216 | 978-93-80361-96-3 | Asa Ghadala Bharat | असा घडला भारत | १९४७ पासूनच्या घटना-घडामोडींतून उलगडलेला स्वतंत्र भारत | Editor : Milind Champanerkar | Suhas Kulkarni | संपादक : मिलिंद चंपानेरकर | सुहास कुलकर्णी | भारताचा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या? पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं? अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले? कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली? आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या? चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं? क्रीडाविश्वात काय बदल घडले? अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे. गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा आम्ही यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत ! |
Hard Bound | Books | Rohan Prakashan | Marathi | 924 | 29 | 22.5 | 5 | 2500 |
The research based book is a complete encyclopedia of India’s post-Independence History, given in event by event format.
Important events in all the major fields; Politics, Administrative, Business, Sports, Culture, Cinema, Arts, Science, etc, have been explained objectively. The book also includes statistical graphs and different types of indices for easy usage. A book is an outcome of 7 years of research by a team of 40 eminent authors. |
Informative | माहितीपर | Political | राजकीय | 1690 | Asa Ghadala bharat_RGB.jpg | Asa Ghadla Bharat_BackBC.jpg |
सहकारधुरीण
भारतातील साखर उद्योगात सहकाराची ध्वजा रोवण्याचं पायाभूत कार्य करणारे विठ्ठलराव विखे पाटील यांचं समग्र चरित्र
[taxonomy_list name=”product_author” include=”348″]
भारतातील दीनदुबळया शेतकऱ्यांना कायम स्मरणात राहावीत अशी जी थोडी नावं आहेत, त्यामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांचं नाव अढळ असायला हवं. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावच्या विठ्ठलरावांनी शेतकऱ्यांना सहकाराचा मंत्र देऊन त्यांना दारिद्रय आणि अज्ञानाच्या कर्दमातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. पिळवणूक करणारे सावकार, धनदांडगे व्यापारी, राज्यसत्तेचे लबाड प्रतिनिधी, जातिभेद, वर्गविग्रह यांसारख्या बलाढय शत्रूंशी अहिंसक मार्गाने लढण्यासाठी त्यांनी अर्धपोटी भूमिपुत्रांची सेना संघटित करून त्यांचं यशस्वी नेतृत्व केलं… आणि त्यांच्याच सहभागाने ‘प्रवरा सहकारी साखर कारखाना’ हा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना १९५० मध्ये उभारला.
कारखान्याच्या उभारणीसोबतच विठ्ठलरावांनी समाजविकास व शिक्षणप्रसाराच्या कार्याला चालना दिली आणि त्यामुळेच सहकारी कारखाना म्हणजे क्रांतिकारक बदलाचं प्रारूप ठरलं. त्याचं लोण केवळ पश्चिम महाराष्ट्रात पसरलं असं नाही, तर त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं आर्थिक, सामाजिक व राजकीय चित्र बदललं. या प्रक्रियेत त्यांच्या सहकारी कारखान्याने उत्प्रेरकाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सहकारी चळवळीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला शेती-शक्तीचा आधार देण्यामध्ये विठ्ठलरावांचं योगदान मोठं ठरलं आणि त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने ‘सहकारधुरीण’ ठरतात.
विठ्ठलरावांच्या जीवनाच्या व कार्याच्या विविध टप्प्यांबाबत प्रदीर्घ काळ संशोधन करून सिध्द केलेला हा समग्र चरित्रग्रंथ ‘सहकारधुरीण’ महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांबाबत अंतर्दृष्टी देणारा ठरावा.
Reviews
There are no reviews yet.