222 | 978-93-82591-08-5 | Amavasyecha Poornachandra | अमावास्येचा पूर्णचंद्र | Shrikant Lagu | श्रीकांत लागू | अमावस्येचा पूर्णचंद्र म्हणजे देशा – विदेशातील विविध छटांमधील ग्रहणं बघण्यासाठी केलेली मनसोक्त भटकंती ! पुस्तकाचे लेखक श्रीकांत लागू यांनी पहिलं सूर्यग्रहण बघितलं होतं- वयाच्या आठव्या – नवव्या वर्षी . त्यावेळी निर्माण झालेल्या कुतूहलापोटी पुढील आयुष्यात लागूंनी अक्षरशः झपाटल्याप्रमाणे अनेक ठिकाणी जाऊन ग्रहणं अनुभवली . त्यांच्या दृष्टीने ग्रहण म्हणजे आकाशात घडणारं अद्भुत नाट्य . ते पाहून डोळ्याचं पारणं फिटतं पण मन मात्र भरत नाही . हुबळी , डायमंड हार्बर , कच्छ , झांबिया , द . आफ्रिका , टर्की , चीन , रामेश्वरम् अशा देश – विदेशातील अनेक ठिकाणी त्यांनी खग्रास सूर्यग्रहणाचा जणू पाठलागच केला ! ते स्वत : खगोलशास्त्रज्ञ नाहीत किंवा अंतराळशास्त्रज्ञही नाहीत . तरीही एखाद्या निरागस पण जिज्ञासू वृत्तीच्या मुलाप्रमाणे ते ग्रहणाचं रोमांचपूर्ण वर्णन करतात . ग्रहणाच्या पहिल्या स्पर्शापासून ते ग्रहण सुटेपर्यंतच्या काळाचं वर्णन वाचताना वाचकाला स्वत : ग्रहण अनुभवत असल्याचा आनंद देऊन जातात . लागू देश – विदेशात भरपूर फिरले , मात्र नेहमीच्या पठडीतील पर्यटनासाठी म्हणून ते फिरले नाहीत . त्यांची भटकंती झाली ती कधी जलतरणस्पर्धेच्या निमित्ताने तर कधी नाट्यप्रयोगांसाठी , कधी कैलास – मानससरोवराची प्रदक्षिणा करायला , कधी एव्हरेस्ट बेसकॅप सर करण्यासाठी तर कधी अद्भुत शांततेने आणि केवळ बर्फाने आच्छादलेला सातवा खंड – ‘ अंटाटिका ‘ अनुभवण्यासाठी मात्र या पुस्तकातील भटकंती आहे ती फक्त आणि फक्त ग्रहणं बघण्यासाठीची … | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 108 | 21.6 | 14.1 | 0.7 | 130 |
In this book the author shares with us experiences of solar Eclipse.
The author saw the solar Eclipse for the first time when he was eight or nine years old. Since then it became his passion. He travelled many countries eg. China, South Africa, Turkey, Zambia and many states of India to experience this magical drama of nature. Through this book he share his experiences of the Eclipse and also gives the scientific information of solar Eclipse. |
Travel | प्रवास | 125 | AmavashechaPurnachandra_RGB | AmavashechaPurnachandra_BackBC.jpg |
पर्वतपुत्र शेर्पा
हिमालयातील खरे खुरे साहसवीर
उमेश झिरपे
शिखर खुणावत असतं…
पण मधे असतात अनेक अडथळे… गोठवणारी थंडी, बर्फाखाली गेलेल्या वाटा, खोल-खोल दऱ्या आणि घळी, विरळ होत जाणारा ऑक्सिजन, खड्या चढणी आणि निसरडे उतार, लहरी निसर्ग…!
या सगळ्यावर मात करायला दोनच गोष्टी गिर्यारोहकाला साथ देत राहतात… एक म्हणजे उद्दिष्ट गाठायची जिद्द आणि दुसरी म्हणजे साहसी सोबती शेर्पा अर्थात गिर्यारोहणाची खरी ‘लाइफ लाइन’ !
बर्फातल्या वाटा मोकळ्या करणारे, घळींवर शिड्या टाकणारे, अडकलेल्या गिर्यारोहकांच्या ‘रेस्क्यू’ला धावणारे, त्यांना सकस आहार मिळावा म्हणून स्वत: रांधून खाऊ घालणारे, मणामणांचं ओझं उचलून नेणारे शेर्पा ! हिमालय त्यांना जसा कळतो, तसा इतर कुणालाही कळत नाही आणि म्हणूनच ते गिर्यारोहकांचे खरे पार्थ ठरतात. हिमालयाचे हे खरेखुरे साहसवीर गिर्यारोहकांच्या यशस्वी मोहिमांमध्येही आनंद घेतात. मुख्य म्हणजे आजकाल शेर्पा इतर व्यवसायांतही मुसंडी मारत असून त्यांतही त्यांची कामगिरी उत्तुंग होत आहे.
सुप्रसिद्ध आणि अनुभवी गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी या पुस्तकात शेर्पांच्या या खडतर जीवनाचे विविध पैलू रंजकपणे उलगडले आहेत.
शेर्पा म्हणजे केवळ ‘सामान उचलणारे’ नव्हेत, हे सांगून हिमालयातल्या या खऱ्या खुऱ्या साहसवीरांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी अधोरेखित करणारं पुस्तक पर्वतपुत्र शेर्पा…!
Sherpa is the lifeline of mountaineering. Agile and fit Sherpas help mountaineers while trekking. They are versatile and are well capable to handle many tasks. They cook, carry your luggage, they clean the ice to make path for mountaineers, they help them in each respect. A veteran mountaineer himself and a disciplined manager of the groups of mountaineers, Umesh Jhirpe has written about Sherpa community, their way of life, culture, religious beliefs, food, and many other things.
Reviews
There are no reviews yet.