418 | 978-93-86493-93-4 | Bhagavatgita Gandhijinchya Chintanatun | भगवद्गीता गांधीजींच्या चिंतनातून |
महात्मा गांधी यांनी जनसामान्यांसाठी भगवदगीतेचं केलेलं नेमकं विवेचन
|
Bhagwan Datar | भगवान दातार | ‘महाभारत’ या ग्रंथातील मुगुटमणी म्हणजे ‘भगवदगीता’! भगवदगीतेने शतकानुशतकं अनेक विचारवंतांना आणि आध्यात्मिक चिंतकांना भुरळ घातली आहे. अनेकांनी गीतेचा अर्थ आणि रोजच्या आयुष्यातील प्रश्नं यांच्यातील नातं शोधायचा प्रयत्न केला आहे.
पण या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे आयुष्यभर ज्यांनी अहिंसेची कास धरली, त्या महात्मा गांधी यांनी या पुस्तकात कौरव-पांडवांतील युद्धाचं रुपक मांडत सांगितलेल्या गीतेवर स्वत:चं विवेचन मांडलंय. अनासक्ती योग, कर्मयोग आणि सत्यपालन या गीतेतल्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकत यातल्या सर्व अध्यायांवर असलेलं गांधीजींचं हे चिंतन एक वेगळा आयाम समोर मांडतं. आजच्या काळाशी गीताविचाराचा संदर्भ जोडणारं महात्मा गांधी यांचं प्रगल्भ चिंतन – भगवदगीता : गांधीजींच्या चिंतनातून |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 280 | 22 | 14.5 | 1.4 | 310 |
This book is the Marathi translation of Bhagvad Gita according Gandhi.
A sloka-by-sloka interpretation of one of the world’s most enduring and influential spiritual texts of the twentieth century. Unlike other interpretations, Gandhi’s commentary is direct and to the point, not offering an opinion on the meaning of the text, but fleshing out the message, often relating it to his own extraordinary experiences. It is not a manual of dos and don’ts; rather it is a guide to the challenges we all face in our lives. It expounds the profound idea that nothing done in the path of truth is ever lost; there is no harm, no fear in following it.Gandhi’s Gita is also a call to detached service, a ‘gospel of selfless action’. It is, in the words of Ralph Waldo Emerson, ‘an empire of thought’ that everyone can benefit from, regardless of religion, beliefs or background.India Hon. Prime Minister Shri. Narendra Modi presented this book to the Hon. Ex.President of USA Mr.Barack Obama. |
Philosophical | वैचारिक | 300 | Bhagvadgitacover | Bhagvadgita coverBC.jpg |
माझं तालमय जीवन : झाकीर हुसेन
[taxonomy_list name=”product_author” include=”403″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”421″]
तबलावादक, संगीतकार आणि तालतज्ज्ञ झाकीर हुसेन हे जागतिक पातळीवरचं ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्व. उस्ताद अल्लारखाँ यांचे सर्वांत मोठे सुपुत्र. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा जाहीर वादन केलं आणि त्यानंतर ते संगीत क्षेत्रातला ‘चमत्कार’ समजले गेले! त्यानंतर कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी तसंच नर्तकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार झाले. याबरोबरच झाकीर यांनी आपल्या सर्जकतेतून जाझ आणि जागतिक संगीतातही आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक प्रसिद्ध वादकांसोबत जगभरात कार्यक्रम केले तसंच एकलवादनही केलं. जॉन मॅकलॉघ्लिन, एल. शंकर आणि टी.एच. विनयक्रम यांच्यासोबत त्यांनी ‘शक्ती बँड’ स्थापन करून संगीत क्षेत्रात इतिहास रचला. त्यांनी जगविख्यात दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत दिलं, तसंच काही चित्रपटांत अभिनयही केला. नसरीन मुन्नी कबीर यांनी झाकीर हुसेन यांच्याशी साधलेल्या या प्रदीर्घ संवादात आपण झाकीर यांची जीवनकहाणी त्यांच्याच तोंडून ऐकतो. त्यांचं बालपण कसं होतं, माहीममध्ये त्यांनी व्यतीत केलेली सुरुवातीची वर्षं, असामान्य प्रतिभेच्या वडिलांकडून त्यांनी वयाच्या चवथ्या वर्षापासून घेतलेले तबलावादनाचे धडे, पं. रवी शंकर, उस्ताद अली अकबरखॉँ आणि उस्ताद विलायतखॉँ यांसारख्या प्रतिभावंतांसोबत काम करताना आलेले अनुभव, आठवणी आणि किस्से यांतून संगीताचं अनोखं विश्व आपल्यासमोर येतं. यात झाकीर आपल्याला त्यांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान, संगीताबद्दलची त्यांची समज, गुरू-शिष्य नातं आणि तबलावादनावर असलेलं त्यांचं निस्सीम प्रेम याबद्दल कधी मिश्किलपणे तर कधी समर्पित भावनेने बोलतात. एक विख्यात कलावंत म्हणून अमेरीका व भारत या दोन्ही देशांत आयुष्य व्यतीत करण्याची कसरत त्यांनी कशी साधली आहे याविषयीही ते मोकळेपणाने सांगतात.
Reviews
There are no reviews yet.