508 | 978-81-952537-8-4 | Brahmeghotala | ब्रह्मेघोटाळा | अर्थात ब्रह्मे घराण्यातल्या दोन पिढ्यांची कहाणी | junior Bramhe | ज्युनियर ब्रम्हे | या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे यात भरपूर फालतूपणा केलेला असतो . शब्दांचे खेळ , गद्य – पद्य विडंबनं , उगाचच केलेल्या कोट्या असतात . काहीवेळा तर कोट्या ‘ करायच्या म्हणून ओढूनताणून केलेल्या असतात . हे सारं करत असताना लेखक आपल्याकडे पाहून डोळा मारून जणू आपल्याला म्हणत असतो , ” बघा मी कसा फालतूपणा केलाय . हा खरा बावळटपणा नसतो . हे लक्षात येण्यासाठी वाचकही तसाच ‘ चतुर ‘ हवा . तसा नसेल तर त्याची चिडचिड होईल . ‘ हा काय आचरटपणा आहे ? ‘ असं तो डोक्यावरचे केस उपटत विचारील अशा विनोदी लेखनाच्या वाट्याला हा वाचक आला तर लेखकानं काशीत जाऊन प्रायश्चित्त घ्यावं . तेव्हा एक सावधगिरीची सूचना अर्थात वैधानिक इशारा : तुम्ही दुसऱ्या प्रकारातले म्हणजे ‘ असली ‘ वाचक असाल तर आणि तरच या पुस्तकाच्या वाट्याला जा . पहिल्या प्रकारचे वाचक असाल तर त्यांना टोकाचे आत्मक्लेश सोसावे लागतील त्या क्लेशांतून आनुषंगिक मेंदूविषयक आजार उद्भवले तर त्यांना लेखक – प्रकाशक – मुद्रक जबाबदार असणार नाहीत . मुकुंद टाकसाळे ( प्रस्तावनेतून ) | Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | 204 | विनोदी ललितलेखन | 290 |
असाही पाकिस्तान
[taxonomy_list name=”product_author” include=”345″]
साहित्य, संस्कृती व कलाक्षेत्रातील आगळावेगळा पाकिस्तान…
पाकिस्तानसारखा शेजारी समजायला संवेदना हवी आणि जिज्ञासाही. सांस्कृतिक भान हवं आणि राजकीय जाणही. पाकिस्तानला जाऊन, विविध क्षेत्रांमध्ये फिरून घेतलेला अनुभव हवा आणि अभ्यासही हवा. प्रत्यक्ष भेटी-गाठींमधून वेध घेण्याची दृष्टी हवी आणि उच्चपदस्थ वर्तुळातील लोकांबरोबर चर्चाही व्हायला हवी. पाकिस्तानी साहित्याची ओळख हवी आणि भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक साम्यस्थळांबद्दल आस्था हवी.
अरविंद गोखलेंकडे या सर्व गोष्टींबरोबर आहे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव. त्यातून कसदार झालेली लेखनशैली.
पाकिस्तानच्या रस्त्यांवरून केलेली भटकंती- कधी संशयाच्या छायेत तर कधी अनोळखी माणसांनी केलेल्या आदरातिथ्याच्या मायेत. अनेकांच्या परिचयातून समजलेला पाकिस्तान आणि कितीही वाचन-चिंतन केलं तरी गूढ राहिलेला पाकिस्तान. एकाच वेळेस मित्र असूनही शत्रूच्या रूपात भासणारा आणि तरीही नेहमी अनाकलनीय कारणांसाठी आकर्षित करणारा – असा आहे गोखलेंचा पाकिस्तान अर्थात् ‘असाही पाकिस्तान!’
– कुमार केतकर यांच्या प्रस्तावनेतून
Reviews
There are no reviews yet.