9 | 978-81-86184-26-4 | Gunakari Aahar | गुणकारी आहार | उत्तम आरोग्याचा नैसर्गिक मार्ग | Hari Krushna Bakhru | हरी कृष्ण बाखरू | Dr. Arun Mande | डॉ. अरुण मांडे | फळे, भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, सुकामेवा व इतर अन्नपदार्थात अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात. परंतु एखाद्या जादूसारखे परिणाम करणारे त्यातील जे सुप्त गुण ते आपल्याला कुठे माहीत असतात? सुप्रसिध्द निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. हरी कृष्ण बाखरू यांनी सखोल अभ्यास करून ही माहिती तपशीलवार व सामान्यजनांना सहज उपयोगी पडेल अशा पध्दतीने या पुस्तकात दिली आहे. प्रत्येक अन्नपदार्थाची सर्वसाधारण शास्त्रीय माहिती, त्यातील अन्नमूल्ये, त्याचे औषधी गुणधर्म आणि मुख्यत: हे अन्नपदार्थ कोणकोणत्या आजारावर उपयुक्त आहेत व त्यासाठी त्यांचा वापर कसा करावा; या सर्वांबाबतची परिपूर्ण माहिती या पुस्तकात आहे. उत्तम आरोग्यासाठीच्या या नैसर्गिक मार्गाची काही उदाहरणे पहा – संधिवातावर : केळे, काकडी, लसूण, टोमॅटो, उडीद दम्यावर : बेलफळ, अंजीर, द्राक्ष, आवळा, संत्र, दुधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा, लसूण, आले, पुदिना, नारळ, करडईच्या बिया, मध मधुमेहावर : पपनस, आवळा, जांभूळ, आंब्याची पाने, कार्ले, मेथी, लेटयूस, सोयाबीन, टॉमेटो, हरभरे, भुईमूग पित्तावर : पपनस, बटाटे, भात, खोबरे, मध, ऊस उच्च रक्तदाबावर : भात, लसूण, लिंबू, सफरचंद लठ्ठपणावर : लिंबू, कोबी, टोमॅटो, भुईमूग |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 208 | 21.6 | 14 | 1 | 200 | Healthy Diet | Health | आरोग्य | 140 | Gunakari Aahar.jpg | GunkariaaharBC.jpg |
वयावर मात
मनाला व शरीराला ताजेतवाने करुन जोम, उत्साह, कार्यशक्ती वाढण्यासाठी सर्वांगीण मार्गदर्शन
[taxonomy_list name=”product_author” include=”372″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]
वय जसे वाढणार, तशी शरीराची झीजही होणार. या वास्तवाची योग्य दखल न घेतल्यास ही झीज शरीर अनेक प्रकारे ‘बोलू’ लागते…
…मेंदू, विविध अवयव व शरीराचे कार्य मंदावते. मनाला व शरीराला शिथिलता येत जाते. कार्यतत्परता, जोम, उत्साह कमी होत जातो. विविध व्याधी जडतात. मात्र आपण आपल्यासाठी जर थोडा वेळ काढला तर ही हानी थांबवून शरीराला नवा जोम देऊ शकाल.
हे पुस्तक या वास्तवाचे भान देऊन नवा जोम, उत्साह व शक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञान व माहिती देते. परिणामी तुम्हाला तुमचे वय थोपवून तर धरता येतेच, पण काही अंशी मागेही नेता येते.
मानवी शरीरामध्येच स्वत:ला सतत तरुण ठेवण्याची आणि रोग बरे करण्याची नैसर्गिक क्षमता असते. फक्त त्याला पोषक वातावरण हवे. हे पोषक वातावरण कसे तयार करायचे ते या पुस्तकात दिले आहे. प्राचीन योगशास्त्र आणि आधुनिक विज्ञान यांचा अनोखा संगम या पुस्तकामध्ये आहे.
पुस्तकातील सूचना व मार्गदर्शन यामुळे तुम्ही तरुण दिसाल तसेच तुमची जैविक शक्तीही आश्चर्यकारकपणे वाढेल.
ठळक वैशिष्ट्ये –
१. नवतारुण्य देणारे अत्यंत प्रभावी व्यायाम
२. तीन अत्यंत परिणामकारक प्राणायाम
३. नवतारुण्यदायक पोषक आहार
४. कामशक्ती वाढवण्याचे प्रभावी उपाय
५. बौद्धिक शक्ती वाढवण्याचे उपाय
६. संपूर्ण तंदुरुस्तीचे उपाय
७. चेहर्याची काळजी घेण्याचे उपाय
८. दैनंदिन उपयोगातील इतर मौल्यवान माहिती
Reviews
There are no reviews yet.