Featured

चतुर


प्रणव सखदेव


साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त लेखकाची तिसरी कादंबरी…

चतुर

खरंतर गोष्ट आहे तशी साधी…

एका नवख्या लेखकाची इच्छा असते की,
मरण्याआधी त्याने लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक व्हावं.
पण तसं काही घडत नाही, तो मरतो..
मग त्याची बायको ठरवते, आपण करू त्याची इच्छा पूर्ण !
आणि तिला सापडतात त्याने लिहिलेल्या आणखी काही गोष्टी….
आता काय? तिला पडतो प्रश्न.
मूळ पुस्तकात या नव्या गोष्टी घालता घालता
ती स्वत:देखील लिहू लागते…..!
तर ही गोष्ट आहे तशी साधी –
मरणाची… आठवणींची… प्रेमाची… बालपणाची….
वयात येण्याची… मोठं होण्याची… तिची… त्याची….
आणि
काडेपेटीत अडकलेल्या एका चतुराची…!

240.00 Add to cart

दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट

 

प्रणव सखदेव


“प्रणव सखदेव हे समकालीन मराठी कथेला आपल्या वेगळ्या आशयाविष्काराने नवे परिमाण प्राप्त करून देणारे महत्त्वाचे कथाकार आहेत. या संग्रहातल्या  त्यांच्या कथा गोष्टी सांगण्यातली सहजता घेऊन येतात.
त्या मराठीतील रूढ मध्यमवर्गीय कथेला छेद देत, या जगण्यातील दाहकता आणि अंतरंगातील तळकोपरे धुंडाळत जीवनाशयाला वैशिष्ट्यपूर्ण आयाम मिळवून देतात, बाजारू काळातील अस्थिरतेच्या जीवघेण्या वास्तवाला चित्रित करतात. दांभिकता, हिंस्रता आणि हतबलता यांसह समाजकेंद्रित आणि श्रमिकांशी जोडलेपणातून येणारा अपराधभावदेखील या कथांमधून दिसून येतो. मराठी कथासाहित्यात मध्यमवर्गीयांची कथा हा अलीकडे हेटाळणीचा विषय झाला होता. परंतु या कथा मध्यमवर्गीय जगण्यातील नेमके कंगोरे वास्तव-कल्पितातून उजागर करतात. समकाळाने प्रभावित केलेल्या मानवी जीवनाच्या अनेक मिती या कथनऐवजातून साकार होतात.
व्यवस्थेचे अजस्त्र रूप आणि मानवी जीवनानुभवाची क्षुद्रता आकळल्याने सखदेव वास्तवाला अनेक कोनांतून प्रक्षेपित करण्यासाठी या कथांचा वापर करतात. त्यामुळे या कथा एकरेषीयता ओलांडून अनेक दिशांचे पसरलेपण घेऊन येतात. मानवी जीवनाच्या जाणीव-नेणिवांचा शोध घेत या पसरलेपणात समाजभान व्यक्त करणं हे सखदेव यांच्या कथेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट या संग्रहातून पुढे येते.”
– दत्ता घोलप

 


240.00 Add to cart

भटकंती सप्तरंगी बेटांची


जयप्रकाश प्रधान


कोणतंही बेट म्हटलं की आपलं कुतूहल चाळवतं आणि जगात तर अशी अनेक बेटं आहेत जी अक्षरश : स्वप्ननगरी वाटावीत… अशाच काही अनोख्या आणि अपरिचित बेटांची आपल्याला सैर घडवून आणत आहे प्रधान दाम्पत्य !

विशेष गर्दी नसलेल्या पण वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या बेटांवर जाऊन राहणं, तेथील निसर्ग भरभरून अनुभवणं, तेथील स्थानिक खाद्य-पेयांचा आस्वाद घेणं, घेणं तेथील वेगळी संस्कृती, प्रथा समजून हा प्रधान दाम्पत्याचा आवडीचा उद्योग…. गाठीला असलेला हा अनुभव रसिक वाचकांसमोर खुला करून प्रधान ती बेटं, तो प्रदेश डोळ्यासमोर उभा करतात. अशा तऱ्हेच्या फिरण्यातून पर्यटनाचा एक वेगळा आनंद कसा मिळू शकतो याची एक नवी दृष्टी ते पर्यटकांना भटकंती सप्तरंगी बेटांची या पुस्तकातून देतात .

कोणत्या बेटांची सफर आहे या पुस्तकात ?

ऐकलं आहे का तुम्ही या बेटांबद्दल ?

  • स्पेनमधले बॅलेॲरिक आणि कॅनरी आयलंडचे अप्रतिम समुद्रकिनारे
  • ११५ लहान – मोठ्या बेटांचा समूह सेशेल्स
  • जागतिक पर्यटकांचं हॉट डेस्टिनेशन हवाई बेटं
  • ग्रीस मधली पांढरी निळी बेटं लहान – मोठ्या १७,५०० बेटांचा मिळून झालेला व प्राचीन वारसा लाभलेला इंडोनेशिया
  • नयनरम्य निसर्गसौंदर्याने नटलेली इटलीमधील लोकप्रिय बेटं ..

अशा अनेक बेटांची सप्तरंगी सफर…




240.00 Add to cart

एन्डगेम


एस. हुसैन झैदी
अनुवाद:रमा हर्डीकर-सखदेव


बीएसएफ’चे स्पेशल डायरेक्टर जनरल सोमेश कुमार यांना संरक्षण देण्याचं काम या गुरू-चेल्यावर सोपवण्यात आलं आहे. कुमार हे माजी पंतप्रधान परमेश्वर नायडू यांना भेटायला येण्याच्या मार्गावर आहेत. नायडूंच्या गाडीला अपघात झाल्यामुळे

ते हॉस्पिटलमध्ये आहेत. कुमारांच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला करतात आणि कुमारांना ठार मारण्यात ते यशस्वी होतात. ‘मोसाद’मधल्या मित्राकडून टीप मिळाल्यावर गुरू-चेला मुंब्याला पोचतात. इथे एका भाड्याच्या घरात अल मुकादम हा मुख्य संशयित लपून बसला आहे. तो त्यांच्या हातावर तुरी देतो, पण तत्पूर्वी तो दुसरा तिसरा कोणी नसून आयुब म्हणजे मजहर खान या त्यांच्या खबऱ्याचा भाऊ आहे, हे विक्रांतच्या लक्षात येतं. केसमधली गुंतागुंत वाढत जात असताना मेजर डॅनिएल; म्हणजे नायडूंची मुलगी वैशाली हिचा प्रियकर, त्यांच्याशी संपर्क साधतो. नायडूंच्या अपघातामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा दावा तो करतो.

राजकारण, कल्पनातीत दगाबाजी आणि अविश्वसनीय थरार याची गुंफण अर्थात….एन्डगेम



240.00 Add to cart

साहित्य: अभिजात आणि लोकप्रिय

डॉ. विनायक गंधे


डॉ. गंधे यांचा प्रस्तुत ग्रंथ म्हणजे समीक्षास्वरांची रंगलेली एक सुंदर बैठक होय. या बैठकीमुळे समीक्षेमध्ये स्वारस्य असणारा वाचक ज्ञानसंपन्न होईलच. त्याचबरोबर ह्या आगळ्यावेगळ्या वाटेच्या समीक्षेमुळे तो प्रमुदितही होईल. याचे कारण स्वतः डॉ. गंधे यांची समीक्षालेखनाची बैठक काहीशी अपारंपरिक आहे. डॉ. गंधे यांना समीक्षाविषय सुचतात आणि त्या विषयाची मांडणी मात्र ते खूप विचार करून स्वतःची संशोधितात. याच्या परिणामी डॉ. गंधे यांचा प्रस्तुत ‘साहित्य : अभिजात आणि लोकप्रिय’ हा ग्रंथ आगळावेगळा झालेला आहे. म्हणूनच समीक्षेच्या नव्या अभ्यासकांनी तो मन:पूर्वक वाचून जाणून घ्यावा अशी माझी शिफारस आहे.
डॉ. द. दि. पुंडे



 

240.00 Add to cart

सॉक्रेटिस कधी मरत नसतो

 


माधव कौशिक

भावानुवाद :रवींद्र शोभणे


हिंदी साहित्यविश्वातील आणि विशेषतः काव्यप्रांतातील एक महत्त्वाचे नाव म्हणून माधव कौशिक यांच्याकडे पाहिलं जातं. गझल, भावकविता, खंडकाव्य इत्यादी काव्यप्रकारांत त्यांनी केलेले लेखन महत्त्वाचे मानले जाते. जवळ जवळ पंचवीस कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. पौराणिक कथानकांतून समकालीन वास्तवाचे आणि भावभावनांचे चित्रण करण्याचे त्यांचे कसब निश्चितच अव्वल असे आहे. कविता या वाङ्मयप्रकारासोबतच त्यांच्या गद्यलेखनाचा आणि बालसाहित्याचाही विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल.

कथाकार म्हणून त्यांनी मोजके लेखन केले असले तरी त्यांच्या कथा या वेगळेपणाने उठून दिसणाऱ्या आहेत. त्या लघुकथा या प्रकारात मोडणाऱ्या कथा आहेत. जगण्यातील सामान्य घटना, सामान्य माणसांच्या जीवनातील अनवट प्रसंगातून, घटनांतून उभे राहणारे पेचप्रसंग आणि त्यातून जीवन समजून घेण्याचा माधव कौशिकांचा प्रयत्न अधिक आश्वासक आणि अर्थपूर्ण वाटतो.

मराठीतील प्रथितयश कथाकार, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी या कथांचा केलेला मराठी भावानुवाद भाषिक अडसरांना बाजूला सारत मानवी जीवनाच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी झालेला आहे.

मराठी वाचकांना वेगळी अनुभूती देणारा कथासंग्रह….



 

240.00 Add to cart