978-93-80361-19-2 | Anamika | अनामिका | Manjusha Gosavi | मंजुषा गोसावी | समाजाने स्त्री – पुरुष समानता अंगिकारली आहे , असं जरी एक चित्र दिसत असलं तरी याबाबत आज अनेक समस्या स्त्रियांना भेडसावत आहेत . त्याचप्रमाणे सामाजिक , सांस्कृतिक , आर्थिक स्थित्यंतरांना सामोरे जाताना अनेक नवे प्रश्नही निर्माण झाल्याचे चित्र आहे . शिक्षणामुळे आर्थिक स्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य मिळालेल्या स्त्रीला जोडीदार मिळणे अवघड झाले आहे . शिक्षण प्रसार झाला पण परीक्षेतल्या गुणांचे माहात्म्य एवढे वाढले की आईच्या वात्सल्याची जागा मुलाला शर्यतीतल्या उंदीर करण्याने घेतली . शहरी स्त्रियांना खेड्यातल्या स्त्रियांचे प्रश्न समजेनासे झाले , तर शहरात आर्थिक वर्गभेदांमुळे स्त्रियांमध्ये एकमकींविषयी दुरावा निर्माण होऊ लागला आहे . जाहिरात क्षेत्रासारख्या चमचमणाऱ्या चंदेरी क्षेत्रामध्ये स्त्रियांचे लैंगिक शोषण होऊ लागले , तर दुसरीकडे लैंगिक शिक्षणाला विरोध असल्यामुळे किशोरवयीन मुलांचे भावविश्व गुंतागुंतीचे होऊ लागले आहे . गर्भजल परीक्षेच्या शोधानंतर स्त्री – भ्रूण हत्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आणि समानतेच्या तत्त्वाची पिछेहाट झाली आहे . यासगळ्या प्रश्नांचे हळूवार चित्रण करणाऱ्या या कथासंग्रहामध्ये आजचे वास्तव प्रतिबिंबित झाले आहे . त्यामुळे या कथा वाचकाला विचारप्रवृत्त करतील अशी आशा आहे . | Papaer Back | Book | Rohan Prakashan | Marathi | 118 | Fiction | कथासंग्र | 100 |
व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग ४
रक्तमुखी नीलम आणि इतर ६ कथा
शरदिन्दु बंद्योपाध्याय
अनुवाद : सुनिता जैन
बंगाली साहित्यात अत्यंत लोकप्रिय झालेल्या शरदिंदु बंद्योपाध्याय यांच्या ‘व्योमकेश बक्षी रहस्यकथा’ या प्रथमच मराठीत उपलब्ध होत आहेत. श्रीजाता गुहा यांनी मूळ बंगाली कथा इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत.
व्योमकेश बक्षीच्या रहस्यकथा ह्या उत्कंठावर्धक, रोमहर्षक आणि खिळवून ठेवणार्या गोष्टींचा आनंददायी ठेवा आहे. मूळ कथा जरी १९३२ ते १९६७ या काळात प्रकाशित झालेल्या असल्या, तरी आजही त्यांचा टवटवीतपणा विंâचितसुद्धा कमी झालेला नाही.
व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. अजित नावाचा त्याचा सहकारी आहे.
एका प्रकरणातील रहस्याची उकल करताना व्योमकेशची सत्यवतीशी ओलख होते. पुढे तो तिच्याशी लग्नही करतो.
व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आणि शेरलॉक होम्सची आठवण करून देणारं आहे.
निखळ आनंद देणार्या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!
Reviews
There are no reviews yet.