376 | 978-93-86493-60-6 | End Of The World Bhatkanti | एण्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती | पृथ्वीच्या दक्षिण व उत्तर टोकावरच्या थरारक सफरी… | Jayprakash Pradhan | जयप्रकाश प्रधान | शेल्फमध्ये ठेवलेला पृथ्वीचा ग्लोब बघत असताना पृथ्वीच्या दोन्ही टोकांवरचे प्रदेश विशेष लक्ष वेधून घेतात. ते म्हणजे, दक्षिणेकडचा अंटार्क्टिका तर उत्तरेकडचा आर्टिक. एक बर्फ सोडला तर या देशांमध्ये बघण्यासारखं काय बरं असेल असा प्रश्न मनात येतो. तब्बल ७८ देशांची ऑफबीट भटकंती करणारं प्रधान दाम्पत्य या प्रदेशांचीही मुशाफिरी करून आलं आहे. जगाच्या दोन ध्रुवांवरच्या अशा स्थळांची वैशिष्ट्यं टिपून तेथील निसर्गाचं आणि लोकजीवनाचं जिवंत चित्रण ते या पुस्तकातून करून देतात.
पृथ्वीच्या दक्षिण टोकावरील शेवटचं गाव ‘प्युर्टो विल्यम्स’, खलाशांचं कबरस्तान ‘केप हॉर्न’, ९८% बर्फानेच वेढलेलं ‘अंटार्क्टिका’, अवघ्या तीन हजार लोकवस्तीचं ‘फॉकलंड आयलंड’, तर उत्तर टोकावरील ‘आर्टिक सर्कल’, ‘नॉर्दन लाईट्स’चं मनोहारी दर्शन, हिमनगांची जागतिक राजधानी ‘ग्रीनलँड’ आणि लँड ऑफ फायर अँड आईस ‘आइसलँड’… पृथ्वीवरच्या अशा दोन टोकांवरील वेगळ्या दुनियेची सफर प्रधान या पुस्तकातून घडवून आणतात. थरारक सफरींचा अविस्मरणीय अनुभव देणारं कथन…एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 166 | 21.5 | 14 | 1.5 | 250 | Travel | प्रवास | 250 | EndoftheWorldBhatakanticoverfinal | End of the World BhatakantiBC.jpg |
लंडननामा
जडणघडण पहिल्या ‘ग्लोबल सिटी’ची
[taxonomy_list name=”product_author” include=”508″]
लंडनमध्ये व्यापार -उद्योग वाढले. ऐश्वर्याला गगन ठेंगणं झालं आणि त्याबरोबर गुन्हेगारीही फोफावली. खून, मारामार्या, रोगराई, दारिद्र्य सर्व काही एकत्र नांदू लागलं. बघता बघता लंडन बकाल होत गेलं. मात्र नंतर दूरदृष्टीच्या व्यक्तींनी व संस्थांनी याच लंडनचा कायापालट केला आणि ते बनलं एक सर्वांगसुंदर महानगर…
पहिलं ‘जागतिक महानगर’!
मानवी सर्जनशीलता, बुध्दी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान म्हणजेच आजचं लंडन. लंडनचा हा प्रवास थोडाथोडका नव्हे, तर २००० वर्षांचा आहे. या पहिल्या ‘ग्लोबल सिटी’ च्या जडणघडणीची, चढ-उतारांची सुरस कथा म्हणजेच…
‘लंडननामा!’
Reviews
There are no reviews yet.