अष्टपैलू स्मार्टफोन

आपल्या अँड्रॉइड मोबाइलमधील सर्व सोयी-सुविधा व अ‍ॅप्स आत्मविश्वासाने वापरण्यासाठी सचित्र मार्गदर्शन


कॉम्प्यूटर सॉफ्टवेअर व इंटरनेट-वेबसाइट्स या क्षेत्रांत गेल्या दोन दशकांपासून काम करत असून त्यांना सोप्या भाषेत तंत्रज्ञानविषयक लिखाण करायला आवडतं. त्यांनी 'दै. सकाळ'मध्ये 'ई- कल्चर' व 'साप्ताहिक सकाळ'मध्ये 'तंत्रज्ञानात नवे' या स्तंभांचे दीर्घकाळ लेखन केलं आहे. याशिवाय अन्य वृत्तपत्रांत व आकाशवाणीकरताही प्रासंगिक लेखन केलं आहे. ते पुस्तकांचे व लेखांचे ( मराठी व इंग्रजी) अनुवाद, संपादन आणि लेखनही करतात.

श्री. व सौ. देशमुख यांनी मुलांच्या आग्रहाखातर स्मार्टफोन घेतला खरा, पण तो वापरताना काही चुकलं तर कुठेतरी गडबड होईल, या भीतीने ते अँड्रॉइड स्मार्टफोनचा पूर्ण वापर करताना बिचकत होते.
पण थोड्याच दिवसांत, श्री. व सौ. देशमुख स्मार्टफोनला केवळ सरावलेच नाहीत, तर आत्मविश्वासाने फोटो काढून ते वॉट्सअ‍ॅप करू लागले, आणि हवे ते गेम्स, अ‍ॅप्सही डाउनलोड करू लागले! ही किमया घडवली होती, अष्टपैलूू स्मार्टफोन या पुस्तकरूपी मित्राने! या मित्राने त्यांना खालील गोष्टी सचित्र समजावून सांगितल्या :

– बॉक्समधून आलेला नवाकोरा स्मार्टफोन कसा जोडायचा?
– कॉन्टॅक्ट्स सेव्ह कसे करायचे, त्यांचे ग्रुप कसे करायचे?
– एसएमएस, ग्रुप एसएसएस कसे करायचे?
– कार्यक्रमाला जाताना फोन ‘सायलेंट’ कसा करायचा?
– वाय-फाय स्मार्टफोनला कसे जोडून घ्यायचे?
– ईमेल कसा करायचा? त्याला फाइल कशी जोडायची?
– फोटो किंवा व्हिडिओ कसा काढायचा, तो शेअर कसा करायचा?
– वॉट्सअ‍ॅप, फेसबुक इ. अ‍ॅप्स कशी वापरायची?
– वॉलपेपर, थीम्स कशा बदलायच्या?
– आणि अर्थात, ऑनलाइन शॉपिंग कसं करायचं… आणि अनेक!

या पुस्तकातल्या छोट्या-छोट्या, पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्समुळे श्री. व सौ. देशमुख बिनधास्त स्मार्टफोनमधल्या उपलब्ध सोई-सुविधा वापरू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच तुम्हीही या अष्टपैलू स्मार्टफोनचं ‘बोट’ धरा, स्मार्ट व्हा!


125.00 Read more

स्मार्टपणे व्हा कॅशलेस

आपले आर्थिक व्यवहार निर्धास्तपणे `कॅशलेस’ पद्धतीने करण्यासाठी सचित्र मार्गदर्शन


मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.

देसाई काका-काकूंकडे डेबिट कार्ड तर होतं, पण ते कसं वापरायचं हे त्यांना माहिती नव्हतं. खरंतर, माहिती नसण्यापेक्षा त्यांच्या मनात कार्ड वापरण्याविषयी भीती होती. मग एके दिवशी त्यांना सोसायटीतल्या हास्यक्लबमधल्या देशमुखकाकांनी एक पुस्तक भेट दिलं. या पुस्तकात पुढील विषय सचित्र समजावून सांगितले होते –
* क्रेडिट/डेबिट कार्डाचा वापर करून ऑनलाइन खरेदी कशी करायची? कार्ड स्वाइप करताना काय करायचं?
* रेल्वेचं कवा सिनेमाचं तिकिट ऑनलाइन कसं बुक करायचं?
*ऑनलाइन वीज बिल कसं भरायचं?
* NEFT/ RTGS, UPI इत्यादी सेवा कशा वापरायच्या?
* इंटरनेट बँकिंग व मोबाइल बँकिंगमधल्या सुविधा कोणत्या, त्या कशा वापरायच्या?
* सशक्त पासवर्ड्स कसे तयार करायचे?
* ई-वॉलेट्समध्ये पैसे कसे भरायचे आणि ते कसे वापरायचे?
* लघु व मध्यम उद्योजकांनी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी कोणती साधनं घ्यायची?
* सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना, इत्यादी
या पुस्तकातल्या टिप्स आणि मार्गदर्शनामुळे देसाई काका-काकू निर्धास्तपणे कॅशलेस व्यवहार करू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच आजच्या स्मार्टयुगात या पुस्तकाच्या सोबतीने तुम्हीही स्मार्टपणे व्हा कॅशलेस !


125.00 Add to cart