हॅपी लग्न.कॉम संच

सुबोध व समंजस समुपदेशन


[taxonomy_list name=”product_author” include=”486″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”494″]


लग्नाचं नातं कायम बहरत ठेवण्यासाठी एक आश्वासक सोबती…


390.00 Add to cart

हॅपी लग्न.कॉम – २

वैवाहिक आयुष्याची पुढची इनिंग नव्या उमेदीने बहरवण्यासाठी…


[taxonomy_list name=”product_author” include=”486″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”494″]


लग्नाला पाच-सहा वर्षं झाल्यानंतर संसारात जेव्हा तोचतोचपणा वाटू लागतो, जोडीदार नीरस आणि कंटाळवाणा होऊन जातो तेव्हा आपल्या या सर्वांत जवळच्या नात्याला खतपाण्याची गरज लागते. हे खतपाणी म्हणजे नेमकं काय, कशाप्रकारे हे नातं पुन्हा एकदा बहरू शकतं, दृढ आणि सुंदर होऊ शकतं याचं प्रभावी मार्गदर्शन या पुस्तकात आहे.
विजय नागास्वामी यांनी लग्नाच्या नात्यात उद्भवणार्‍या अनेक नाजूक आणि जटिल समस्यांची ओळख करून दिली आहे. वरवर क्षुल्लक वाटणार्‍या गोष्टी पुढे जाऊन क्लिष्ट समस्येचं रूप कसं धारण करू शकतात हे त्यांनी अनेक उदाहरणांमधून स्पष्ट केलं आहे.
नवरा व बायको यांचे भिन्न स्वभाव, वेगळया आवडी-निवडी, दोन टोकाची ध्येयं, लुडबुड करणारे त्यांचे नातेवाईक इथपासून ते लैंगिक समस्या आणि विवाहबाह्य संबंध असा एक मोठा पट या पुस्तकात त्यांनी मांडला आहे.
केवळ समाजाला घाबरून किंवा सोयीचं आहे म्हणून लग्न टिकवण्यात अर्थ नाही. तुम्हाला ज्याच्या जोडीने आयुष्याचा आनंद उपभोगायचा आहे, कौटुंबिक सुख वृध्दिंगत करायचं आहे, अशा नात्याला कायम बहरत ठेवण्यासाठी वाचा…



195.00 Add to cart

हॅपी लग्न.कॉम – १

सहजीवनाची सुरुवात फुलवण्यासाठी…


[taxonomy_list name=”product_author” include=”486″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”494″]


लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असला, तरी निकोप सहजीवनाकडे वाटचाल होणं म्हणजेच खर्‍या अर्थाने लग्न यशस्वी होणं, असा कानमंत्र क्वचितच मिळतो. आणि मग बरेच जण ‘पदरी पडलं अन् पवित्र झालं’ म्हणत लग्न रेटत तरी राहतात किंवा मागचा-पुढचा विचार न करता ‘काडीमोड’ तरी करतात.
प्रसिध्द मानसोपचारतज्ज्ञ विजय नागास्वामी यांनी या पुस्तकात लग्न यशस्वी होण्यासाठी लग्नाआधीपासूनच त्याचा पाया भक्कम कसा करावा, सहजीवन कसं ‘फुलवत’ न्यावं, हे सहजसोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. गेल्या काही वर्षांत, स्त्री-पुरुष यांचे संसारातले ‘रोल्स’ बदलल्याने नातेसंबंधांवर झालेल्या परिणामांचाही यात विचार केला आहे. पुस्तकात नागास्वामी यांनी पुढील विषय उदाहरणांसह स्पष्ट केले आहेत :
जोडीदाराची निवड
लग्नाचं बदलतं स्वरूप
व्यक्तिगत स्पेस व मॅरेज स्पेस
भावनिक व लैंगिक नात्यांचा विकास
एकमेकांच्या कुटुंबांशी असलेले नातेसंबंध
करिअर व कुटुंबाचा समतोल इत्यादी…
लग्न झालेल्या किंवा होऊ घातलेल्या अन् सुखी सहजीवनाच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त; आणि हो, भेट देण्यासाठी उत्तम!



195.00 Add to cart

कामसत्य

लैंगिक ज्ञान व विज्ञान


[taxonomy_list name=”product_author” include=”548″]


कामविषयक चर्चा या गोष्टीचा आपल्या मराठी समाजात जवळजवळ अभावच आहे. लैंगिक जीवन हे आपल्या जीवनाला व्यापणारं एक प्रमुख व अत्यावश्यक अंग आहे. ही जाणीव नाकारण्याची आपल्याला अनेक वर्षं सवय लागलेली आहे. त्या अंगाची पुरेशी माहिती व त्यामागची शास्त्रीय बैठक समजून घेतल्यास, ते आपल्याला (अत्यंत खासगी ठेवूनही) समृध्द करता येईल हा या पुस्तकामागचा हेतू!
स्त्री-पुरुषांच्या शरीर रचनेपासून ते दैनंदिन कामजीवनातील ताण कसे टाळावेत व समृध्द कामजीवनाकरता शास्त्रीय मार्गदर्शन करणारं पुस्तक!


100.00 Add to cart

सुसंवाद सहकार्‍यांशी

नोकरीत बढतीसाठी व यशस्वी व्यवसायासाठी


[taxonomy_list name=”product_author” include=”535,536″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”537″]


या मनोहारी पुस्तकात केलेलं मार्गदर्शन, सिध्दीप्रेरणा, सुसंवाद, सौजन्य आणि सहभाग या चतु:सूत्रीचं बारीकसारीक गोष्टीत कसं अवलंबन करावं याचे खर्‍याखुर्‍या उदाहरणांसकट केलेलं चित्रण सर्वांना अंतर्मुख करावयास लावतं. ‘मानवी संबंध व परिणामकारक व्यवस्थापन’ ह्या किचकट विषयाचं गुपित ह्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर खुमासदार चित्रांनी अन अत्यंत उपयुक्त सूचनांनी अगदी सहजपणे उकलले आहे,सोपं करून सांगितले आहे. व्यावसायिकांसाठी व सर्वसामान्य माणसांसाठीही अशा पुस्तकाची गरज आहे.


Translation of “Business is People” a bestseller. Guides an individual to better relations with associates.


 

120.00 Add to cart