₹2,190.00 ₹1,699.00
अय्यंगार योग संच
बेल्लूर कृष्णमाचारी सुंदरराजन अय्यंगार अर्थात, जगविख्यात योगगुरू बी.के.एस. अय्यंगार यांनी 'अय्यंगार योग’ ही योगशास्त्रामधील एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धती विकसित केली. 'योग’ हा आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे, असा नवा विचार रुजवण्यात आणि भारताबरोबर संपूर्ण जगभर योगविद्या लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अय्यंगारांचा जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी कर्नाटकमधील बेल्लूर येथे झाला. योगशास्त्राचं सुरुवातीचं शिक्षण त्यांनी त्यांच्या मेहुण्यांकडून म्हैसूर येथे घेतलं. १९३७मध्ये योगशास्त्राचा प्रचार करण्यासाठी पुण्यात वास्तव्यास आल्यानंतर ते योग शिकवू लागले. जगभरातल्या अनेक नामांकित व प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्याकडून योगाभ्यासाचे धडे घेतले आहेत. १९ जानेवारी १९७५ रोजी त्यांनी ‘राममणी अय्यंगार मेमोरिअल योग इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. येथे जनसामान्यांना योगासनाचे धडे दिले जातात. त्याचप्रमाणे हे एक महत्त्वाचं योगविद्या संशोधन केंद्रही आहे. अनेक देशी परदेशी विद्यार्थी इथे योगसाधनेसाठी येतात. संपूर्ण जीवन योगविद्येसाठी वाहून घेतलेल्या या योगतपस्व्याचा २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी मृत्यू झाला.
गीता अय्यंगार यांना योगशास्त्राचा मौल्यवान वारसा, त्यांचे वडील विश्वविख्यात योगतज्ज्ञ श्री. बी. के. एस. अय्यंगार यांच्याकडून मिळाला. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार हे आपल्या विशाल योगतत्त्वज्ञानाच्या कलात्मक आविष्कारासाठी सर्वश्रुत आहेत.
गीता अय्यंगार यांचा योगाभ्यासाचा प्रारंभ बालपणापासूनच झाला. १९६२ पासून त्या ‘योग’ हा विषय शिकवत आहेत. त्या ‘तत्त्वज्ञान’ व ‘आयुर्वेद’ या विषयातील पदवीधर आहेत. त्यांच्या योगविषयक ज्ञानाला मिळालेल्या वैद्यकीय ज्ञानाच्या जोडीमुळे, त्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण मार्गदर्शन करू शकतात. ‘रमामणि अय्यंगार मेमोरियल इन्स्टिट्युट’च्या त्या एक चालक होत्या. गीता अय्यंगार यांनी योगविषयाच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी भारतात आणि विदेशात सर्वदूर प्रवास केलेला आहे. त्यांची या विषयावरील पुस्तकंही जगन्मान्य आहेत. या क्षेत्रात ज्या काही फार थोड्या स्त्रिया काम करू शकल्या त्या ‘योगशास्त्र’ विषयासंदर्भात त्यांचे नाव अतिशय आदराने व मानाने घेतलं जातं.
त्यांच्या ‘स्त्रियांसाठी योग-एक वरदान’ या पुस्तकाच्या मूळ इंग्रजी आवृत्तीचे, या पूर्वी युरोपातील सहा विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. स्वत: एक स्त्री असल्यामुळे स्त्रियांच्या आयुष्यातील अडीअडचणी, आव्हानं, शारीरिक व मानसिक चढउतार हे त्या उत्तमरीत्या जाणू शकतात. स्त्रियांविषयी आंतरिक तळमळ असल्यामुळेच त्यांनी हे पुस्तक अतिशय तपशिलात लिहिलं आहे.
संचातील ७ पुस्तकं
१) योगदीपिका – जगभरातील ४० भाषांमध्ये अनुवादित झालेलं योगाचार्य अय्यंगार यांचं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं पुस्तक LIGHT ON YOGA चा मराठी अनुवाद
२) आरोग्य-योग – आसन-प्राणायाम, धारणा-ध्यान
३) योग सर्वांसाठी – शरीर-व्याधी व ताणतणावांवर उपचार
४) योग एक कल्पतरू – योगसाधनेसाठी प्रेरणा देणारे आणि योगासनांचे महत्त्व पटवून ती आत्मसात करण्याचा सहज सुलभ मार्ग
५) पातंजल योगसुत्र – महर्षी पतंजली रचित योगसूत्रांची प्रारंभिक ओळख
६) योगाचार्य – बी.के.एस. अय्यंगार यांचं चरित्र
७) स्त्रीयांसाठी योग – स्त्रियांना जीवनातील प्रत्येक टप्प्यात साथ देणारा असा योगमार्ग …त्यासाठी सर्वांगीण मार्गदर्शन
रु. २१९० ची पुस्तकं सवलतीत रु. १६९९ मध्ये (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!
Reviews
There are no reviews yet.