363 | 978-93-86493-49-1 | Kalekarde Strokes | काळेकरडे स्ट्रोक्स | Pranav Sakhdeo | प्रणव सखदेव | उदास पोकळी… की पोकळीतच उदासी राहते भरून? समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी? का वागतोय तो असा? ‘इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस’सारखा कधी झपाटला जातोय… कधी ‘पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा’ गुढाकडे ओढला जातोय… कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन कवितांमधून व्यक्त होत जातोय…आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते. या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात. मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ! खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही!कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या क्यानव्हासवरचे… समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड काळेकरडे स्ट्रोक्स ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 300 | 21.5 | 13.9 | 1.3 | 280 | मोहर | Fiction | कथा-कादंबरी | 199 | KalekardeCoverFinal_91018 | Kalekarde strokesBC.jpg |
व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग ३
साळिंदराचा काटा आणि इतर ३ कथा
शरदिन्दु बंद्योपाध्याय
अनुवाद : सुनिता जैन
दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!
Reviews
There are no reviews yet.