those Elections. I Realized That My Biggest Strength Was A Friendly, Cultured, Principled And Candid Dialogue With The Voters. I Remained Undefeated In The Entire Storm With The Blessings Of The People And The Support Of My Friends. What More Can One Desire In The Politics Of A Democracy?
Reviews
There are no reviews yet.