462 | 978-93-82591-11-5 | Concretechi Vanrai | काँक्रीटची वनराई | प्रगत, सुनियोजित, सुंदर शहरांचं स्वप्न… | sulakshana Mahajan | सुलक्षणा महाजन | काँक्रीटचं जंगल’ म्हटलं की डोळयासमोर उभ्या राहतात आक्राळविक्राळ, कशाही-कुठेही बांधलेल्या इमारती! पण कोणतंही शहर किंवा नगर म्हणजे फक्त उत्तुंग, दाटीवाटीने फोफावलेल्या इमारती आणि भावनाशून्यपणे घडयाळाच्या काटयावर पळणारी माणसं, एवढंच असतं का? शहरांबाबतच्या समाजातील अशा प्रकारच्या प्रचलित नकारात्मक समजुती आणि विस्तारणारं नागरीकरण हा प्रचंड विरोधाभास लेखिकेलाही चक्रावून टाकतो. या विरोधाभासाचा शोध घेण्याचा, त्यामागची गृहितकं तपासण्याचा, नागरीकरणाची प्रक्रिया समजून घेण्याचा आणि समजावून देण्याचा सकारात्मक व प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच हे पुस्तक! लेखिकेच्या दृष्टिकोनातून राज्याच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी शहरं निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावतात. उत्तम सोयी-सुविधांनी युक्त शहरांच्या निर्मितीसाठी आपल्याला गरज आहे ती दूरदृष्टी ठेवून केलेल्या नियोजनाची. ज्याप्रमाणे एखादी वनराई फुलवायला, ती वृध्दिंगत करायला एका कुशल माळयाची व त्याच्या प्रेमळ संगोपनाची गरज असते त्याचप्रमाणे आजच्या काँक्रीटच्या जंगलाचं वनराईत रूपांतर करण्यासाठी आज गरज आहे ती द्रष्टया लोकनेत्यांची आणि व्यापक दृष्टीकोन असणाऱ्या कुशल प्रशासकांची. या दृष्टीने या पुस्तकातील चर्चा व मुद्दे वाचकांना व संबंधितांना आजच्या बकाल काँक्रीटच्या जंगलाचं रूपांतर सुंदर व नियोजनपूर्ण ‘वनराई’मध्ये करण्यास नक्कीच उद्युक्त करतील. |
कार्ड बाईंडिंग | Book | Rohan Prakashan | Marathi | 184 | 230 | Informative | 250 | ConcretechiVanraai_RGB.jpg | Concretechi VanraaiBC.jpg |
वॉर्ड नंबर पाच, केईएम
[taxonomy_list name=”product_author” include=”544,545″]
ही सारी कहाणी आहे केईएम हॉस्पिटलमधील ‘वॉर्ड नंबर पाचची’. वैद्यकीय व्यवसायात असताना डॉ.बापट यांना आलेले अनुभव, उपचारादरम्यान भेटलेले विविध प्रकारचे रुग्ण, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज…
डॉक्टरने रुग्णाकडे केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि पुस्तकी ज्ञानातून पाहणं पुरेसं नाही. रुग्णाचं मन, त्याचा स्वभाव, त्याच्या भोवतालचं वातावरण हे समजून घेवून त्यांच्याशी संवाद साधून मगच उपचार करणं डॉ.बापट यांना गरजेचं वाटलं. शरद पवार ते सतीश राजे, दादा कोंडके ते दत्तू मिस्त्री, रुग्ण कुणीही असो त्याची पत-प्रतिष्ठा न पाहता शल्यचिकित्सक डॉक्टर बापटांनी सारख्याच आपुलकीने उपचार केले. अशा सर्व अनुभवांविषयी…
Reviews
There are no reviews yet.