504 | 978-81-95252537-2-2 | Bahar Manacha | बहर मनाचा | प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी कृतिशील विचार | डॉ. विजया फडणीस | आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात , जेव्हा आपण खचून जातो … क्वचित प्रसंगी कोलमडून जातो … रोजच्या आयुष्यातल्या आणि अकल्पितपणे उद्भवणाऱ्या अशा अनेक प्रसंगांना , समस्यांना उमेदीने आणि मनोबळाने कसं सामोरं जावं याचं शास्त्रीय मार्गदर्शन डॉ . विजया फडणीस पुस्तकात समर्पक उदाहरणांद्वारे करतात . • आशावाद कसा जोपार ? मानसिक ताण कसे हाताळावेत ? आपल्यातील सुप्त शक्ती कशी ओळखावी ? • आपल्या वागण्याचं विश्लेषण कसं करावं ? • वाढत्या वयामध्ये व्याधींमुळे किंवा एकटेपणाच्या भावनेमुळे येणाऱ्या नैराश्याच्या भावनेला कसं सामोरं जावं … अशा व इतर अनेक समस्यांवर त्या आपला अभ्यास , अनुभव व संवादी समुपदेशनाच्या कौशल्यातून वाट दाखवतात . सकारात्मकतेचं खत – पाणी देऊन आयुष्याला आनंदाचं झाड बनवणारं पुस्तक … बहर मनाचा ! | papar back | book | Rohan Prakashan | marathi | १३३ | माहितीपर | २४० |
चंद्राची सावली
[taxonomy_list name=”product_author” include=”3811″]
संतापाने ओरडत त्या माणसाने तिच्यावर झडप घातली आणि दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला . त्याचे हात निघताच ती तशीच वेडीवाकडी खाली कोसळली … ती गतप्राण झाली होती . तिला उचलून घेऊन तो खडक उतरू लागला . रात्रीचा एक पक्षी कर्कश किंकाळी मारत त्याच्या जवळून गेला . त्याच्या हातून तिचं शरीर निसटलं . घाम फुटून तो खाली वाकला आणि शहारला … तिचे डोळे उघडे होते . त्यात आता बुबुळं नव्हती चंद्रप्रकाशात ते चकचकत होते . धीर सुटून त्याने तोंड फिरवलं आणि तिथून धूम ठोकली . नंतर अवाढव्य अशा ‘ छतारीया इस्टेटचा पिच्छा बुबुळं नसलेल्या तिच्या शरीराने सोडला का ? अघटित आणि अतर्क्य गोष्टींचा भयानक खेळ चंद्राची सावली ! विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !
Reviews
There are no reviews yet.