95.00

देवतेचा शाप

फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा


[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


राजरप्पाच्या खडकाळ नदी किनार्‍यावरील एकाकी छिन्नमस्त मंदिराजवळ घडलेल्या घटनेचे पर्यवसान हजारीबाग येथील एका कुटुंबाचे प्रमुख महेश चौधरी यांच्या मृत्यूत होते. सांकेतिक संदेश लिहिलेल्या डायर्‍या, हरवलेला एक मौल्यवान तिकीटसंग्रह यामुळे रहस्यात भरच पडते. त्या खेरीज हजारीबागेच्या रस्त्यावर सर्कशीतला एक वाघ मोकाट फिरत असतो. त्यामुळे तर रहस्यकथेला एक वेगळा थरारक रंग चढतो. फेलूदाच्या अप्रतिम कौशल्याचे प्रत्यंतर देणारी ही आणखी एक उत्कंठापूर्ण व वाचनीय कादंबरी.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे दहावे पुस्तक.

विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा  बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्‍या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्‍या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!


Share
159 978-93-80361-15-4 Devtecha Shap देवतेचा शाप फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा Satyajit Ray सत्यजित रे Ashok Jain अशोक जैन फेलूदाच्या अप्रतिम कौशल्याचे प्रत्यंतर देणारी ही आणखी एक उत्कंठापूर्ण व वाचनीय कादंबरी. Paper Back Books Rohan Prakashan Marathi 120 18.3 12.3 0.6 150 Feluda Adventure किशोरवाचन Young Adult किशोरसाहित्य 75 devatecha_shap.jpg DevtechaShapBC.jpg
Weight 150 g
Dimensions 21.6 × 14 × 0.6 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.