374 | 978-93-86493-59-0 | Japuyat Niragas Baalpan | जपूयात निरागस बालपण | बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय | Dr. Minakshi Nalbale-Bhosle | डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले | आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या लहानग्याचं बालपण जपणं खरोखर एक आव्हान झालं आहे. वाढता चंगळवाद, बदललेली जीवनशैली, परिसीमा गाठणाऱ्या मनोविकृती यांमुळे लैंगिक शोषणाच्या अनेक भीतीदायक केसेस शहरी आणि ग्रामीण भागात घडताना दिसत आहेत. ससून हॉस्पिटलमध्ये बालशल्यविशारद म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मीनाक्षी भोसले यांनी बाललैंगिक शोषणाच्या अनेक गंभीर केसेस हाताळल्या आहेत. मुलांवरील अत्याचारांचं वाढतं प्रमाण पाहून अशा दुर्घटना रोखण्याची गरज या संवेदनशील डॉक्टरला वाटली. शरीरावरच्या जखमा बNया करता करता समुपदेशनाद्वारे, पुस्तिकेद्वारे, प्रबोधनात्मक कार्यक्रमांद्वारे डॉ. मीनाक्षी आज हा गंभीर प्रश्न घेऊन पालकांपर्र्यंत, एकंदर समाजापर्र्यंत पोहोचू पाहत आहेत. हे पुस्तकही या उपक्रमाचा भाग आहे. पुस्तकातील चार विभागांतून या प्रश्नाची पूर्ण व्याप्ती दिसून येईल… 1. अत्याचाराचे प्रकार 2. काही गंभीर सामाजिक समस्या व रूढी 3. अत्याचार होऊ नयेत म्हणून.. आणि 4. अत्याचाराची घटना घडल्यानंतर… आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला तोंड द्यावं लागू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सांगणारं…जपूयात निरागस बालपण |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 88 | 21.4 | 14 | 0.6 | 110 | समाजरंग | Social | सामाजिक | 100 | JapuyatNiragasBalpan | Japuyat Niragas BalpanBC.jpg |
होरपळ
ल.सि. जाधव
सोलापूर येथील मातंग वस्तीत ल.सि. जाधव यांचं बालपण गेलं. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी पदव्युत्तर पातळीवरचं शिक्षण घेतलं आणि भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. ‘होरपळ’ या आपल्या आत्मकथनात त्यांनी मातंग समाजाचे व्यावसायिक व सामाजिक जीवन, त्यांच्या अंधश्रद्धा व त्यांचे दैन्य, अत्यंत अभावग्रस्त स्थितीतही माणुसकी जपण्याची त्यांची धडपड या सगळ्यांचे पूर्वग्रहरहित दृष्टीने तसेच सहृदयतेने चित्रण केले आहे. निसर्गातील विविधतेचा ते तरल संवेदनशीलतेने अनुभव घेतात, हे त्यांचं असाधारण वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हीच संवेदनशीलता ते समाजातील घटना अथवा व्यक्तिजीवनातील दारुणता चित्रित करतानाही प्रकट करतात. त्यांची व्यापक जीवनदृष्टी, सामाजिकतेची प्रगल्भ समज, प्रसंग वा भावस्थितीचे प्रत्ययकारी चित्रण करण्याचं त्यांचं सामर्थ्य, प्रसादपूर्ण ओघवती भाषाशैली आणि निसर्गाचा अनुभव घेणारी तरल संवेदनशीलता या साऱ्या गुणांमुळे हे आत्मकथन केवळ दलित आत्मकथनातच नव्हे, तर एकंदरीतच मराठी आत्मकथनपर वाङ्मयात मोलाची भर घालणारं आहे.
साहित्यकृतीचा आल्हाददायक अनुभव देणारं तसेच वाचकांच्या सामाजिक जाणिवा समृद्ध करणारं आत्मकथन होरपळ…
Reviews
There are no reviews yet.