नकटीचं नाक

वाचा जाणा करा संच


कविता महाजन


सगळी मुलं मैत्रेयीला नकटी-नकटी म्हणून चिडवायला लागली

आणि चिडून-रडून मैत्रेयीचं नाक रागाने लाल झालं.

तिने घरात येताच जाहीर केलं, “मला हे नाकच नको आहे!”

आई म्हणाली, “बरं. नको तर नको. कापून टाकूयात.”

मैत्रेयीला प्रश्न पडले : माणसाचं नाक असं कापून टाकता येतं का?

नाक नसलेला माणूस कसा दिसेल?

मुळात आपल्याला नाक असतंच कशासाठी?

जर नाकच नसतं, तर आजी म्हणते तसे

नाकाने कांदे सोलता आले नसते.

आजीला इतक्या म्हणी माहीत कशा असतात?

बाकीच्या प्राण्यांची-पक्ष्यांची नाकं कशी असतात?


50.00 Add to cart

पाणीदार डोळे

वाचा जाणा करा संच


कविता महाजन


खूप गोष्टी सांगणारी मावशी गावाला परत गेली आणि

मग मैत्रेयीला खूप रडू येऊ लागलं.

तिला गोष्टीतला सोनेरी केसांच्या असंख्य वेण्या घातलेला

गॉगल लावणारा सिंह आठवला.

रंगीत काचांचा चष्मा घातला की सगळं जग कसं रंगीत दिसतं,

याची तिला मजा वाटत होती, तेही आठवलं.

डोळ्यांचं काम काय? डोळ्यांनी दिसतं कसं?

सगळ्यांच्या डोळ्यांचा रंग वेगवेगळा का असतो?

आंधळा मासा शिकार कशी करतो?

अनेक प्रश्न तिच्या मनात होते.

सगळं जग पाहिलं पाहिजे, असं तिला वाटत होतं.

तेवढ्यात आजी म्हणाली, “लवकर घरी ये गं.

मी तुझी डोळ्यांत तेल घालून वाटत पाहत असते!”

डोळ्यांत तर काजळ घालतात ना…!

मग या वाकप्रचाराचा अर्थ काय?


50.00 Add to cart

न ऐकणारे कान

वाचा जाणा करा संच


कविता महाजन


बाबाने सांगितलं की, “आज ‘नो हॉर्न डे’ आहे.”

“तो कशासाठी असतो?” मैत्रेयीने विचारलं.

बाबाने उत्तर दिल्यावर त्या उत्तरामधून पुन्हा अनेक प्रश्न

तिच्या मनात उगवले. ध्वनिप्रदूषण म्हणजे काय?

गोंगाट आणि कल्ला म्हणजे मज्जा की त्रास?

ध्वनी मोजता कसा येतो आणि तो कशाने मोजतात?

सुमनमावशीच्या मुलीला कान तर आहेत,

पण तिला ऐकू का येत नाही?

डोळ्यांत कचरा जाऊ लागला की पापण्या पटकन बंद होतात,

तसं झाकण आपल्या कानांना का नसतं?

हत्ती इतक्या मोठ्या कानांनी काय करतो?

पक्ष्यांना कानच नसतात का?


50.00 Add to cart

केसांची करामत

वाचा जाणा करा संच


कविता महाजन


आजीच्या मते,

“अठरा डब्यांच्या ट्रेन इकडून तिकडे जात असतात ना,

तशा मैत्रेयीच्या मेंदूतून प्रत्येक बाबतीत

अठराशे प्रश्नांच्या ट्रेन फिरत असतात !”

मैत्रेयीचे आजचे प्रश्न होते केसांबद्दलचे !

मैत्रेयीचे केस छोटे होते, पण तिला

लांब वेणी घालायला आवडत असे.

आईचे केस तर कापलेले होते.

आजी तिच्या केसांचा आंबाडा घाले आणि

तिच्याकडे तिच्या आजीने दिलेलं

आंबाड्यावर लावायचं सोन्याचं फूलही होतं.

आजोबांचे केस गायब होऊन टक्कल पडलेलं होतं.

मैत्रेयीच्या घरी एके दिवशी बाबाची मैत्रीण सुकेशा आली.

तिचे केस पायांच्या घोट्यापर्यंत लांब होते.

तिची वेणी घालून देताना आजीला चांगलीच अद्दल घडली!


50.00 Add to cart

डोकं आहे का खोकं

वाचा जाणा करा संच


कविता महाजन


आपल्या डोक्यात कांदेबटाटे भरलेले आहेत की

दगड भरलेले आहेत? सगळ्यांची बोलणी खाऊन

मैत्रेयीला प्रश्न पडलाय.

मैत्रेयीची आई आहे डॉक्टर.

तिच्याकडे अशा प्रश्नांची सगळी उत्तरं असतात.

मैत्रेयीच्या मते, जगात असा एकही प्रश्न नाही,

ज्याचं उत्तर आईला माहीत नाहीये.

त्यानुसार आईने सांगितलं की, ‘डोक्यात असतो तो मेंदू.’

भुताच्या सिनेमात मैत्रेयीने माणसाच्या डोक्याची कवटी

पाहिलेली होती, पण प्रत्यक्षात नाही.

‘तुला ती नंतर कधीतरी दाखवेन,’ असं आईने कबूल केलं

आणि मेंदू कुठे असतो, कसा दिसतो, कोणकोणती कामं करतो

या सगळ्याची माहिती दिली. इतकी माहिती मिळाल्यामुळे मैत्रेयीला

एकदम पाच आक्रोड खाल्ल्यावर वाटतं तसं हुशार वाटू लागलं !


50.00 Add to cart

घडाळ्याचे हात आणि टेबलाचे पाय

वाचा जाणा करा संच


कविता महाजन


`इतकी कामं करायला मला काही दहा हात नाहीयेत.

सगळे जण चटाचटा पाय उचला आणि या माझ्या मदतीला.”

आई कधीकधी म्हणते. मग आई, बाबा, आजी, आजोबा

आणि मैत्रेयी अशा पाच जणांचे मिळून

खरोखरच दहा हात होतात आणि सगळी कामं पटापटा होतात.

पाय जास्त काम करतात की हात जास्त कामं करतात?

हातच जास्त कामं करत असणार!

हात लिहितात, चित्रं काढतात, वाद्यं वाजवतात,

स्वयंपाक करतात, घर स्वच्छ करतात, ऑपरेशन करतात,

झाडांना पाणी घालतात… बापरे… कित्ती कामं!

आणि पाय चालतात, पळतात, फुटबॉल खेळतात,

नाचतात, लाथा मारतात… म्हणजे पायही महत्त्वाचे आहेतच.

पण आई जसं दहा हात हवेत म्हणते तसं

कधी दहा पाय हवेत असं मात्र कधीच का नाही म्हणत ?


50.00 Add to cart

बोंबलणारा घसा

वाचा जाणा करा संच


कविता महाजन


मैत्रेयीने मानेने ‘हो-हो’ आणि ‘नाही-नाही’ केलं की

आजी म्हणायची, “बोलता येत नाही का तुला?”

आणि बोललं की म्हणायची,

“मैत्रेयी, इतकी बडबड करून तुझा घसा कसा दुखत नाही?”

म्हणजे आवाज न करता बोललं तरी

मानेचाच वापर करावा लागतो आणि

आवाज करून बोलायला तर

त्याच मानेत असलेलं स्वरयंत्र आवश्यक असतं.

मैत्रेयीला प्रश्न पडला की, मानेचा अजून कोणता उपयोग असतो?

मान नसती तर आपलं डोकं

साप, बेडूक किंवा वा माशाच्या डोक्यासारखं दिसलं असतं.

मान तर हवीच. मान नसेल तर आजी पोहेहार कुठे घालणार?

पण मग मान, कंठ, घसा असे वेगवेगळे शब्द का वापरतात लोक?


50.00 Add to cart

दातांमागची भुतं

वाचा जाणा करा संच


कविता महाजन


मैत्रेयीला तसा नेहमी-नेहमी दात घासण्याचा कंटाळा येत नसे,

पण कधी-कधी येतही असे. त्यात पुन्हा जिभेची भर.

तोंडात दात कशासाठी असतात, ते मैत्रेयीला माहीत होतं,

पण जीभ कशासाठी असते हे मात्र माहीत नव्हतं.

तोंड म्हणजे काय…

दोन ओठ, त्यांच्या आत दाढा, दात, जीभ…

तोंडाने आपण खातोपितो आणि बोलतो-गातोही.

म्हणजे एकच तोंड दोन कामं करतं.

पण अशी दोन-दोन कामं करणं तोंडाला कसं काय बुवा जमतं?

मैत्रेयीच्या डोक्यात प्रश्नांची फौज उभी राहिली.

मग तिच्या मदतीला आले आई-बाबा, आजी-आजोबा

आणि अर्थातच कॉम्प्युटरराव!


50.00 Add to cart

पोटाचं कपाट

वाचा जाणा करा संच


कविता महाजन


आपल्या पोटात कावळे असतात की आतडी?

आणि पोटात जर कावळे नसतील, तर भूक लागल्यावर

पोटातले कावळे ओरडतात असं आजी म्हणते, त्याचा अर्थ काय बरं असेल?

फुलपाखराचं पोट कसं असतं आणि हत्तीचं कसं?

पक्षी उडता-उडता जेवतात, तर आपण चालता-चालता का नाही जेवू शकत?

कीटक फुलांमधला मध खातात, पण काही-काही फुलंच या कीटकांना खाऊन टाकतात म्हणे!

मैत्रेयीच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तर आजीला आणि आजोबांनाही माहीत नसतात.

मग आजी आजोबांना म्हणते, “तुम्ही आता कॉम्प्युटर का शिकून घेत नाही?

त्याच्या पोटात जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ठेवलेली असतात म्हणे !”


50.00 Add to cart