263 | 978-93-82591-59-7 | Ek Mutthi Aasmaa | एक मूठ्ठी आसमा | सत्यकथा एका झरीनाची… गगनाला गवसणी घालणार्या उमेदीची! | Shobha Bondre | शोभा बोंद्रे | राजपुत्राचं सिंड्रेलाशी लग्न होतं, त्यानंतर…‘and they lived happily everafter’… साधारणपणे कोणत्याही परीकथेचा शेवट हा असा गोड असतो. पण झरीनाची खरी गोष्ट अशा शेवटानंतरच सुरू होते. एक राजमहाल पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोलमडून पडतो आणि झरीना नव्या डावाला सुरुवात करते ती झोपडपट्टीतल्या एका खोलीतून! उज्जैनसारख्या छोटया शहरातून मुंबई नामक जनअरण्यात आलेली झरीना बिकट परिस्थितीला कशी सामोरी जाते? सुखी संसाराचं, एका उबदार घरटयाचं स्वप्न तर कधीच उद्ध्वस्त झालेलं असतं, मग स्वाभिमानाने जगण्याच्या आणि स्वअस्तित्वाच्या लढाईत ती कशी उभी राहते? आपल्या लेकीला स्वतंत्र व आत्मनिर्भर बनवण्याचं तिचं स्वप्न ती पूर्ण करते का?… झरीनाची ही गोष्ट वाचताना आपण या सत्यकथेत पूर्णपणे गुंतत जातो… जात-पात, धर्मकांड, स्त्री-पुरुष अशा कुठल्याही मर्यादा न जुमानता निग्रहाने पुढे पुढे जात राहणारी झरीनाची ही संघर्षकथा आपल्याला एक नवी उमेद देते, जगण्यावरचा आपला विश्वास वाढवते… एवढं नक्की! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 252 | 21.6 | 14 | 1 | 290 | It is a true story of Zarina, who belongs to a very conservative community of Bohra muslims in Ujjan. It is a story of a woman who fights for her existence and self esteem. It is surely a true inspiration for those who are struggling to achieve their goal and dreams in life. |
मोहर | Fiction | कथा-कादंबरी | 240 | EkMutthiAasmaa_RGB | Ek Mutthi AasmaanBC.jpg |
रॉबर्टसनचं माणिक व इतर २ कथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या 3 कथा…
१.सुनील तरफदार यांचा जादूचा कार्यक्रम, त्यातल्या ‘ज्योतिष्का’ उर्फ़ नयन या लहान मुलामुळे चांगलाच गाजू लागतो. नयनच्या अफाट बुद्धिक्षमतेमुळे तो नोटांवरचे क्रमांक, खिशातले पैसे असे कोणतेही आकडे झटक्यात अचूक सांगू शकत असतो. हे समजताच त्याच्या मालकीसाठी काही धनाढ्य माणसं वाट्टेल ते करायला तयार होतात, आणि अचानक नयन गायब होतो! आणि नयनचं रहस्य अधिकच गहिरं होत जातं…
२.ब्रिटिशकाळात भारतात सैनिक असलेल्या पीटरच्या आजोबांनी एका लुटीत एक माणिक घेतलेलं असतं. ते तो कलकत्त्याच्या संग्रहालयाला परत करण्यासाठी भारतात, आपल्या मित्रासोबत आलेला असतो. त्याच्याशी बोलताना फेलूदाला असं कळतं की, त्या माणकावर काही लोकांचा डोळा असून त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत… फेलूदाला रॉबर्टसनचं माणिक सुरक्षित ठेवता येईल?
३.जादूगार सोमेश्वर बर्मन यांनी गावोगावी जाऊन जादूचे प्रयोग केलेले असतात, त्याबद्दलची माहिती गोळा करून त्याचं संकलन केलेलं असतं. हे संकलित हस्तलिखित एका जादूगाराला विकत घ्यायचं असतं. त्याबद्दल सल्ला घेण्यासाठी ते फेलूदाकडे येतात. अन् अचानक बर्मन यांच्याकडे असलेल्या एका ‘मौल्यवान’ गोष्टीचं इंद्रजाल रहस्य समोर येतं…!
Reviews
There are no reviews yet.