11 | 978-81-86184-29-5 | Aarogya Yoga | आरोग्य-योग | आसन-प्राणायाम, धारणा-ध्यान | B.K.S. Iyengar | बी.के.एस. अय्यंगार | अवघ्या मानवजातीला वरदान ठरणारी भारताची योगासन-साधना मध्ययुगीन काळात अस्तंगत झाल्यासारखी होती. परंतु आज अष्टांग-योग साधनेला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. एवढेच नव्हे तर आज ही योगविद्या युरोप-अमेरिकेसारख्या पुढारलेल्या आणि सुधारलेल्या देशांत जाऊन रुजली आहे. या पुस्तकात योगासनांचे शुध्द स्वरूप, त्यांचे शुध्दाचरण, त्यातील बारकावे, शरीरातील उणिवा व रोगव्याधी यानुसार करावयाची त्यांची निवड यासंबंधीचे विस्तृत मार्गदर्शन योगसाधनेचे जगप्रसिध्द महान उपासक योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी सर्वांना उमजेल अशा पध्दतीने केलं आहे, आसन, प्राणायाम, धारणा-ध्यान अशा सर्वांगांनी विवेचन करणारं परिपूर्ण पुस्तक. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 310 | 21.6 | 14 | 1.9 | 320 | learning yoga | Yoga | योग | 270 | Aarogya Yoga.jpg | aarogyayogMarathiBC.jpg |
शांती योग
योग साधनेची प्राथमिक,माध्यमिक आणि प्रगत वाटचाल
[taxonomy_list name=”product_author” include=”362″]
‘योग’ हा विषय तसा अवघडच. कारण ते एक दार्शनिक तत्त्वज्ञान आहे. यामध्ये बुद्धीला पटलेले तत्त्वज्ञान स्वअनुभवानेच सिद्ध करायचे असते. प्रयोग करायचा असतो तो स्वत: वरच; तेही आत्मज्ञानासाठी, मुक्तीसाठी… हे सर्व साध्य करणे कठीण वाटत असले तरी तशी भीती मनात बाळगण्याचे कारण नाही. योगामुळे जीवन जगण्या-अनुभवण्याची कला अवगत होऊ शकते तसेच जीवनविषयक तत्त्वज्ञानाची ओळख होऊ शकते. म्हणूनच असा व्यापक आवाका असलेला ‘योग’ दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतोय; परंतु प्रत्यक्षात हे साधायचे कसे याविषयी गुरुजींनी (योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार) सोप्या शब्दांत मांडणी करून ठेवली आहे. त्याचेच विवेचन गीता अय्यंगार यांनी या पुस्तकात समर्थपणे केले आहे. या पुस्तकातून लेखिकेने योग हा विषय जीवनप्रवाहासारखा प्रवाहित करत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे; अवघड विषय सोपा करून सांगितला आहे, त्याचप्रमाणे योगसाधनेतील अडचणी लक्षात घेत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे सामान्यजनांना योगशास्त्र समजेल आणि त्यांना ते अनुभवताही येईल अशी शाश्वती या पुस्तकातून मिळते. या पुस्तकाचे वाचन, मनन व चिंतन करून सर्व योगसाधकांना निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल.
Reviews
There are no reviews yet.