352 | 978-93-86493-32-3 | Harawalele Snehbandh | हरवलेले स्नेहबंध | Narendra Chapalgaonkar | नरेंद्र चपळगावकर | परस्परांच्या वैचारिक आकर्षणामुळे आणि आदरामुळे दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये एक बंध निर्माण होतो. हळूहळू त्याचं स्निग्ध स्नेहात रूपांतर होतं. पण काळाच्या पंजातून कोणीच सुटत नाही हे समजल्यावर मागे उरतं ते एक कोरडं व ठोक सत्य – मनुष्यप्राणी मर्त्य आहे! तरी या स्नेहबंधांच्या स्मृती जिवंत राहतातच. एकीकडे या स्मृतींचा ओलावा डोळ्यांत हलकेच पाणी आणतो, तर दुसरीकडे या स्मृतींच्या उजेडाने जीवन संपन्न झाल्याची जाणीवही समाधान देत राहते. ज्येष्ठ लेखक नरेंद्र चपळगावकर यांनी लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. पु. भागवत, बा. भ. बोरकर, य. दि. फडके, न. र. फाटक, ग. प्र. प्रधान, अरुण टिकेकर, विंदा करंदीकर, नरसिंह राव, पी. सी. अलेक्झांडर, मंगेश पाडगावकर, शांताबाई किर्लोस्कर यांसारख्या जनमानसावर ठसा उमटवणाऱ्या काही प्रतिभावंतांच्या स्मृतींना उजाळा देणारे स्मरणलेख या संग्रहात समाविष्ट केले आहेत. या लेखांची शैली अनलंकृत, तरीही लालित्यपूर्ण असून त्यांतून या व्यक्तींचा सहवास लाभलेल्या चपळगावकरांनी मौलिक अनुभवकथन केलं आहे. लेखांमधल्या स्मृतींच्या हिरव्याकंच पानांखालून ही माणसं आपल्याला सोडून गेल्याच्या जाणिवेचा एक दुखरा झराही सतत वाहत राहतो. अनुभव समृद्ध करता करता कातर करणारा स्मरणलेखांचा संग्रह…‘हरवलेले स्नेहबंध’! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 144 | 21.6 | 14.2 | 0.9 | 180 | Memoirs of well known High Court Judge Narendra Chapalgaonkar. He has written heartfully about many great personalities in Maharashtra | मोहर | Literature | 160 | HarvleleSnehabandh | HarvleleSnehabandhBC.jpg |
दीड दमडी : अ-राजकीय
श्रीकांत बोजेवार
मनमोहन सिंग यांच्या काळातला ‘कोळसा-घोटाळा’ असो, की मोदींच्या जनधन-योजना, स्वच्छता मोहिमा, परदेशवाऱ्या असोत, किंवा संघाची खिल्ली
उडवणाऱ्या शरद पवार यांची भाजपशी अधूनमधून केलेली सलगी असो… गणेशोत्सवाचं बदलणारं स्वरूप असो की संजय दत्तला कारावासात मिळणाऱ्या
सवलती असोत… तंबी दुराई त्याचा तिरकस नजरेचा चष्मा लावणारचं ! मग त्याचा तल्लख मेंदू कामाला लागणार आणि त्या चष्म्यातून अशा प्रसंगांतील
विसंगती हुडकून काढणार. त्या विसंगतींवर बुद्धिनिष्ठ विनोदाचं आवरण चढवून आपल्यापर्यंत त्या ‘दीड-दमडी’तून पोचवणार !
या दीड-दमडीत कल्पनाविलासाचं माध्यम विविधप्रकारे वापरलं जातं… काल्पनिक प्रसंग निर्माण करून त्यात विनोदनिर्मितीची अजोड ताकद असलेल्या
संवादांची चपखल पेरणी होते, विविध भाषा, विविध बोली दावणीला बांधल्या जातात, तर कधी काव्य-अभंग-ओवी-वग असे साहित्यप्रकार ढंगदारपणे पेश होतात, तर कधी ‘पत्र-व्यवहारा’तून तिरकस बाण सोडले जातात. तंबी दुराईचं ‘मोनोटनी’शी वावडं असल्यामुळे तो विविध प्रयोग करतो…एकाचएक शैलीत अडकत नाही.
राजकारण, समाजकारण, साहित्य-संस्कृती क्षेत्रांत घडणाऱ्या प्रसंगांतील विसंगतींना उघडं पाडत नकळतपणे उपरोधिक भाष्य करायचं आणि तेही उच्च दर्जाची विनोदनिर्मिती साधून… ही या तंबी दुराईची खासियत !
हे लिखाण हसवत हसवत अंतर्मुख कधी करतं, विचारप्रवृत्त कधी करतं, नव्या जाणीवा कधी करून देतं हे कळतही नाही आणि म्हणूनच ही आहे रंजन करणारी, प्रबोधन करणारी आणि त्यासोबत बौद्धिक आनंद देणारी… अर्थात श्रीमंत करणारी दीड-दमडी!
Reviews
There are no reviews yet.