Reading Time: 3 Minutes (264 words)
294 | 978-93-82591-91-7 | Karamat Dhagya-Doryanchi | करामत धाग्या-दोऱ्यांशी | वस्त्रांच्या रंगीबेरंगी दुनियेचा बहुपदरी मागोवा व त्यातील विज्ञान | Dr. Varsha Joshi | डॉ. वर्षा जोशी | वस्त्र ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक ! वस्त्रांचा वापर आपण शरीर-संरक्षणाबरोबरच आपलं व्यक्तिमत्त्व अधिक खुलवण्यासाठी, आणि इतरांवर प्रभाव पाडण्यासाठीही करतो. आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेली ही वस्त्रं नेमकी कशी बनतात, याचे ‘धागे-दोरे’ या पुस्तकात विख्यात पदार्थविज्ञानतज्ज्ञ डॉ. वर्षा जोशी यांनी रंजकपणे उलगडून दाखवले आहेत.
कोणत्या मोसमात कोणती वस्त्रं वापरायची, हे ते वस्त्र ज्या धाग्यांपासून तयार होतं त्यांच्या गुणधर्मावर अवलंबून असतं. हे गुणधर्म कोणते, त्या धाग्यांची रचना कशी असते, त्यापासून वस्त्रं कशी विणली जातात, ती कशी रंगवली जातात, त्यावर छपाई कशी केली जाते, कोणत्या प्रक्रिया होतात, आदी अनेक गोष्टींची रंजक माहिती या पुस्तकात सहजसोप्या भाषेत देण्यात आली आहे. ई-टेक्स्टाइलसारख्या आधुनिक काळातल्या चलाखतंतूंचा म्हणजेच ‘स्मार्ट फायबर्स’ चाही अंतर्भाव यात करण्यात आला आहे. तसंच समृद्ध अशा भारतीय वस्त्रपरंपरेचा वेधक मागोवाही घेण्यात आला आहे. याशिवाय निरनिराळ्या वस्त्रांची निगा कशी राखावी, अशा उपयुक्त माहितीचाही पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 216 | 21.6 | 15.3 | 1.2 | 310 |
This book about different types of fibres, threads and fabrics, covers topics such as weaving processes, printing on fabrics, colouring processes as well as the traditional Indian fabrics like Bandhani etc. It also includes chapters on modern day fibres like e-textile or smart fibres. Author Dr. Varsha Joshi unfolds the history of various types of clothes and also gives interesting info about the science behind these processes of making fabrics.
|
Informative | माहितीपर | Science | विज्ञान | 250 | Karamat Dhagya Doryanchi_front | Karamat Dhagya DoryanchiBC.jpg |
Reviews
There are no reviews yet.