स्वप्नमोहिनी

[taxonomy_list name=”product_author” include=”3811″]


ॲस्ट्रोपायलट दिक्पाल आर्य .….. धाडसी, हरहुन्नरी, हजरजबाबी, प्रसंगावधानी अशा दिक्पालची मंगळावर जाण्यासाठी निवड झाली . पृथ्वीवरील मानवांचा प्रतिनिधी म्हणून मंगळावर जाण्याचा प्रथम मान मिळणं, ही भूषणावह गोष्ट होती . दिक्पाल मंगळावर उतरला …यानातून बाहेर पडून चालत जाताना त्याच्या सहकाऱ्यांना तो दिसलाही … पण तेवीस दिवसांनी परत येणं अपेक्षित असणारा दिक्पाल तब्बल २५ ९ दिवसांनी परतला. एवढे दिवस कुठे होता तो? विश्वातल्या अज्ञात, अकल्पित आणि अनपेक्षित घडामोडींची आणि मानवाच्या राक्षसी महत्वाकांक्षेची थरारक कथा.. स्वप्नमोहिनी!

विख्यात भयकथा, गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी

100.00 Add to cart

अनामिका

 


[taxonomy_list name=”product_author” include=”3257″]


समाजाने स्त्री – पुरुष समानता अंगिकारली आहे , असं जरी एक चित्र दिसत असलं तरी याबाबत आज अनेक समस्या स्त्रियांना भेडसावत आहेत . त्याचप्रमाणे सामाजिक , सांस्कृतिक , आर्थिक स्थित्यंतरांना सामोरे जाताना अनेक नवे प्रश्नही निर्माण झाल्याचे चित्र आहे . शिक्षणामुळे आर्थिक स्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य मिळालेल्या स्त्रीला जोडीदार मिळणे अवघड झाले आहे . शिक्षण प्रसार झाला पण परीक्षेतल्या गुणांचे माहात्म्य एवढे वाढले की आईच्या वात्सल्याची जागा मुलाला शर्यतीतल्या उंदीर करण्याने घेतली . शहरी स्त्रियांना खेड्यातल्या स्त्रियांचे प्रश्न समजेनासे झाले , तर शहरात आर्थिक वर्गभेदांमुळे स्त्रियांमध्ये एकमकींविषयी दुरावा निर्माण होऊ लागला आहे . जाहिरात क्षेत्रासारख्या चमचमणाऱ्या चंदेरी क्षेत्रामध्ये स्त्रियांचे लैंगिक शोषण होऊ लागले , तर दुसरीकडे लैंगिक शिक्षणाला विरोध असल्यामुळे किशोरवयीन मुलांचे भावविश्व गुंतागुंतीचे होऊ लागले आहे . गर्भजल परीक्षेच्या शोधानंतर स्त्री – भ्रूण हत्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आणि समानतेच्या तत्त्वाची पिछेहाट झाली आहे . यासगळ्या प्रश्नांचे हळूवार चित्रण करणाऱ्या या कथासंग्रहामध्ये आजचे वास्तव प्रतिबिंबित झाले आहे . त्यामुळे या कथा वाचकाला विचारप्रवृत्त करतील अशी आशा आहे .


100.00 Read more