356 | 978-93-86493-36-1 | Deed-Damadi : Rajakiya | दीड दमडी : राजकीय | Shrikant Bojewar | श्रीकांत बोजेवार | मनमोहन सिंग यांच्या काळातला ‘कोळसा-घोटाळा’ असो, की मोदींच्या जनधन-योजना, स्वच्छता मोहिमा, परदेशवाऱ्या असोत, किंवा संघाची खिल्ली उडवणाऱ्या शरद पवार यांची भाजपशी अधूनमधून केलेली सलगी असो… गणेशोत्सवाचं बदलणारं स्वरूप असो की संजय दत्तला कारावासात मिळणाऱ्या सवलती असोत… तंबी दुराई त्याचा तिरकस नजरेचा चष्मा लावणारचं ! मग त्याचा तल्लख मेंदू कामाला लागणार आणि त्या चष्म्यातून अशा प्रसंगांतील विसंगती हुडवूâन काढणार. त्या विसंगतींवर बुद्धिनिष्ठ विनोदाचं आवरण चढवून आपल्यापर्यंत त्या ‘दीड-दमडी’तून पोचवणार ! या दीड-दमडीत कल्पनाविलासाचं माध्यम विविधप्रकारे वापरलं जातं… काल्पनिक प्रसंग निर्माण करून त्यात विनोदनिर्मितीची अजोड ताकद असलेल्या संवादांची चपखल पेरणी होते, विविध भाषा, विविध बोली दावणीला बांधल्या जातात, तर कधी काव्य-अभंग-ओवी-वग असे साहित्यप्रकार ढंगदारपणे पेश होतात, तर कधी ‘पत्र-व्यवहारा’तून तिरकस बाण सोडले जातात. तंबी दुराईचं ‘मोनोटनी’शी वावडं असल्यामुळे तो विविध प्रयोग करतो…एकाचएक शैलीत अडकत नाही. राजकारण, समाजकारण, साहित्य-संस्कृती क्षेत्रांत घडणाऱ्या प्रसंगांतील विसंगतींना उघडं पाडत नकळतपणे उपरोधिक भाष्य करायचं आणि तेही उच्च दर्जाची विनोदनिर्मिती साधून… ही या तंबी दुराईची खासियत ! हे लिखाण हसवत हसवत अंतर्मुख कधी करतं, विचारप्रवृत्त कधी करतं, नव्या जाणीवा कधी करून देतं हे कळतही नाही आणि म्हणूनच ही आहे रंजन करणारी, प्रबोधन करणारी आणि त्यासोबत बौद्धिक आनंद देणारी… अर्थात श्रीमंत करणारी दीड-दमडी! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 156 | 21.6 | 13.9 | 1 | 210 | Collection of articles of a well read column by well known Tambi Durai. This part consists of political sarcastic articles. | मोहर | Literature | ललित | 175 | DidDamdiRajkiya | DeedDamadi_RajkiyaBC.jpg |
सहेल्या इथल्या-तिथल्या
आशा दामले
चार पावलं बरोबर चाललं की मैत्री होत नाही . एकमेकांच्या आयुष्यात चौकसपणे न डोकावता , सहजस्फूर्तपणे जे जाणवतं त्यात मैत्रीची बीजं असतात . न विचारता बोलायला , न सांगता ऐकायला कधी सुरुवात होते , एकमेकानां समजून घेताना मैत्री केव्हा जुळते कळतच नाही . दीर्घकाळ सहवासात राहता येतच अस नाही . परंतु सहवासाचे ते क्षण जेव्हा स्मृतीत घर करून राहतात , तेव्हा जीवाभावाची मैत्री जडते . लेखिकेच्या या ‘ सहेल्या तशा सामान्यातील असामान्य . आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर जेव्हा चौकट विस्कटते , तेव्हा चौकटीबाहेरचे निर्णय घेण्याचे धाडस त्या दाखवतात , त्यातील वेगळेपण पेलून आयुष्य जगतात . हे वेगळेपण पेलणं त्यांना सोपं जातं की त्याची खंत वाटते , की त्यातून निर्भेळ आनंद मिळतो ? या सगळ्या सहेल्यांच्या जीवनाने घेतलेले वेगवेगळे आकार विलोभनीय वाटतात . मोडतोड न करता , चौकटीत न बसणाऱ्या या सहेल्या इथल्या – तिथल्या
Reviews
There are no reviews yet.