464 | 978-93-82591-50-4 | Fantastic Feluda Black Set (4 Books | फॅन्टॅस्टिक फेलूदा – ‘ब्लॅक’ संच |४ कथासंग्रहात एकूण १२ रहस्यकथा | Satyejeet Ray | सत्यजित रे | Ashok Jain | अशोक जैन | विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत. चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!अनुबिसचं रहस्य + ३ कथा चालत्या प्रेताचं गूढ + २ कथा टिंटोरेट्टोचा येशू + १ कथा केदारनाथची किमया + २ कथा |
पेपरबॅक | Book | Rohan Prakashan | Marathi | 620 | 630 | Children | 500 | BlackFeluda_Box_RGB.jpg | Black Feluda_Box_BackBC.jpg |
टिंटोरेट्टोचा येशू आणि १ कथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या २ कथा…
१. एकदा बाजारात फेलूदाची भेट जुन्या वस्तूंचे संग्राहक पार्वतीचरण यांच्या नातवाशी होते. फेलूदाचा चाहता असल्याने तो त्याला अचानक पिंजर्यातून गायब झालेल्या त्याच्या पोपटाचा शोध घेण्याची विनंती करतो. म्हणून फेलूदा त्याच्या घरी जातो. तेव्हाच पार्वतीचरण यांचा खून होतो, आणि मौल्यवान असलेलं ‘नेपोलियनचं पत्र’ही गायब होतं. फेलूदाला पोपटाच्या पिंजर्यावर रक्ताचे डागही सापडतात…!
२. जगप्रसिध्द चित्रकार टिंटोरेट्टोचं एक चित्र चित्रकार चंद्रशेखर यांना भेट मिळालेलं असतं. त्या चित्राची किंमत काही लाखांमध्ये असते. वारसा हक्काने त्या चित्राचे हक्क चंद्रशेखर यांच्या मुलाकडे असल्याने चित्र पाहण्यासाठी तो चुलतभावाकडे – नवकुमार यांच्याकडे येतो. तेव्हाच घरातल्या एका म्हातार्या कुत्रीचा ‘खून’ होतो. तपासात फेलूदाला कळतं की, ते चित्र बनावट आहे! खर्या चित्राचा शोध घेत फेलूदा पोहोचतो थेट हाँगकाँगला …’टिंटोरेट्टोच्या येशू’च्या शोधात!
Reviews
There are no reviews yet.