346 | 978-93-86493-25-5 | Aadhunik Bharatache Vicharstambha | आधुनिक भारताचे विचारस्थंब | Ramchandra Guha | रामचंद्र गुहा | Sharada Sathe | शारदा साठे | रामचंद्र गुहा यांचं नवं पुस्तक ‘भारत’ ही संकल्पना उलगडणारा ग्रंथ MAKERS OF MODERN INDIA आता मराठीत राममोहन रॉय, सय्यद अहमद खान, जोतीराव फुले, ताराबाई शिंदे, बाळ गंगाधर टिळक, रवींद्रनाथ ठाकूर, गोपाळ कृष्ण गोखले, महम्मद अली जीना, भीमराव आंबेडकर, ई.व्ही. रामस्वामी, राममनोहर लोहिया, एम.एस. गोळवलकर, मोहनदास गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, चक्रवर्ती राजगोपालाचारी, व्हेरियर एल्विन, हमीद दलवाई या १९ विचारवंतांच्या व्यक्तिरेखा व वैचारिक भूमिका यांचा एकाच ग्रंथातून परिचय करून देणारं व त्यातून भारताची वैचारिक जडणघडण स्पष्ट करणारं पुस्तक. |
Hard Bound | Books | Rohan Prakashan | Marathi | 595 | 22.6 | 14.6 | 3 | 800 |
Marathi translation of Makers of Modern India. Well known historian and author Ramchandra Guha has put together the thoughts and writings of greatest of Indian thinkers and visionaries, on whose thinking the modern India is shaped.
|
Political | राजकीय | 800 | Adhunik Bharatache | AdhunikBharatacheVicharstambhcoverBC.jpg |
सहकारधुरीण
भारतातील साखर उद्योगात सहकाराची ध्वजा रोवण्याचं पायाभूत कार्य करणारे विठ्ठलराव विखे पाटील यांचं समग्र चरित्र
[taxonomy_list name=”product_author” include=”348″]
भारतातील दीनदुबळया शेतकऱ्यांना कायम स्मरणात राहावीत अशी जी थोडी नावं आहेत, त्यामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांचं नाव अढळ असायला हवं. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावच्या विठ्ठलरावांनी शेतकऱ्यांना सहकाराचा मंत्र देऊन त्यांना दारिद्रय आणि अज्ञानाच्या कर्दमातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. पिळवणूक करणारे सावकार, धनदांडगे व्यापारी, राज्यसत्तेचे लबाड प्रतिनिधी, जातिभेद, वर्गविग्रह यांसारख्या बलाढय शत्रूंशी अहिंसक मार्गाने लढण्यासाठी त्यांनी अर्धपोटी भूमिपुत्रांची सेना संघटित करून त्यांचं यशस्वी नेतृत्व केलं… आणि त्यांच्याच सहभागाने ‘प्रवरा सहकारी साखर कारखाना’ हा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना १९५० मध्ये उभारला.
कारखान्याच्या उभारणीसोबतच विठ्ठलरावांनी समाजविकास व शिक्षणप्रसाराच्या कार्याला चालना दिली आणि त्यामुळेच सहकारी कारखाना म्हणजे क्रांतिकारक बदलाचं प्रारूप ठरलं. त्याचं लोण केवळ पश्चिम महाराष्ट्रात पसरलं असं नाही, तर त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं आर्थिक, सामाजिक व राजकीय चित्र बदललं. या प्रक्रियेत त्यांच्या सहकारी कारखान्याने उत्प्रेरकाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सहकारी चळवळीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला शेती-शक्तीचा आधार देण्यामध्ये विठ्ठलरावांचं योगदान मोठं ठरलं आणि त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने ‘सहकारधुरीण’ ठरतात.
विठ्ठलरावांच्या जीवनाच्या व कार्याच्या विविध टप्प्यांबाबत प्रदीर्घ काळ संशोधन करून सिध्द केलेला हा समग्र चरित्रग्रंथ ‘सहकारधुरीण’ महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांबाबत अंतर्दृष्टी देणारा ठरावा.
Reviews
There are no reviews yet.