आजीच्या विविध कोशिंबिरी



खास आजीच्या हातच्या चटपटीत व पौष्टिक, जुन्या-नव्या जमान्याच्या व जेवणाची रंगत वाढवणार्‍या १०६ कोशिंबिरी या पुस्तकात दिल्या आहेत. विविध भाज्यांच्या, कंद-मुळांच्या, फळांच्या कोशिंबिरी उपयुक्त टीप्ससह या पुस्तकात वाचायला मिळतील.


25.00 Add to cart

खमंग फराळ

चकली, शेव, चिवडा, थालीपीठ इ.



शेव, चिवडा, चकल्या, थालिपीठं हे आपले नेहमीचेच पदार्थ! पण त्याच-त्याच चवीच्या ह्या पदार्थांना काही नव्या स्वादांचा, नव्या प्रकारांचा पर्याय मिळाला तर आपल्या या नेहमीच्या पदार्थांची रंगत केवढी वाढेल!
खरोखरीच ज्यांना सुगरण म्हणता येईल अशा प्रमिला पटवर्धन यांनी महाराष्ट्रीय पदार्थांची खासियत राखणारे हे पदार्थ सर्वांसाठी खास सोप्या पद्धतीने सांगितले आहेत.


30.00 Add to cart

खमंग भजी-वडे



वडे, भजी, वडया या पदार्थांत नावीन्य ते काय असणार? अर्थात् याचे उत्तर या पुस्तकात आहे. बटाटेवडयापासून डाळ वड्यापर्यंत, कांद्याच्या भजीपासून गोटा भजीपर्यंत आणि अळूवडीपासून बाकरवडीपर्यंत विविध प्रकार यात आहेत.
ज्यांना आपण खरोखरीच सुगरण म्हणू शकू अशा प्रमिला पटवर्धन यानी आपल्या या नेहमीच्या पदार्थांना वेगळीच रंगत आणली आहे.


30.00 Add to cart

निवडक चायनीज



चायनीज पदार्थ घरच्याघरी केल्यास घरी खाल्ल्याचे समाधानही मिळेल आणि पैसेही वाचविता येतील; परंतु त्या पदार्थांची चव आणि वैशिष्टय राखणे जमले पाहिजे म्हणूनच हे अगदी निवडक चायनीज पदार्थांचे खास पुस्तक…यात आहेत
० स्टार्टर्स ० ड्राय डिशेस ० मेन डिशेस ० सूप्स ० राइस ० नूडल्स आणि ० व्हेजिटेरिअन पदार्थांच्या पाककृती


25.00 Add to cart

रुचकर गोड पदार्थ


अनेक वर्षं सातत्याने लिखाण केलं असून वैजयंती यांची विविध विषयांवरील २४ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांद्वारे त्यांनी आपले नवरात्र, आपली मंगळागौर, भोंडल्याची गाणी, असे करा साठवणीचे पदार्थ, पावाच्या विविध पाककृती, सूप-सरबते, सण वर्षाचे व त्यांची पक्वान्ने, पोळ्या, पराठे, विविध भाज्या, दमफूल बिर्याणी, कडधान्याचे विविध प्रकार, २०० प्रकारची लोणची, विविध वड्या, लाडू, मसाले, चटण्या, सॉस, लज्जतदार मसाले, वरीपासून खिरीपर्यंत, पौष्टिक पालेभाज्या, या विषयांसंबधी लेखन केलं आहे. ‘कलातरंग’, ‘अस्ताई’ हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी टीव्ही व आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम केले असून त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

या पुस्तकात विविध प्रकारच्या गोड पदार्थांची रेलचेल आहे. उकडीच्या मोदकापासून ट्रायफल पुडिंगपर्यंत, गुलाबजामपासून बंगाली रसगुल्ल्यापर्यंत, बर्फीपासून पुरणपोळीपर्यंत आणि जिलेबीपासून बुंदीच्या लाडवापर्यंत विविध पद्धतीच्या गोड पदार्थांच्या पाककृती यात दिल्या आहेत.
या पुस्तकाचे मुख्य. वैशिष्टय म्हणजे पेढे, बर्फी व हालवे यांच्या विश्‍वसनीय पाककृती! आपण हे पदार्थ घरच्याघरी अगदी सफाईने करू शकाल.


25.00 Add to cart

रुचकर मांसाहार



कर्जतच्या दिवाडकर परिवारातील असल्याने ‘खानपानाच्या’ वातावरणात वाढलेल्या लता दळवी यांनी उपजत आवडीने आणि स्वत:च्या कौशल्याने पाककलेत नैपुण्य मिळविले. विशेषकरून नॉनव्हेज पदार्थात! त्यांचे कौशल्य, नैपुण्य व सांगायची सोपी शैली यातून साकार झालेले हे पुस्तक ‘रोहन प्रकाशन’ नव्या आकारात सादर करीत आहे.


30.00 Add to cart

वाटीतील तिखट-गोड पदार्थ



पाककृती आणि कलाकुसर यात ज्यांनी आपले जीवन व्यतीत केले अशा प्रमिला पटवर्धन या खर्‍या अर्थाने सुगरण आहेत. पाककलेतील निपुणता आणि स्वयंपाकात रस घेणारे यांचे मन यामुळे यांच्या हातच्या पाककृतींना एक वेगळीच चव असते. आपल्या पारंपरिक पदार्थांचा वारसा पुढील पिढयासाठीही जतन व्हावा असा यांचा एक आग्रह आहे म्हणूनच या पुस्तकात यांनी महाराष्ट्रीय पद्धतीच्या चविष्ट ० आमटी ० डाळी ० पालेभाजी ० पिठले ० कडधान्यं ० कढी ० सांबार आणि ० गोड खिरी यांचे विविध प्रकार दिले आहेत. सर्व गृहिणींना व नववधूंना या पुस्तकाचा निश्‍चितच उपयोग होईल.


25.00 Add to cart

विविध पदार्थ उरल्यासुरल्यातून


मृणाल चांदवडकर या स्वयंपाकात विशेष रुची असलेल्या अनुभवी गृहिणी. त्यांनी गेली काही वर्षं उरलेल्या पदार्थांवर अनेक प्रयोग केले आणि विविध प्रकारच्या उरलेल्या पदार्थांतून नव्याने करता येण्याजोगे पदार्थ कोणते हे शोधलं. या पाककृती त्यांनी पद्धतशीरपणे लिहून काढल्या. त्यांच्या या लेखनातून पाककलेतली त्यांची कल्पकता विशेषरीत्या अधोरेखित होते.

कधी अपेक्षेइतके पाहुणे येत नाहीत, कधी कुणाची भूकच मंदावते, तर कधी घरातील मंडळींचा अचानक बाहेर खायला जाण्याचा बेत ठरतो. अशा वेळी स्वयंपाक तोलूनमापून करूनही काही पदार्थ उरतात. हे पदार्थ दुसर्‍या दिवशी खायला मंडळी नाखूष असतात आणि ते टाकून देण्याचा विचार मनात येऊ नये, हेही खरेच! पण त्यामुळे पेच कायम राहतो— करायचं काय या शिल्लक पदार्थांचं? मृणाल चांदवडकर या स्वयंपाकात विशेष रुची असलेल्या अनुभवी गृहिणी. त्यांनी गेली काही वर्षें अशा उरलेल्या पदार्थांवर अनेक प्रयोग केले आणि विविध प्रकारच्या उरलेल्या पदार्थांतून नव्याने करता येण्याजोगे पदार्थ कोणते हे शोधले. त्यांची कृती पध्दतशीरपणे लिहून काढली, उरलेल्या पदार्थांच्या उपयोगाचे कल्पकतेने विविध पर्याय तयार केले. हे पर्याय म्हणजेच हे पुस्तक होय! सर्वच गृहिणींना ते वरदान ठरावे.


25.00 Add to cart