257 | 978-93-82591-51-1 | Anubischa Rahasya ani Itar 3 Katha | अनुबिसचं रहस्य आणि इतर ३ कथा | फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा | Satyajit Ray | सत्यजित रे | Ashok Jain | अशोक जैन | फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या ४ कथा… १. किमती वस्तूंचे संग्रहालय असलेल्या राजनबाबूंना एके दिवशी छापील अक्षरं कापून तयार केलेलं धमकीचं पत्र येतं… नंतर एक मुखवटाधारी माणूसही त्यांना घाबरवून सोडतो. कोण असेल हा ‘दार्जिलिंगचा धोका’दायक माणूस? २. कैलास चौधरींना आलेल्या एका निनावी पत्रात त्यांच्याकडचं एक मौल्यवान रत्न विशिष्ट ठिकाणी आणून देण्याबद्दल सांगितलेलं असतं. आणि तपास करताना फेलूदासमोर येतं ‘कैलास चौधरींच्या रत्ना’ विषयी एक अनपेक्षितच सत्य! ३. किमती वस्तूंचे संग्राहक नीलमणीबाबू यांना इजिप्तशियन चित्रलिपीत लिहिलेलं एक पत्र येतं. त्यात धमकी तर नाहीये ना, याचा शोध घेताना दुसर्या एका संग्राहकाकडचीही इजिप्तशियन मूर्ती चोरीला जाते. चित्रलिपीसारखं गूढ वाटणारं ‘अनुबिसचं रहस्य’ फेलूदा कसं सोडवेल?… ४. राधारमण समाद्दार या काहीशा श्रीमंत, विक्षिप्त पण बुध्दिमान संगीतवाद्य संग्राहकाचे अखेरच्या क्षणी शब्द असतात – ”माझ्या नावात… किल्ली… किल्ली…!” या ‘किल्ली’त दडलेलं रहस्य फेलूदा कसं उकलेल? |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 156 | 18.3 | 12.3 | 0.6 | 140 | Film Director and writer Satyajit Ray wrote Feluda stories, featuring the detective Pratosh C. Mitter. The plots involve murder, intrigue and narrated in racy, humorous style. The locales range from Kedarnath to Hongkong. Each mystery and its solution makes for enormously entertaining fare! | किशोरवाचन | Young Adult | किशोरसाहित्य | Fiction | कथा-कादंबरी | 125 | FeludaCover_Anubischa_RGB | AnubisacheRahasyaBC.jpg |
व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग ४
रक्तमुखी नीलम आणि इतर ६ कथा
शरदिन्दु बंद्योपाध्याय
अनुवाद : सुनिता जैन
बंगाली साहित्यात अत्यंत लोकप्रिय झालेल्या शरदिंदु बंद्योपाध्याय यांच्या ‘व्योमकेश बक्षी रहस्यकथा’ या प्रथमच मराठीत उपलब्ध होत आहेत. श्रीजाता गुहा यांनी मूळ बंगाली कथा इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत.
व्योमकेश बक्षीच्या रहस्यकथा ह्या उत्कंठावर्धक, रोमहर्षक आणि खिळवून ठेवणार्या गोष्टींचा आनंददायी ठेवा आहे. मूळ कथा जरी १९३२ ते १९६७ या काळात प्रकाशित झालेल्या असल्या, तरी आजही त्यांचा टवटवीतपणा विंâचितसुद्धा कमी झालेला नाही.
व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. अजित नावाचा त्याचा सहकारी आहे.
एका प्रकरणातील रहस्याची उकल करताना व्योमकेशची सत्यवतीशी ओलख होते. पुढे तो तिच्याशी लग्नही करतो.
व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आणि शेरलॉक होम्सची आठवण करून देणारं आहे.
निखळ आनंद देणार्या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!
Reviews
There are no reviews yet.