410 | 978-93-86493-83-5 | Kesanchi Karamat | केसांची करामत | वाचा जाणा करा संच | Kavita Mahajan | कविता महाजन | आजीच्या मते,
“अठरा डब्यांच्या ट्रेन इकडून तिकडे जात असतात ना, तशा मैत्रेयीच्या मेंदूतून प्रत्येक बाबतीत अठराशे प्रश्नांच्या ट्रेन फिरत असतात !” मैत्रेयीचे आजचे प्रश्न होते केसांबद्दलचे ! मैत्रेयीचे केस छोटे होते, पण तिला लांब वेणी घालायला आवडत असे. आईचे केस तर कापलेले होते. आजी तिच्या केसांचा आंबाडा घाले आणि तिच्याकडे तिच्या आजीने दिलेलं आंबाड्यावर लावायचं सोन्याचं फूलही होतं. आजोबांचे केस गायब होऊन टक्कल पडलेलं होतं. मैत्रेयीच्या घरी एके दिवशी बाबाची मैत्रीण सुकेशा आली. तिचे केस पायांच्या घोट्यापर्यंत लांब होते. तिची वेणी घालून देताना आजीला चांगलीच अद्दल घडली! |
paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 28 | 22 | 15 | 0.2 | 30 | Children | बालसाहित्य | 50 | KesanchiKaramat | KesBC.jpg |
नकटीचं नाक
वाचा जाणा करा संच
कविता महाजन
सगळी मुलं मैत्रेयीला नकटी-नकटी म्हणून चिडवायला लागली
आणि चिडून-रडून मैत्रेयीचं नाक रागाने लाल झालं.
तिने घरात येताच जाहीर केलं, “मला हे नाकच नको आहे!”
आई म्हणाली, “बरं. नको तर नको. कापून टाकूयात.”
मैत्रेयीला प्रश्न पडले : माणसाचं नाक असं कापून टाकता येतं का?
नाक नसलेला माणूस कसा दिसेल?
मुळात आपल्याला नाक असतंच कशासाठी?
जर नाकच नसतं, तर आजी म्हणते तसे
नाकाने कांदे सोलता आले नसते.
आजीला इतक्या म्हणी माहीत कशा असतात?
बाकीच्या प्राण्यांची-पक्ष्यांची नाकं कशी असतात?
Reviews
There are no reviews yet.