376 | 978-93-86493-60-6 | End Of The World Bhatkanti | एण्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती | पृथ्वीच्या दक्षिण व उत्तर टोकावरच्या थरारक सफरी… | Jayprakash Pradhan | जयप्रकाश प्रधान | शेल्फमध्ये ठेवलेला पृथ्वीचा ग्लोब बघत असताना पृथ्वीच्या दोन्ही टोकांवरचे प्रदेश विशेष लक्ष वेधून घेतात. ते म्हणजे, दक्षिणेकडचा अंटार्क्टिका तर उत्तरेकडचा आर्टिक. एक बर्फ सोडला तर या देशांमध्ये बघण्यासारखं काय बरं असेल असा प्रश्न मनात येतो. तब्बल ७८ देशांची ऑफबीट भटकंती करणारं प्रधान दाम्पत्य या प्रदेशांचीही मुशाफिरी करून आलं आहे. जगाच्या दोन ध्रुवांवरच्या अशा स्थळांची वैशिष्ट्यं टिपून तेथील निसर्गाचं आणि लोकजीवनाचं जिवंत चित्रण ते या पुस्तकातून करून देतात.
पृथ्वीच्या दक्षिण टोकावरील शेवटचं गाव ‘प्युर्टो विल्यम्स’, खलाशांचं कबरस्तान ‘केप हॉर्न’, ९८% बर्फानेच वेढलेलं ‘अंटार्क्टिका’, अवघ्या तीन हजार लोकवस्तीचं ‘फॉकलंड आयलंड’, तर उत्तर टोकावरील ‘आर्टिक सर्कल’, ‘नॉर्दन लाईट्स’चं मनोहारी दर्शन, हिमनगांची जागतिक राजधानी ‘ग्रीनलँड’ आणि लँड ऑफ फायर अँड आईस ‘आइसलँड’… पृथ्वीवरच्या अशा दोन टोकांवरील वेगळ्या दुनियेची सफर प्रधान या पुस्तकातून घडवून आणतात. थरारक सफरींचा अविस्मरणीय अनुभव देणारं कथन…एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 166 | 21.5 | 14 | 1.5 | 250 | Travel | प्रवास | 250 | EndoftheWorldBhatakanticoverfinal | End of the World BhatakantiBC.jpg |
भटकंती आगळ्या-वेगळ्या देशांची
जयप्रकाश प्रधान
तब्बल ८३ देश भटकलेले आणि पर्यटनाची भिंगरी लागेलेले प्रधान दाम्पत्य करोना काळात जणू ‘हाऊस अरेस्ट’ मध्येच होते… चार भिंतीत अडकले होते खरे, मात्र वाचकांना भटकंतीचे चार अनुभव सांगण्यासाठी त्यांनी त्या काळात त्यांची लेखणी सरसावली आणि २०१ ९मध्ये केलेल्या ४० दिवसांच्या चित्तथरारक भटकंतीला शब्दरूप देण्याचं काम केलं. जयप्रकाश प्रधान त्यांच्या या पुस्तकातून वाचकांना आणि पर्यटकांना एक सुखद सफर घडवून आणताहेत… भटकंती आगळ्या – वेगळ्या देशांची!
कोणत्या देशांची भटकंती आहे या पुस्तकात ?
- जॉर्जियामधील ऑटम कलर्स , तेथील प्राचीन अवशेष , स्टॅलिनचं जन्मगाव
- अझरबैजानमधील इचेरी शेहेरसारखा जुना भाग आणि दुसरी दुबई होण्याच्या मार्गावरील नवा भाग
- अर्मेनिया हा विविध युद्धांना बळी पडलेला चिमुकला देश
- नागोनों काराबाख हा डोंगराच्या कुशीत विसावलेला नयनरम्य देश
- युरोपची सांस्कृतिक राजधानी समजला जाणारा स्पेनमधील मलगा प्रांत आणि स्मार्ट सिटी बार्सिलोना
- प्राचीन अवशेषांनी नटलेला ग्रीस
- फ्रान्स आणि स्पेनच्या सीमांमध्ये लपलेला टिकलीएवढा देश अँडोरा
Reviews
There are no reviews yet.