इलेव्हन्थ अवर


एस. हुसैन झैदी
अनुवाद: रमा हर्डीकर-सखदेव


मुंबईत २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमांचे घाव अजून भरलेले नाहीत.
दिल्लीत पोलीस सुपरींटेंडंट विक्रम सिंग भारतभेटीला आलेल्या पाकिस्तानी उच्चायुक्ताला रागाच्या भरात कानाखाली वाजवतो…त्याच्या या धारीष्ट्र्यामुळे त्याला निलंबित केलं जातं…त्याचवेळी भोपाळच्या तुरुंगातून पाच दहशतवादी फरार होतात…मुंबईत त्यांच्या शोधमोहिमेवर विक्रांत सिंगलाच अनौपचारिकपणे नेमलं जातं. शोधकार्याला प्रचंड वेगाने सुरुवात होते. आणि हे सारं घडत असताना दूर कुठे तरी भर समुद्रात लक्षद्वीपला जाणाऱ्या क्रूजचं सोमाली चाच्यांकडून अपहरण होतं…काही ‘खास’ मागण्यांसाठी!
या सगळ्या गोष्टींतून सुरु होते, ती वेगवान घटनांची मालिका… या मालिकेत दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि भोपाळपासून लक्षद्वीपपर्यंत अनेक घटनांचे दुवे जोडले गेलेले असतात. उच्चपदस्थ नेते, पोलीस व लष्करी अधिकारी आणि काही ‘विशेष’ माणसं या शोधचक्रात गुंततात. त्यांच्या जोडीने नकळतपणे वाचकही या थरारमोहिमेत गुंतत जातो.
अपहरणकर्त्यांच्या मागण्या असतात तरी काय? त्यांचं कारस्थान काय असतं? उद्धटपणाच्या वागणुकीनंतरही या मोहिमेत विक्रमला सहभागी का करून घेतलं जातं? शोधमोहीम थांबते तरी कुठे?
हुसैन झैदी यांच्या खास शैलीत रंगत जाणारा थरारक आणि गूढ शोधमोहिमेचा विलक्षण प्रवास इलेव्हन्थ अवर…



250.00 Add to cart

एन्डगेम


एस. हुसैन झैदी
अनुवाद:रमा हर्डीकर-सखदेव


बीएसएफ’चे स्पेशल डायरेक्टर जनरल सोमेश कुमार यांना संरक्षण देण्याचं काम या गुरू-चेल्यावर सोपवण्यात आलं आहे. कुमार हे माजी पंतप्रधान परमेश्वर नायडू यांना भेटायला येण्याच्या मार्गावर आहेत. नायडूंच्या गाडीला अपघात झाल्यामुळे

ते हॉस्पिटलमध्ये आहेत. कुमारांच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला करतात आणि कुमारांना ठार मारण्यात ते यशस्वी होतात. ‘मोसाद’मधल्या मित्राकडून टीप मिळाल्यावर गुरू-चेला मुंब्याला पोचतात. इथे एका भाड्याच्या घरात अल मुकादम हा मुख्य संशयित लपून बसला आहे. तो त्यांच्या हातावर तुरी देतो, पण तत्पूर्वी तो दुसरा तिसरा कोणी नसून आयुब म्हणजे मजहर खान या त्यांच्या खबऱ्याचा भाऊ आहे, हे विक्रांतच्या लक्षात येतं. केसमधली गुंतागुंत वाढत जात असताना मेजर डॅनिएल; म्हणजे नायडूंची मुलगी वैशाली हिचा प्रियकर, त्यांच्याशी संपर्क साधतो. नायडूंच्या अपघातामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा दावा तो करतो.

राजकारण, कल्पनातीत दगाबाजी आणि अविश्वसनीय थरार याची गुंफण अर्थात….एन्डगेम



240.00 Add to cart

एस. हुसैन झैदी क्राइम सेट


एस. हुसैन झैदी
अनुवाद: रमा हर्डीकर-सखदेव


राजकारण, कल्पनातीत दगाबाजी आणि अविश्वसनीय थरार याची गुंफण असणारा एस. हुसैन झैदी क्राइम सेट!
१) इलेवन्थ अवर = रु. २५०
२) मुंबई अवेंजर्स = रु. ३९०
३) एन्डगेम = रु. २४०

एकूण संच ८८० रु. घरपोच



880.00 Add to cart

बारीक बारीक आवाज वाढत चाललेत


स्नेहा अवसरीकर


बारीक बारीक आवाज वाढत चाललेत या स्नेहा अवसरीकर यांच्या पहिल्यावहिल्या कथासंग्रहात माणसामाणसांतल्या नात्यांचे विविध अविष्कार पाहायला मिळतात.

कुठे काका-पुतण्यातल्या पारंपारिक नात्याच्या पलीकडे जाणारं, आपल्या पुतण्याबरोबरचं आत्मीय नातं जपणारे केशवकाका तर कुठे स्वतःच्या एकाकी आयुष्याचं प्रतिबिंब एका कबुतराच्या पिल्लात पाहून त्याच्याशी नातं जोडणाऱ्या वृंदाताई. कधी आपल्या दिवंगत सावत्र सासूचा केवळ फोटो पाहून तिच्याशी नातं जुळवलेली नंदी तर कधी स्वतःच्या अस्तित्वाचं भान आल्यावर स्वतःशीच नातं जोडणारी ‘मी’.

नवऱ्याला आलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या मेल्स वाचून हादरून गेलेली एखादी सुभद्रा अखेर कुठलीच नाती संपूर्णपणे आपली असणार नाहीत, हे समजून घेते तर एखादी रश्मी काही नाती निर्घृणपणे तोडावी लागतात, याचं भान ठेवून ईश्वरबरोबरच आपलं नातं मर्यादित अंतरावर राखण्याची शहाणीव दाखवते. एकीकडे युनियनद्वारे संपूर्ण भारतातल्या रेडिओ स्टेशन्सवर काम करणाऱ्या स्टाफशी नातं जोडू पाहणारी राधिका तर दुसरीकडे रेडिओतल्या आपल्या सहकाऱ्याबरोबर निर्माण झालेलं अबोल, अस्फुट नातं मनातच ठेवत त्याच्यापासून दूर होणारी इशा ….

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उमलणाऱ्या आणि मिटणाऱ्या…. अशा या तरल नात्यांच्या कथा वाचकांच्या मनात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांच्या स्मृती जाग्या करतील.

सुबोध जावडेकर



250.00 Add to cart

मुंबई अव्हेंजर्स


एस. हुसैन झैदी
अनुवाद: रमा हर्डीकर- सखदेव


ही थरारक कथा आहे, देशविघातक कारस्थानं करणाऱ्यांना पृथ्वीतलाच्या कोपऱ्या कोपऱ्यांतून हुडकून काढण्यासाठी केलेल्या एका धाडसी ऑपरेशनची!
मुंबईवर २६/११चा भीषण दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा देशाच्या सुरक्षेबद्दल, सुरक्षाव्यवस्थांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले. सर्वसामान्यांच्या मनातले ते प्रश्न, सुरक्षादलांच्या मनातली खदखद आणि तीव्र संताप यांना केंद्रबिंदू मानून एक धाडसी गट महत्वाकांक्षी ऑपरेशन आखतं, अशी एकंदर या थरारनाट्याची मध्यवर्ती कल्पना आहे.
या ऑपरेशननुसार २६/११च्या मास्टरमाइंडचा देश-विदेशात शोध घेतला जातो. त्यासाठी टर्की, दुबई, इंग्लंड, स्वीडन, सिंगापूर, पाकिस्तान आणि अर्थात भारतातही जोरदार चक्र फिरवली जातात आणि दहशतवाद्यांना जेरबंद केलं जातं. सत्यघटनांच्या तपशिलांभोवती गुंफलेल्या या काल्पनिक कथानकातील बौद्धिक डावपेच मती गुंगवून टाकतात…

पानापानांवर वाचकांना खिळवून ठेवणारा थरार… मुंबई अॅव्हेंजर्स



390.00 Add to cart

मर्डर इन माहीम


जेरी पिंटो
अनुवाद : प्रणव सखदेव


माटुंगा रेल्वे स्टेशनच्या टॉयलेटमध्ये सापडलेला एका तरुणाचा मृतदेह आणि तिथून सुरू झालेला शोधाचा एक प्रवास… क्षणोक्षणी वेगळ्याच व्यक्तींकडे वळणारी संशयाची सुई आणि या प्रवासात सतत येणारी अनपेक्षित वळणं !

इन्स्पेक्टर झेंडे आणि निवृत्त पत्रकार पीटर डिसूझा यांच्या या शोधप्रवासात उलगडते – ‘मुंबई’ या मायानगरीच्या पोटात दडलेली एक वेगळीच दुनिया…यातलं ‘गे’ व्यक्तींचं जग, त्याला असणारी अनेक अस्तरं ! इथली अगतिकता…शत्रुत्व…स्पर्धा… मैत्री…क्रौर्य…अशा अनेक भावनांचा प्रत्ययकारी अनुभव ही कादंबरी देते.

संवेदनशील पत्रकार आणि प्रतिभावान लेखक जेरी पिंटो यांचं मानवी नातेसंबंधांतल्या अनेक कंगोऱ्यांचा वेध घेणारं आणि ‘अस्वस्थ’ मुंबईचं वास्तव दर्शन घडवत एका खुनाच्या मुळाशी जाणारं… मर्डर इन माहीम !



250.00 Add to cart

जोकर इन द पॅक

आय.आय.एम.च्या विद्यार्थीजीवनाकडे पाहू जाता अनादराने


रितेश शर्मा

नीरज पहलाजानी

अनुवाद: चित्रा वाळिंबे


आय.आय.एम.’मधील विद्यार्थीजीवनाचा लक्षवेधक आणि वाचणाऱ्याला मतीगुंग करेल असा लेखाजोखा . मला वाटतं , माझ्या वर्गमित्रांपैकी अर्धे – अधिक जण यातील कथानायकाच्या व्यक्तिरेखेत अगदी चपखल बसतील . वास्तवदर्शी चित्रण , ‘ राजकीयदृष्ट्या अचूक ‘ गोष्टींचा अभाव आणि नायकाच्या प्रेमजीवनाला असलेला मानवी ओलावा हे या कादंबरीचे कळीचे घटक ठरतात . उत्तेजित होणं , निराशा येणं , मन : क्षोभ होणं , अत्यानंद होणं असे मानवी भावभावनांचे अनेकविध रंग टिपून लेखकद्वयाने आपलं ‘ काम ‘ सर्वोत्तमरीत्या पार पाडलय … आणि आपलं काम सर्वोत्तमरीत्या पार पाडणं हा तर ‘ आय.आय.एम.’च्या जीवनाचा आंतरिक भागच ठरतो ना !

एस रामकृष्णन ( आयआयएमसी )

एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट अँड रीजनल हेड

उत्तर भारत , एचडीएफसी

या कादंबरीचं वाचन म्हपाजे खूपच रंजक असा अनुभव ठरतो . ‘ एमबीए ‘ शिक्षण व्यवस्थेच्या अंतरंगाबाबत एका व्यक्तीने ‘ अंतस्था’च्या भूमिकेतून चितारलेला असा हा अनुभव आहे . जरी ही काल्पनिक गोष्ट असली तरी त्या गोष्टीचा वास्तवाशी इतका निकटचा संबंध आहे की बहुतांश ‘ एमबीए ‘ पदवीधारकांना स्मरणरंजनाचा अस्सल अनुभव प्राप्त होईल … आणि कदाचित् काहींच्या मनात चीडही निर्माण होईल !

विनित एस चौहान

ग्लोबल बिझिनेस मॅनेजर

जे पी मॉर्गन चेस

प्रेसिडेंट, आयआयएमएल अॅल्युम्नी असोसिएशन



140.00 Add to cart

द ग्रेप्स ऑफ रॉथ

विस्थापित-स्थलांतरितांच्या जीवनावरील जगप्रसिद्ध कादंबरी


जॉन स्टाइनबेक
अनुवाद: मिलिंद चंपानेरकर


लोकाभिमुख अमेरिकन लेखक म्हणून नावाजलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त जॉन स्टाइनबेक यांच्या ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या १९३९ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या दीर्घ कादंबरीने अमेरिकेतील विस्थापित-स्थलांतरितांच्या समस्येला वाचा फोडली आणि समाज ढवळून निघाला. या वास्तववादी कादंबरीद्वारे त्यांनी या समस्येच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पैलूंवर मोठ्या सर्जनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून भाष्य केलं. ही कादंबरी १९३०च्या दशकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील असली, तरी भारतातील विस्थापितांच्या समस्यांबाबत आजही विचारप्रवृत्त करू शकेल अशी आहे.

भांडवलकेंद्री मोठ्या शेतीच्या धोरणाच्या पुरस्कारार्थ मध्य अमेरिकेतील लाखो लहान-मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींवरुन हुसकावून लावलं गेलं… पश्चिम अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील कापसाच्या, द्राक्ष-संत्र्याच्या बगिच्यांमध्ये काम मिळेल, या आशेने या विस्थापित कुटुंबांनी दोन हजार मैलांचा खडतर प्रवास करून केलेलं स्थलांतर… त्या प्रक्रियेत वाट्याला आलेलं दैन्य, निर्वासित छावण्यांमधील भीषण अमानवी जीवन आणि उद्धवस्थता…
आणि याच प्रक्रियेदरम्यान त्यांच्या जाणिवेत घडून आलेले सूक्ष्म बदल आणि आत्मिक क्षोभाची भावना…
एक विशाल बहुपेडी पट उलगडून दर्शविणारी ही एक हृदयस्पर्शी कादंबरी.

सर्जनशील रचना आणि आगळी संवादशैली या प्रमुख वैशिष्टयांनिशी साहित्य क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणाऱ्या या कादंबरीचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारप्राप्त मिलिंद चंपानेरकर यांनी साधलेला हा तितकाच प्रयोगशील असा मराठी अनुवाद.

लोकांच्या समस्या लोकांसाठी लोकभाषेत व्यक्त करणारी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’.


700.00 Add to cart

फॅन्टॅस्टिक फेलूदा – ‘ब्लॅक’ संच

४ कथासंग्रहात एकूण १२ रहस्यकथा


[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत.
चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!

 

१. अनुबिसचं रहस्य + ३ कथा
२. चालत्या प्रेताचं गूढ + २ कथा
३. टिंटोरेट्टोचा येशू + १ कथा
४. केदारनाथची किमया + २ कथा



560.00 Add to cart

फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा गोल्डन संच

४ कथासंग्रहात एकूण ११ रहस्यकथा


[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत.
चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!



600.00 Add to cart

आर.के. नारायण संच

४ पुस्तकांचा सप्रेमभेट संच


आर.के. नारायण
अनुवाद : उल्का राऊत 


‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.

अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.

संचात असलेली ४ पुस्तकं :

१. द इंग्लिश टीचर

२. द बॅचलर ऑफ आर्टस

३. मालगुडीचा नरभक्षक

४. महात्म्याच्या प्रतीक्षेत…


855.00 Add to cart

शिन्झेन किस

शिंची होशी
अनुवाद : निस्सीम बेडेकर


शववाहिकेतून गायब झालेलं प्रेत,
स्मृतिभ्रंश करून टाकणारे अज्ञात ग्रहावरचे हल्लेखोर, पूर्णपणे रिकामी असलेली डिलक्स तिजोरी, मुलांना शिस्त लावणारे रागीट काका…
…जपानचे सुप्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आणि लघुकथांचे दैवत अशी ख्याती असलेले शिन्इची होशी यांच्या अलौकिक लेखणीतून साकारलेल्या अशा या २१ अद्भूतरम्य कथा !
अफलातून कथानक आणि धक्कादायक शेवटामुळे वाचकांना थक्क करणाऱ्या या कथा गंभीर विषयही अगदी सहजपणे वाचकांसमोर सादर करतात.
जपानी भाषेवर प्रभुत्व असलेले निसीम बेडेकर यांनी होशी यांच्या निवडक कथांचा थेट जपानी भाषेवरून मराठीत केलेला रसाळ अनुवाद…
`शिन्झेन किस’


195.00 Read more

आचार्यांच्या खुनाचं प्रकरण + १ कथा

फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा


सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन


फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या २ कथा…

१. ‘भारत ऑपेरा’ या नाटक कंपनीत काम करणारे इंद्रनारायण आचार्य एके दिवशी फेलूदाकडे मदत मागायला येतात. इतर कंपन्यांचे मालक आपल्या कंपनीत येण्यासाठी आचार्यांना मोठमोठ्या ऑफर्स देत असतात. त्यामुळे त्यांची मन:स्थिती द्विधा झालेली असते. कारण भारत ऑपेराने त्यांना मानसन्मान दिलेला असतो, त्यांची काळजी घेतलेली असते. हा दोन गटांचा संघर्ष कोणत्याही थराला जाईल, अशी भीती आचार्य यांना वाटत असते; होतंही तसंच! आणि मग आचार्यांच्या खुनाचं प्रकरण अधिकच गूढ-गहिरं होत जातं…

२. ख्यातनाम चित्रपटकर्ता पुलक घोषाल यांनी लालमोहनबाबूंच्या एका कादंबरीवर चित्रपट तयार करायचं ठरवलेलं असतं. त्यात लालमोहनबाबूंना लहानशी भूमिकाही दिलेली असते. शूटिंग दार्जिलिंगला असल्याने लालमोहनबाबू फेलूदा आणि तपेशलाही सुट्टी घालवण्यासाठी तिथे घेऊन जातात. फेलूदाही एकही काम न स्वीकारता, सुट्टीची मजा लुटायची असं ठरवतो. पण ज्या घरात त्यांचं शूटिंग होणार असतं, त्या घराच्या मालकाचा खून होतो आणि मग फेलूदाला दार्जिलिंगमधील खुनाचं रहस्य सोडवावंच लागतं!


150.00 Add to cart

गाइड


आर. के. नारायण
अनुवाद : उल्का राउत 


आर. के. नारायण हे जगभरात मान्यताप्राप्त असे इंग्रजी साहित्यिक.
त्यांच्या ‘द गाइड’ या इंग्रजी कादंबरीला १९६०मध्ये ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला आणि एक श्रेष्ठ पौर्वात्य साहित्यकृती म्हणून ती जगभर बहुचर्चित ठरली. १९६५मध्ये याच कादंबरीवर आधारित विजय आनंद दिग्दर्शित ‘गाइड’ हा कलात्मक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कादंबरीचा व्यापक आशय व त्यातील राजू गाइड, नृत्यांगना रोझी, तिचा पती मार्को आदी या मातीतल्या व्यक्तिरेखा सर्वतोमुखी झाल्या.
आज पाच दशकं उलटून गेली तरी अनेक प्रश्न चर्चेत राहिले.
एका सामान्य भोगवादी राजू गाइडचं आध्यात्मिक ‘स्वामी’मध्ये रूपांतर होऊ शकतं?
एका कलासक्त विवाहित स्त्रीने पतीला सोडून नृत्यकलेचा ध्यास घेणं, राजूसारख्या परपुरुषासोबत राहणं नैतिकतेच्या चौकटीत बसतं?
मूळ कथेत व चित्रपट कथेत काय फरक होता? तो योग्य होता का?
यांसारख्या अनेक प्रश्नांचा उलगडा ही कादंबरी वाचल्याशिवाय होणं अशक्यच.
सर्जनशीलतेचा ध्यास, ज्ञान-संशोधनाचा ध्यास, भोगवाद व अध्यात्म अशा अनेक गोष्टींचं एकात्म चिंतन करायला लावणार्‍या मूळ इंग्रजी कादंबरीचा उल्का राऊत यांनी सिध्द केलेला हा अनुवाद. कल्पनारम्यता आणि अध्यात्म यांचा अभूतपूर्व मेळ घालणारी, अत्यंत रोचक व तत्त्वज्ञानात्मक डूब असलेली ही कादंबरी मराठी वाचकांसाठी आजही एक आगळी आनंदपर्वणी ठरते- गाइड!


200.00 Read more

अनुबिसचं रहस्य आणि इतर ३ कथा

फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा


सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन


फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या ४ कथा…
१. किमती वस्तूंचे संग्रहालय असलेल्या राजनबाबूंना एके दिवशी छापील अक्षरं कापून तयार केलेलं धमकीचं पत्र येतं… नंतर एक मुखवटाधारी माणूसही त्यांना घाबरवून सोडतो. कोण असेल हा ‘दार्जिलिंगचा धोका’दायक माणूस?
२. कैलास चौधरींना आलेल्या एका निनावी पत्रात त्यांच्याकडचं एक मौल्यवान रत्न विशिष्ट ठिकाणी आणून देण्याबद्दल सांगितलेलं असतं. आणि तपास करताना फेलूदासमोर येतं ‘कैलास चौधरींच्या रत्ना’ विषयी एक अनपेक्षितच सत्य!
३. किमती वस्तूंचे संग्राहक नीलमणीबाबू यांना इजिप्तशियन चित्रलिपीत लिहिलेलं एक पत्र येतं. त्यात धमकी तर नाहीये ना, याचा शोध घेताना दुसर्‍या एका संग्राहकाकडचीही इजिप्तशियन मूर्ती चोरीला जाते. चित्रलिपीसारखं गूढ वाटणारं ‘अनुबिसचं रहस्य’ फेलूदा कसं सोडवेल?…
४. राधारमण समाद्दार या काहीशा श्रीमंत, विक्षिप्त पण बुध्दिमान संगीतवाद्य संग्राहकाचे अखेरच्या क्षणी शब्द असतात – ”माझ्या नावात… किल्ली… किल्ली…!” या ‘किल्ली’त दडलेलं रहस्य फेलूदा कसं उकलेल?


140.00 Add to cart

काठमांडूतील कर्दनकाळ

फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा


[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


कोलकात्याच्या हॉटेलमधील एका अनोळखी इसमाच्या खुनाचा माग काढत फेलूदा व त्याचे मित्र काठमांडूत त्यांचा जुना शत्रू मगनलाल मेघराजच्या थेट गुहेत जाऊन पोहोचतात. स्वयंभूनाथ येथे घडलेली एक घटना, प्रार्थनाचक्रांचे उत्पादन करणार्‍या कारखान्यावर आकस्मिक छापा, कॅसिनोतील एक थरारक रात्र आणि एलएसडीमुळे जटायूंची झालेली घनचक्कर अवस्था या सर्व गोष्टींमुळे हे साहस भलतंच रंजक, रोचक व रोमहर्षक होऊन जातं. अखेर सनसनाटी उत्कर्षबिंदूच्या वेळी चलाख फेलूदा नकली औषधांचा घोटाळा उघडकीस आणून पुन्हा एकवार यशस्वी होतो.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे शेवटचे पुस्तक.

विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा  बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्‍या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्‍या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!


95.00 Add to cart
1 2 4