448 | 978-93-89458-28-2 | Agasti Set (3 Books) | अगस्ति इन अॅक्शन संच | Shrikant Bojewar | श्रीकांत बोजेवार | रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन ऍक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, ‘हॅट्स ऑफ यार अगस्ती!’ | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 320 | 18.5 | 12 | 2.4 | 360 | मोहर | Combo Sets | पुस्तक संच | Fiction | कथा-कादंबरी | 320 | AgastiSetCover | AgastiSetCoverBC.jpg |
एक मूठ्ठी आसमा
सत्यकथा एका झरीनाची… गगनाला गवसणी घालणार्या उमेदीची!
शोभा बोंद्रे
राजपुत्राचं सिंड्रेलाशी लग्न होतं, त्यानंतर…‘and they lived happily everafter’… साधारणपणे कोणत्याही परीकथेचा शेवट हा असा गोड असतो. पण झरीनाची खरी गोष्ट अशा शेवटानंतरच सुरू होते.
एक राजमहाल पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोलमडून पडतो आणि झरीना नव्या डावाला सुरुवात करते ती झोपडपट्टीतल्या एका खोलीतून! उज्जैनसारख्या छोटया शहरातून मुंबई नामक जनअरण्यात आलेली झरीना बिकट परिस्थितीला कशी सामोरी जाते? सुखी संसाराचं, एका उबदार घरटयाचं स्वप्न तर कधीच उद्ध्वस्त झालेलं असतं, मग स्वाभिमानाने जगण्याच्या आणि स्वअस्तित्वाच्या लढाईत ती कशी उभी राहते? आपल्या लेकीला स्वतंत्र व आत्मनिर्भर बनवण्याचं तिचं स्वप्न ती पूर्ण करते का?…
झरीनाची ही गोष्ट वाचताना आपण या सत्यकथेत पूर्णपणे गुंतत जातो… जात-पात, धर्मकांड, स्त्री-पुरुष अशा कुठल्याही मर्यादा न जुमानता निग्रहाने पुढे पुढे जात राहणारी झरीनाची ही संघर्षकथा आपल्याला एक नवी उमेद देते, जगण्यावरचा आपला विश्वास वाढवते… एवढं नक्की!
Reviews
There are no reviews yet.