347 | 978-93-86493-28-6 | Anuvishvatil Dhruv : Dr. Anil Kakodkar | अणुविश्वातील ध्रुव : डॉ. अनिल काकोडकर | Neeraj Pandit | नीरज पंडीत | अणुविश्वात डॉ. अनिल काकोडकर यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं, ते त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे. `ध्रुव’सारखी अणुभट्टी कार्यान्वित करणं असो, किंवा पोखरण अणुचाचण्या असोत – डॉ. काकोडकरांनी अशा कितीतरी महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये बहुमूल्य कामगिरी बजावली. एवढंच नव्हे, तर भारत-अमेरिका यांच्यातल्या अणुकराराच्या मसुद्यात देशहिताच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
अणुऊर्जेबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन या विषयावरही त्यांनी सखोल चिंतन केलं. त्यातूनच भारताला तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात भरारी घ्यायची असेल, तर शिक्षण-व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे हे त्यांनी ओळखलं. त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून `सिलेज’, `शिक्षण पंढरी’ यांसारखे अनेक उपक्रम राबवले गेले. तसंच एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘व्हिजन २०२०’नंतर भारताच्या भविष्यकाळातल्या गरजा व विकास विशद करणारं `व्हिजन २०३५’ डॉक्यूमेंटही त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलं. सध्या त्यानुसार अनेक उपक्रम व प्रकल्प राबवले जात आहेत. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 107 | 21.4 | 14 | 0.7 | 160 | Biography of Dr.Anil Kakodkar, one of India’s greatest nuclear scientists. | व्यक्तिरंग | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | Science | विज्ञान | 140 | Anuvishwatil Dhruv cover (1) | AnuvishwatilDruvaBC.jpg |
फील्ड मार्शल सॅम माणेकशा
भारतीय लष्कराचा मानबिंदू
[taxonomy_list name=”product_author” include=”455″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”430″]
चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत पाच युध्दांना सामोरं जाणाऱ्या आणि संपूर्ण कारकीर्दीत वादाचा किंवा अपकीर्तीचा डाग लागू न देणाऱ्या भारताच्या या आठव्या लष्करप्रमुखाचं हे प्रेरणादायी व रोमहर्षक चरित्र!
भारताचे माजी लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि विशेषत: त्यांच्यामधील नेतृत्वगुणांच्या सर्व पैलूंचं दर्शन लेखक मेजर जनरल शुभी सूद यांनी या पुस्तकातून घडवलं आहे. शुभी सूद हे माणेकशा यांचे निकटवर्ती सहकारी. त्यांच्या सोबत काम करताना आलेल्या अनुभवांमधून माणेकशांचे व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व याचं चित्रण त्यांनी या पुस्तकात संशोधनपूर्वक व अतिशय समतोलपणे केलं आहे.
युध्दरणनितीची उत्तम जाण, अभ्यास, व्युहरचनेतील मुत्सद्देगिरी, सेनानीला लागणारा निर्भीडपणा, मूल्यांवरील निष्ठा, उच्चपदी असताना देखील त्यांच्याकडे असणारी विनोदबुध्दी आणि कोणत्याही वयोगटातल्या माणसाशी त्यांचं सहृदय वर्तन अशा माणेकशांच्या सर्व पैलूंवर लेखकाने पुस्तकात प्रकाश टाकला आहे.
Reviews
There are no reviews yet.