229 | 978-93-82591-07-8 | Aaharavishayi Sare Kahi | आहाराविषयी सारे काही | Vasumati Dhuru | वसुमती धुरू | आहारतज्ज्ञांनी किंवा डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्याची आपली कितीही इच्छा असली, तरी पोषणमूल्यांचे क्लिष्ट ‘गणित’ सोडवून एखादा पदार्थ करताना कॅलरीज, कोलेस्टेरॉल, प्रथिनं आदींचं संतुलन साधणं कठीण जातं. त्यात त्या पदार्थाची चव किंवा वैशिष्टय राखण्याची कसरत करणं म्हणजे महाकठीणच काम! हे लक्षात घेऊनच ज्येष्ठ आहारतज्ज्ञ वसुमती धुरू यांनी या पुस्तकात पाककला व आहारशास्त्र यांचा सुयोग्य मेळ साधला आहे. सर्व प्रकारच्या विविध पाककृती पध्दतशीरपणे देऊन त्या खाली त्या पदार्थाच्या प्रत्येक वाटपातून प्रत्येकाला किती प्रमाणात प्रथिनं, खनिजं, जीवनसत्त्वं, तंतू, कॅलरीज इ. पोषणमूल्यं लाभतील याचा ‘रेडीमेड’ तक्ताच दिला आहे. तसेच हा पदार्थ कोणत्या आजारासाठी वा व्याधीसाठी पथ्यकारक ठरेल वा कुपथ्यकारक ठरेल, कुणी तो आवर्जून खावा, कुणी तो कमी प्रमाणात खावा, कुणी तो वर्ज्य करावा याचीही माहिती तिथल्यातिथेच दिली आहे. या पुस्तकाची हीच वैशिष्टये आहेत, म्हणूनच हे पुस्तक इतर पाककृती व आहारशास्त्रावरील पुस्तकांपेक्षा संपूर्णपणे आगळंवेगळं ठरावं. थोडक्यात, गृहिणींना पाककलेसोबतच आहारशास्त्रावरही सहजपणे पकड घेण्यास समर्थ करणारं व भान देणारं पुस्तक आहाराविषयी सारे काही… |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 263 | 24 | 17.7 | 1.4 | 425 |
The book is a complete solution to manage and implement a healthy diet. The book consists of information about different types of foods and nutrients. There are delicious recipes and with them is a total nutrient chart. Also, with each recipe health tips are given.
The book can we used to maintain healthy and calculated diet and also by people who have to manage their diet medically. |
Science | 225 | AVSK_RGB | AharvisaiSareKahiBC.jpg |
डाएट डॉक्टर
तुमच्या प्रकृतीनुसार वजन कमी करण्यासाठी परिपूर्ण डाएट प्लॅन देणारा
ईशी खोसला
अनुवाद : डॉ.अरुण मांडे
फक्त फलाहार करणे , फक्त पालेभाजी – भाकरीच खाणे , फक्त एक वेळेसच जेवणे … वजन कमी करण्याचे असे चित्र – विचित्र व अशास्त्रीय उपाय करून तुम्ही कंटाळला आहात का ? तर मग सोप्या , संयमित आणि शास्त्रीयदृष्ट्या योग्य अशा पद्धतीने वजन कमी करण्यासाठी तयार व्हा ! या पुस्तकाच्या लेखिका ईशी खोसला या दिल्लीस्थित विख्यात आहारतज्ज्ञ आहेत . पुस्तकात त्या ‘ ओव्हरवेट’च्या समस्येकडे वळण्याआधी भारतीयांची देहयष्टी , त्यांचा नित्य आहार आणि त्यांचं वजन वाढण्यामागची कारणं अशा मूलभूत घटकांची चर्चा करतात . त्यामुळे वजनासंदर्भातल्या संकल्पनांचं पूर्णपणे निराकरण होतं . या पुस्तकाची वैशिष्ट्य म्हणजे * भारतीयांच्या ठेवणीमुळे वजन कमी करण्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्याप्रमाणे मार्गदर्शन * प्रत्येकाच्या वजनानुसार कोणते अन्नघटक घ्यावेत याचं काटेकोर मार्गदर्शन * नाष्टा , दुपारचं जेवण , मधल्या वेळेचं खाणं आणि रात्रीचं जेवण कसं व काय घ्यावं याचं मार्गदर्शन * सहज – सोप्या व टेस्टी पाककृतींचा समावेश तुमच्या प्रकृतीनुसार वजन कमी करण्यासाठी शास्त्रसिद्ध उपाय सांगणारा असा हा खात्रीशीर ‘ डाएट डॉक्टर ‘ … !
Reviews
There are no reviews yet.