978-93-92374-42-5 | Bhatkanti aglya-veglya deshanchi | भटकंती आगळ्या-वेगळ्या देशांची | jayprakash pradhan | जयप्रकाश प्रधान | तब्बल ८३ देश भटकलेले आणि पर्यटनाची भिंगरी लागेलेले प्रधान दाम्पत्य करोना काळात जणू ‘ हाऊस अरेस्ट’मध्येच होते … चार भिंतीत अडकले होते खरे , मात्र वाचकांना भटकंतीचे चार अनुभव सांगण्यासाठी त्यांनी त्या काळात त्यांची लेखणी सरसावली आणि २०१ ९मध्ये केलेल्या ४० दिवसांच्या चित्तथरारक भटकंतीला शब्दरूप देण्याचं काम केलं . जयप्रकाश प्रधान त्यांच्या या पुस्तकातून वाचकांना आणि पर्यटकांना एक सुखद सफर घडवून आणताहेत … भटकंती आगळ्या – वेगळ्या देशांची ! ■ कोणत्या देशांची भटकंती आहे या पुस्तकात ? जॉर्जियामधील ऑटम कलर्स , तेथील प्राचीन अवशेष , स्टॅलिनचं जन्मगाव अझरबैजानमधील इचेरी शेहेरसारखा जुना भाग आणि दुसरी दुबई होण्याच्या मार्गावरील नवा भाग अर्मेनिया हा विविध युद्धांना बळी पडलेला चिमुकला देश नागोनों काराबाख हा डोंगराच्या कुशीत विसावलेला नयनरम्य देश युरोपची सांस्कृतिक राजधानी समजला जाणारा स्पेनमधील मलगा प्रांत आणि स्मार्ट सिटी बार्सिलोना प्राचीन अवशेषांनी नटलेला ग्रीस फ्रान्स आणि स्पेनच्या सीमांमध्ये लपलेला टिकलीएवढा देश अँडोरा | Book | Rohan Prakashan | मराठी | पर्यटन | २६० |
ऑफबीट भटकंती
पाच खंडांमधील विविध देशांतील दिलखुलास मुशाफिरी
जयप्रकाश प्रधान
जयप्रकाश प्रधान व त्यांच्या पत्नीने आत्तापर्यंत तब्बल ६४ देश पालथे घातले आहेत. मात्र केवळ ‘भोज्जा’ला शिवल्यासारखी त्यांची ही भटकंती नसते, तर काहीतरी वेगळं ठिकाण पाहणं, तिथली संस्कृती, रीतीरिवाज, खाणं-पिणं यांची ओळख करून घेणं याकडे त्यांचा ओढा असतो. त्यामुळे त्यांची ही भटकंती ‘टिपिकल’ न ठरता ‘ऑफबीट’ ठरते.
वैशिष्टयपूर्ण अशा ऑफबीट स्थळांची भटकंती करताना वाचकाला एका आगळया-वेगळया अनुभवाची प्रचीती येते. मग लेखकाने रंगवलेला ऑटम कलर्सचा रंगवर्षाव असो, अॅथाबास्का ग्लेशिअरवरचा अनुभवलेला थरार असो किंवा मती गुंग करणारा आउशवित्झ छळछावणीच्या भेटीतला हृदयद्रावक अनुभव असो! सर्वच प्रवासअनुभव वाचकाच्या मनाला भिडतात, एक अविस्मरणीय अनुभूती देतात. विशेष ऐकिवात नसलेली ठिकाणं उदा. नॉर्वेमधलं आइस हॉटेल, पोलंडमधील कवटया व हाडांनी सजवलेलं चर्च, व्हिएतनाममधील युध्दकाळात बांधलेली कुची टनेल्स, मेकाँग नदीतील सफर किंवा व्हिक्टोरिया फॉल्सचा अजस्त्र धबधबा…एका अद्भुत दुनियेची सफर घडवतात. या स्थळांची रंजक ओळख करून देत लेखक तिथे कसं जावं, कधी जावं याबाबतच्या उपयुक्त अशा व्यावहारिक टीप्सही देतात.
नेहमीच्याच गर्दीच्या पर्यटनस्थळांच्या प्रवासवर्णनांपेक्षा ‘ऑफबीट’ पर्यटनाचा रोमांचकारी आनंदानुभव देणारं पुस्तक… ऑफबीट भटकंती!
Reviews
There are no reviews yet.