219 | 978-93-82591-01-6 | Fitness Mantra Teenagerssathi | फिटनेस मंत्र टीनेजर्ससाठी | Namita Jain | नमिता जैन | Dr. Arun Mande | डॉ. अरुण मांडे | फिट रहायला आणि आकर्षक दिसायला कुणाला आवडत नाही? कॉलेजमध्ये मित्र-मैत्रीणींसोबत लेटेस्ट फॅशनचे कपडे घालायला तर तुम्हाला विशेष आवडत असेल. पण जर शरीराने तुम्ही फिट नसाल तर…? निराश होऊ नका! नमिता जैन या विख्यात फिटनेस गुरू खास तुम्हा तरुणांसाठी या पुस्तकाव्दारे एक अनोखा ‘फिटनेस मंत्र’ देत आहेत. या मंत्रामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होईल, तुम्हाला चांगल्या आहाराची सवय लागेल, व्यायामाची गोडी लागेल व मानसिक संतुलनही लाभेल. लठ्ठपणाशी फाईट कशी द्यावी? स्टॅमिना कसा वाढवावा? टीनएज समस्यांना तोंड कसं द्यावं? अशा समस्यांचं उत्कृष्ट मार्गदर्शनही त्यांनी या पुस्तकात केलं आहे. उत्तम आरोग्य, नितळ त्वचा आणि आकर्षक फिगरसाठी प्रभावी ‘फिटनेस मंत्र’ टीनएजर्ससाठी!’हे पुस्तक म्हणजे तरुणांसाठी एक खजिनाच आहे. जितकं तुम्ही वाचाल, तितकी त्याची उपयुक्तता तुम्हाला पटेल. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती याचा प्रत्यय देणारं पुस्तक…’ -सायना नेहवाल’या पुस्तकातला फिटनेस मंत्र अमलात आणा, त्यामुळे तुम्हाला हवा तसा मस्त आकार शरीराला देता येईल. माझ्यावर विश्वास ठेवा हा मंत्र खरोखरच जादुई आहे.’ -दीपिका पदुकोण |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 198 | 21.6 | 14 | 0.9 | 210 |
Who doesn’t want to look good? And what if you could also learn the secret to a healthy lifestyle? This indispensable handbook tells you how to fight the fat, rate your fitness quotient, remodel your body, build up stamina, snack sensibly, tackle body changes during puberty, get the coveted 6 – pack abs and most importantly stay fit even if you hate exercising.
|
Health | आरोग्य | Parenting | पालकत्व | Young Adult | किशोरसाहित्य | 150 | ‘Fitness Mantra’ Teenagerssathi_L | Fitness Mantra_BC.jpg |
काठमांडूतील कर्दनकाळ
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]
कोलकात्याच्या हॉटेलमधील एका अनोळखी इसमाच्या खुनाचा माग काढत फेलूदा व त्याचे मित्र काठमांडूत त्यांचा जुना शत्रू मगनलाल मेघराजच्या थेट गुहेत जाऊन पोहोचतात. स्वयंभूनाथ येथे घडलेली एक घटना, प्रार्थनाचक्रांचे उत्पादन करणार्या कारखान्यावर आकस्मिक छापा, कॅसिनोतील एक थरारक रात्र आणि एलएसडीमुळे जटायूंची झालेली घनचक्कर अवस्था या सर्व गोष्टींमुळे हे साहस भलतंच रंजक, रोचक व रोमहर्षक होऊन जातं. अखेर सनसनाटी उत्कर्षबिंदूच्या वेळी चलाख फेलूदा नकली औषधांचा घोटाळा उघडकीस आणून पुन्हा एकवार यशस्वी होतो.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे शेवटचे पुस्तक.
विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
Reviews
There are no reviews yet.