फ्लर्टिंग विथ स्टॉक्स

शेअर बाजार समजून घेताना


डॉ. अनिल लांबा
अनुवाद: विरेंद्र ताटके


चार्टर्ड अकाउंटंट, विख्यात लेखक आणि अर्थविषयक सल्लागार अनिल लांबा यांनी या पुस्तकात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गोष्टींचं सहज-सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे.

या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?…

१. शेअर्सची खरेदी-विक्री कशी आणि कधी करायची?

२. रेशो अ‍ॅनालिसिस म्हणजे काय?

३. कंपन्यांचा ताळेबंद (Balance sheet) कसा पाहायचा?

४. ट्रेडिंग करताना काय काळजी घ्यायची?

५. जास्तीत जास्त परतावा (Returns) कसा मिळवायचा?

६. ईपीएस (Earning per share) म्हणजे काय?

याशिवाय शेअर बाजारातल्या संकल्पनांची उपयुक्त माहिती आणि बरंच काही…

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक… फ्लर्टिंग विथ स्टॉक्स!



395.00 Add to cart

उद्योग संच

यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली


सुरेश हावरे


कल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी…

उद्योग तुमचा…पैसा दुसऱ्याचा

उद्योगाची उभारणी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग,रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ… नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणाऱ्या सर्व तरुणांसाठी अनुभवाचे बोल…

 

उद्योग करावा ऐसा…

अनेक यशस्वी `बिझनेस बाजीगरांनी’ दाखविलेले जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे गुण तरुणांमध्ये रुजवण्यासाठी हावरे यांनी या बिझनेस बाजीगरांशी संवाद साधून तयार केलेलं पुस्तक…

 

स्टार्टअप मंत्र

तरुणाईच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मिळालेली एक नवी दिशा म्हणजे स्टार्टअप. एखाद्या संकल्पनेवरून प्रत्यक्ष उद्योग कसा उभारावा याचे अनुभवसिद्ध धडे देणारे…‘स्टार्टअप मंत्र’!


725.00 Add to cart

माझं कुटुंब, माझी गुंतवणूक

स्वप्न साकार करण्यासाठी पैशाचं ‘स्मार्ट’ नियोजन


वीरेंद्र ताटके


आयुष्यात प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्नं असतात, इच्छा-आकांक्षा असतात. कोणाला घर विकत घ्यायचं असतं, कोणाला चारचाकी हवी असते; तर कोणाला उच्च शिक्षण घ्यायचं असतं. आणि ही स्वप्नं-आकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आर्थिक नियोजन!

गुंतवणूक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रा. वीरेंद्र ताटके यांनी या पुस्तकाच्या सुरुवातीला आर्थिक नियोजनाचा मूलभूत मंत्र दिला आहे…

एकूण उत्पन्न – गुंतवणूक = खर्च

अशा प्रकारे ताटके माहिती देता देता आपल्याला आर्थिकदृष्ट्या ‘साक्षर’ करतात, आर्थिक नियोजनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन देतात.

बँकामधली विविध प्रकारांतली गुंतवणूक, पोस्टातली गुंतवणूक, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, रिअल इस्टेट, सोनं इ. गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांचे फायदे-तोटे उदाहरणांसह ताटके सांगतात. तसंच आयुष्यातले टप्पे कोणते आणि कुठली गुंतवणूक कधी करावी याविषयी मार्गदर्शन करतात.

मुलांचं शिक्षण, आजारपण, घराची खरेदी, स्वत:ची हौस-मौज यांसारख्या कुंटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन कष्टाने कमावलेला आपला पैसा गुंतवण्याचे फायदेशीर मार्ग हे पुस्तक दाखवतं. म्हणूनच हे आहे… माझं कुटुंब, माझी गुंतवणूक !



175.00 Add to cart

स्टार्टअप मंत्र

स्टार्टअप मंत्र अर्थात नवोद्योगाची ओळख


सुरेश हावरे


तरुणाईच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मिळालेली एक नवी दिशा म्हणजे स्टार्टअप! अभिनव संकल्पना किंवा आयडिया, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, मेहनती टीम आणि मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसायवृद्धीच्या संधी या घटकांवर स्टार्टअप्स कसे यशस्वी होतात, हे या पुस्तकात उलगडलं जातं.

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्यं : १५ यशस्वी उद्योजकांशी संवाद : स्टार्टअप्सच्या संकल्पना, त्यांची अंमलबजावणी आणि विस्तार होण्यापर्यंतचा प्रवास

प्रथितयश व सर्जनशील उद्योजक डॉ. सुरेश हावरे यांचे अनुभवाचे बोल व मार्गदर्शन

यशस्वी स्टार्टअप्सची १० सूत्रं आणि मौल्यवान टिप्स

एखाद्या संकल्पनेवरून प्रत्यक्ष उद्योग कसा उभारावा याचे अनुभवसिद्ध धडे देणारे…‘स्टार्टअप मंत्र’!


200.00 Add to cart

गेम चेंजर संच

तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून मानवी जीवन बदलून टाकणारे… गेम चेंजर


जगमोहन एस. भानवर
अनुवाद : रमा हर्डीकर-सखदेव


सत्य नडेला
मायक्रोसॉफ्टचा बदलता चेहरा
या पुस्तकात नडेलाची वैयक्तिक जडणघडण, त्याची नियुक्ती कशी करण्यात आली, मायक्रोसॉफ्टची आधीची स्थिती, नडेलाने ठामपणे केलेले बदल, त्याचे परिणाम आणि नडेलापुढची आव्हानं इत्यादी गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला हे पुस्तक म्हणजे सत्य नडेला या व्यक्तिमत्त्वाचं चरित्र आहे, तसंच दुसरीकडे, ते तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल, त्यामुळे होत असलेली स्पर्धा यांची मर्मदृष्टी देणारा माहितीपटही आहे.

सुंदर पिचई
गुगलचं भविष्य
या पुस्तकात पिचईच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, ‘गूगल’मधल्या प्रवेशापासून ते सीईओ पदापर्यंतचा त्याचा विलक्षण प्रवास, त्याने ठामपणे घेतलेले निर्णय, पेललेली आव्हानं, ‘गूगल’ला प्राप्त करुन दिलेलं अत्युच्च स्थान याचा उहापोह रंजकपणे आणि प्रभावीपणे केला आहे. सुंदर पिचई आणि दैनंदिन जगण्याचा भाग बनलेलं ‘गूगल’ यांच्या यशाचं मर्म सांगणारं आणि २१व्या शतकातलं बहुपेडी नेतृत्त्व कसं असावं आणि ते कसं घडतं हे उलगडून दाखवणारं पुस्तक.


370.00 Add to cart

सुंदर पिचई

गुगलचं भविष्य


जगमोहन एस. भानवर
अनुवाद :रमा हर्डीकर-सखदेव


जागतिक स्तरावरची महाकाय टेक कंपनी ‘गूगल’ आणि तिचा चेहरामोहरा पालटून टाकणाऱ्या एका भारतीय तरुण नेतृत्त्वाची ही आहे झंझावाती कहाणी…
तरुण वयाचा सुंदर पिचई तंत्रज्ञानावरचं आपलं निरपवाद प्रभुत्त्व सिद्ध करत ‘गूगल’मध्ये यशाची शिडी झपाट्याने चढत होता. साहजिकच ‘गूगल’च्या ‘सीईओ’पदी पिचईची झालेली निवड स्पर्धक कंपन्यांनाही अनपेक्षित नव्हती. उलटपक्षी त्याच्या नेतृत्त्वाखाली ‘गूगल’ नव्या आव्हानांना कसं तोंड देतं, याचीच उत्सुकता सर्वांना लागली होती. तंत्रज्ञानाच्या प्रभुत्त्वाबरोबरच पिचईकडे भविष्याचा वेध घेणारी ‘व्हिजन’ होती. सोबतीला व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्यांची जोड होती. माणसांना एकत्र घेऊन काम करण्याची हातोटी होती. त्याच बळावर त्याने क्रोम, क्रोम ओएस, अँड्रॉइड वगैरे उत्पादनं विकसित केली. ही उत्पादनं आता जगावर अधिराज्य गाजवत आहेत. पिचईचा ‘मिडास टच’ लाभलेल्या ‘गूगल’ने आता नवी भरारी घेतली आहे.
या पुस्तकात पिचईच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, ‘गूगल’मधल्या प्रवेशापासून ते सीईओ पदापर्यंतचा त्याचा विलक्षण प्रवास, त्याने ठामपणे घेतलेले निर्णय, पेललेली आव्हानं, ‘गूगल’ला प्राप्त करुन दिलेलं अत्युच्च स्थान याचा उहापोह रंजकपणे आणि प्रभावीपणे केला आहे. सुंदर पिचई आणि दैनंदिन जगण्याचा भाग बनलेलं ‘गूगल’ यांच्या यशाचं मर्म सांगणारं आणि २१व्या शतकातलं बहुपेडी नेतृत्त्व कसं असावं आणि ते कसं घडतं हे उलगडून दाखवणारं पुस्तक
सुंदर पिचई – गूगलचं भविष्य…


195.00 Add to cart

सत्य नडेला

मायक्रोसॉफ्टचा बदलता चेहरा


जगमोहन एस. भानवर
अनुवाद : रमा हर्डीकर-सखदेव


जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जेव्हा सत्य नडेला याची नियुक्ती झाली तेव्हा एकीकडे भारतीयांच्या माना ताठ झाल्या, तर दुसरीकडे तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अभ्यासकांच्या मनात हा मुरब्बी तंत्रज्ञ मायक्रोसॉफ्टला कोणती नवी दिशा देणार याबद्दल प्रचंड औत्सुक्य निर्माण झालं होतं. कारण तेव्हा गुगल आणि अ‍ॅपल प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपला मोर्चा मोबाइल फोन वा टॅब यांकडे वळवला होता.
तर, मायक्रोसॉफ्टने या क्षेत्रात अग्रणी होण्याच्या संधी गमावल्या होत्या. नडेलाने मात्र सूत्रं स्वीकारल्यावर लगेच नव्या बदलांच्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली.
या पुस्तकात नडेलाची वैयक्तिक जडणघडण, त्याची नियुक्ती कशी करण्यात आली, मायक्रोसॉफ्टची आधीची स्थिती, नडेलाने ठामपणे केलेले बदल, त्याचे परिणाम आणि नडेलापुढची आव्हानं इत्यादी गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला हे पुस्तक म्हणजे सत्य नडेला या व्यक्तिमत्त्वाचं चरित्र आहे, तसंच दुसरीकडे, ते तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल, त्यामुळे होत असलेली स्पर्धा यांची मर्मदृष्टी देणारा माहितीपटही आहे.
सर्वसामान्य वापरकर्त्यांना या क्षेत्राची रंजक माहिती देणारं, आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना भान, प्रेरणा देणारं आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रोफेशनल्सना अंतर्दृष्टी देणारं पुस्तक…
सत्य नडेला : मायक्रोसॉफ्टचा बदलता चेहरा!


175.00 Add to cart

भारतीय उद्योगातील ऑनलाइन आयडॉल्स

नावीन्यपूर्ण ‘बिझनेस मॉडेल्स’, प्रभावी मार्केटिंग, ‘स्टार्ट-अप्स’ ना शिकण्यासारखं बरंच काही…


अनुराधा गोयल
अनुवाद : शुभदा पटवर्धन


इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी-विक्री करता येऊ शकते याचा शोध ज्याने कोणी लावला असेल, त्याला आधुनिक काळातला `कोलंबस’च म्हटलं पाहिजे! कारण त्यामुळे आपल्या खरेदी करण्याच्या सवयींमध्ये आणि मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल झाले. ‘ऑनलाइन शॉपिंग’ हा फंडा घराघरात पोचून ‘हिट’ झाला!
भारतीय ऑनलाइन उद्योगजगतात नवनवी क्षेत्रं शोधणारे ‘आधुनिक कोलंबस’ म्हणजे ‘फ्लिपकार्ट’, ‘मेकमायट्रीप’, ‘कॅरटलेन’, ‘झोमॅटो’, ‘बिग बास्केट’, ‘शादी डॉट कॉम’, ‘इमेजेस बझार’ यांसारख्या कंपन्या! त्यांनी भारतीय ऑनलाइन उद्योगजगताचा पाया घातला, नावीन्यपूर्ण कल्पना लढवून आपला ठसा उमटवला आणि नवे ट्रेंड्स रूढ केले.
या ‘आयडॉल्स’ कंपन्यांच्या कार्यपद्धतींची, बिझनेस मॉडेल्सची उपयुक्त माहिती देणारं हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी रंजकही आहे, आणि तुमच्यातील उद्योगवृत्तीला साद घालणारंही आहे!


250.00 Add to cart

उद्योग करावा ऐसा

२१ उद्योजकांशी साधलेल्या संवादातून उलगडलेली बिझनेस सिक्रेट्स


सुरेश हावरे


‘उद्योग तुमचा, पैसा दुसर्‍याचा’ या पुस्तकाच्या लक्षणीय यशानंतर सुरेश हावरे आजच्या तरुण उद्योजकांसाठी यशस्वितेचा आणखी एक ‘पुस्तक-मंत्र’ घेऊन येत आहेत.
हे पुस्तक म्हणजे 2015 साली झी 24 तास या वाहिनीवर सादर झालेल्या ‘दि सुरेश हावरे बिझनेस शो’चं संपादित स्वरूप. हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय ठरला होता. या ‘शो’मध्ये शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या धडाडीच्या उद्योजकांच्या मुलाखती हावरे यांनी घेतल्या. तब्बल 72 लाख लोकांनी हा ‘शो’ बघितला आणि त्यातून प्रेरणा घेऊन सहा हजारांहून अधिक तरुणांनी नव्याने उद्योगही सुरू केले.
हावरे हे स्वत: अनुभवी उद्योजक असल्यामुळे या मुलाखती वेगळी उंची गाठू शकल्या. या मुलाखतींमधून उद्योजकांनी प्रकट केलेले विचार, सांगितलेले अनुभव, तसेच त्यांच्याशी झालेल्या संवादातून व्यक्त झालेले ‘मॅनेजमेंट थॉटस्’ हे सर्व व्यावसायिकांना एक नवी दृष्टी देऊन जातात.
ही नवी दृष्टी देण्यासाठी आणि या ‘बिझनेस बाजीगरांची’ जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे अनेक गुण आजच्या तरुणांपुढे आणावेत या उद्देशाने हावरे यांनी हे पुस्तक तयार केलं आहे.
नवउद्योजकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी उद्युक्त करणारं आणि उद्योग भरभराटीचा हमखास फॉर्म्युला सांगणारं पुस्तक… उद्योग करावा ऐसा !


300.00 Add to cart

तुमचा सच्चा साथीदार

व्यवसाय किंवा नोकरी-धंद्यातील प्रगतीसाठी…


सुब्रोतो बागची
अनुवाद : प्रणव सखदेव


चांगला उद्योजक / व्यावसायिक / नोकरदार होण्यासाठी
तुम्ही ‘जागरूकपणे’ प्रयत्न करायला तयार आहात?

सुप्रसिद्ध लेखक, ‘माइंडट्री’ कंपनीचे संस्थापक सुब्रोतो बागची यांनी
‘द प्रोफेशनल’ (मराठी आवृत्ती : मैत्री व्यावसायिकतेशी) हे पुस्तक लिहिलं आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. या पुस्तकात त्यांनी व्यावसायिकतेबद्दल त्यांच्या अनुभवांआधारे भाष्य केलं होतं, तर ‘तुमचा सच्चा साथीदार’मध्ये त्यांनी व्यावसाययिकांमध्ये आवश्यक असणार्‍या‍ गुणांचा विकास व्हावा, यासाठी एका वर्कबुकचीच निर्मिती केली आहे.

या पुस्तकात त्यांनी चांगला व्यावसायिक होण्यासाठी आवश्यक असलेल्या २५ गुणांबद्दल थोडक्यात, पण मौलिक माहिती दिली आहे. तसंच हे गुण आपल्या अंगी कसे बाणवावेत, ते अधिकाधिक विकसित कसे करावेत, हे आपलं आपल्यालाच समजावं यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रश्नही विचारले आहेत. त्यांची उत्तरं देण्यासाठी पुस्तकात मोकळ्या जागा देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी आपल्याला सामोरे जावे लागणारे, आपल्या क्षमतांचा कस लावू पाहणारे वेगवेगळे घटना-प्रसंगही देण्यात आले आहेत. त्या घटना-प्रसंगांत तुम्ही कसं वागाल, काय कृती कराल हे पुस्तकात लिहायला सांगितलं आहे. कधीकधी आधी दिलेल्या उत्तरांचं पुनरावलोकन करायलाही सांगितलं आहे.

‘प्रत्यक्ष स्वाध्याय’ करायला लावून स्वत:च्या आत डोकवायला लावणारं हे आगळंवेगळं पुस्तक सगळ्या व्यवासायिकांना, उद्योजकांना आणि नोकरदारांना मौलिक मार्गदर्शन तर करेलच, शिवाय व्यावसायिक जीवनातला ‘तुमचा सच्चा साथीदार’ही होईल !


195.00 Add to cart

व्यवसायातील इंप्रेसिव्ह मॅनर्स

व्यवहारात आपली छाप पाडण्यासाठी वागण्या-बोलण्याच्या प्रभावी पध्दती – सेल्स, मार्केटिंग, एच.आर., इंटरव्ह्यू, बिझनेस, कॉर्पोरेट, मिटिंग्ज, कॉकटेल्स, डिनर


शीतल कक्कर मेहरा
अनुवाद :मेधा ताडपात्रीक


सेल्स, मार्केटिंग किंवा बिझनेस… तुम्ही कोणत्याही क्षेत्रांत कार्यरत असलात तरी प्रभावीपणे संवाद साधता येणं हे व्यावसायिक यशासाठी अत्यावश्यक असतं. तुमचा आवाज, शब्दांची निवड, तुमची वेषभूषा, देहबोली या सर्वांचा समोरच्यावर परिणाम होत असतो. तुमच्या केवळ एका हस्तांदोलनातून किंवा अगदी दहा मिनिटांच्या भेटीतूनही तुम्हाला व्यवसायातल्या सुवर्णसंधी मिळू शकतात!
तुमच्या कामाच्या ठिकाणी वागण्या-बोलण्यातून विशेष ठसा उमटवण्यासाठी आवश्यक अशा टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.
उदाहरणार्थ…
हस्तांदोलन कसं करावं
बिझनेसकार्डची देवाणघेवाण कशी करावी
आपल्या ग्राहकाच्या स्मरणात व संपर्कात कसं राहावं
सहकारी, ग्राहक व बॉस यांच्याबरोबर कशाप्रकारचं वर्तन ठेवावं…
मिटिंगमध्ये किंवा बिझनेसपार्टीमध्ये काय व कसं बोलावं
क़ॉन्फरन्समध्ये किंवा बिझनेस इव्हेंट्सला जाताना वेषभूषा, केशरचना, अ‍ॅक्सेसरीज, पादत्राणं कशी असावीत
टेक्नॉलॉजीच्या साधनांद्वारे (इ-मेल, टेलि व व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) संवाद कसा साधावा, इ.इ.
आपलं करिअर ‘प्रभावित’ करणार्‍या अशा सर्व कळीच्या मुद्दयांवर मार्गदर्शन करणारं पुस्तक… व्यावसायिक इंप्रेसिव्ह मॅनर्स!


250.00 Add to cart

उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा

व्यवसाय करण्यासाठी पैसा नव्हे, वृत्ती हवी!


सुरेश हावरे


आपल्या समाजात उद्योजकांविषयी एक प्रकारचं कुतूहल आणि अनेक प्रकारचे समज-गैरसमज असतात. उद्योगाशी निगडित अशा अनेक समजुतींचा तसंच तरुणांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणार्‍या घटनांचा ऊहापोह या पुस्तकात लेखकाने अतिशय रंजकपणे केला आहे.
केवळ पैशाचंच पाठबळ असल्यास यशस्वीपणे उद्योग करता येतो या जनमानसात सर्वसाधारणपणे असलेल्या समजुतीलाच हावरे यांनी छेद दिला आहे. भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो. मात्र व्यवसाय करण्यासाठी मुख्य भांडवल तुमच्यापाशी आवर्जून हवं असतं ते दुर्दम्य इच्छाशक्तीचं, आत्मविश्वासाचं व व्यावसायिक वृत्तीचं! हा मूलभूत मंत्र आत्मसात करण्यासाठी आणि पुढे प्रत्यक्षात व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी लागणार्‍या घटकांची चर्चा ते विस्तृतपणे पुस्तकातून करतात. उद्योगाची उभारणी कशी करावी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग, रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ कशी करावी असे महत्त्वाचे विषय त्यांनी यात हाताळले आहेत.

जो स्वत:च्या अनुभवातून शिकतो, तो हुशार माणूस समजला जातो पण जो इतरांच्या अनुभवातून शिकतो तो खरा चाणाक्ष माणूस. त्यामुळे नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणार्‍या तरुणांसाठी हे अनुभवाचे बोल अत्यंत उपयोगी पडतील.
‘उद्योजक हा राष्ट्राची संपत्ती निर्माण करणारा मुख्य घटक असतो’ असं मत हावरे आत्मविश्वासपूर्वक व्यक्त करतात. अनेक वर्षं यशस्वीपणे बांधकाम क्षेत्रातील उद्योगधुरा सांभाळणार्‍या हावरे यांचे अनुभवाचे बोल नवउद्योजकांसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरतील


195.00 Add to cart

केवळ आयटीतच

भारतातील एका ‘बूमिंग’उद्योगाचा विलक्षण प्रवास


अतुल कहाते


आयटी किंवा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बीपीओ किंवा कॉल सेंटर हे शब्द आज आपल्या परिचयाचे झाले आहेत. मात्र आयटी म्हणजे नक्की काय? भारतात या क्षेत्राची कशी सुरुवात झाली? किंवा येथे नक्की कशा स्वरूपाचं काम असतं याची मात्र आपल्याला तितकीशी कल्पना नसते. अतुल कहाते हे आयटी उद्योगात अनेक वर्षं उच्च पदावर कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून आणि निरीक्षणातून भारतातील आयटीचा उगम, वाढ-विस्तार व एकूणच या क्षेत्राची वाटचाल सांगणारं हे पुस्तक लिहिलं आहे ते आयटीबद्दलचं सर्वसाधारण कुतूहल शमवण्यासाठी!
आयटी उद्योगाने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन ओळख, आत्मविश्वास दिला. येथील गलेलठ्ठ पगारांमुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना जन्मात बघितली नसतील अशी स्वप्नं साकार करण्याची ताकद मिळाली! नोकरीनिमित्त अनेक भारतीय मोठया प्रमाणात परदेशात जाऊ शकले. लहान गावा-शहरांमधली मुलं-मुली सिंगापूरपासून कॅलिफोर्नियापर्यंत वरचेवर जाऊ लागली. या उद्योगामुळे प्रकर्षाने तरुण वर्गात सुबत्ता दिसू लागली…
मात्र याचबरोबर त्याचे काही सामाजिक व पर्यावरणीय दुष्परिणामही दिसू लागले आहेत. उदा. जीवनशैलीतले बदल, घटस्फोटांचं वाढतं प्रमाण, वाहनांच्या संख्येत व प्रदूषणात झालेली मोठी वाढ आणि दैनंदिन जीवनामध्ये भाजीपाल्यापासून ते घरांच्या किमतींपर्यंत सगळया गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाणं…
अशा या ‘बूमिंग’ आयटी उद्योगाचा इतिहास, प्रवास व विस्तार उलगडून दाखवणारं पुस्तक…
केवळ ‘आयटी’तच…!


150.00 Add to cart

It Happens Only in I.T.

Fascinating Story of the Indian ‘I.T.’ Industry


Atul Kahate


Known until recently as the country of elephants and snake charmers, India has stunned the western world with its astounding growth in the Information Technology (IT) sector in a short span of time. This dramatic rise of the Indian IT industry can be mainly attributed to the herculean efforts of many entrepreneurs, who successfully countered hurdles of all kinds to create a multi-million dollar industry from nowhere.
The book traces the origins of this industry, its stunning growth, its adverse impacts, the contribution of the Pioneers who laid the foundation and a lot of amazing stories of today’s prosperous Indian IT Industry.


199.00 Add to cart

बॅलन्स शीट व फायनान्स समजून घेताना

व्यवसायाशी संबंधित प्रत्येकासाठी!


डॉ. अनिल लांबा
अनुवाद :वीरेंद्र ताटके


सुप्रसिध्द चार्टर्ड अकौंटंट आणि प्रशिक्षक डॉ. अनिल लांबा यांनी या पुस्तकात आर्थिक व्यवहाराचे निर्णय सजगपणे घेऊन आर्थिक अडचणीत न येता व्यवसायात यशस्वी कसं व्हावं हे व्यवहारातल्या साध्या-सोप्या उदाहरणांमधून समजावून सांगितलं आहे.
हे सांगताना डॉ. लांबा यांनी योग्य वित्तव्यवस्थापन कसं करावं, नफा-तोटा-पत्रक, बॅलन्स शीट कशी समजून घ्यावी, मार्जिनल कॉस्टिंग, टॉप लाइन व बॉटम लाइन, लीव्हरेज आदींसारखे किचकट वाटणारे विषयही सहजसोप्या शब्दांत रंजक पध्दतीने विशद केले आहेत.
त्यामुळे स्वत:चा व्यवसाय असलेले व्यावसायिक, छोटे-मोठे व्यापारी व उद्योजक, बँक अधिकारी, विद्यार्थी तसेच या विषयात रस असलेले जिज्ञासू अशा सर्वांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरेल, हे निश्चित!

”आज ना उद्या प्रत्येकाला हे नक्की पटेल की कोणताही
व्यवसाय यशस्वी होण्यासाठी बॅलन्स शीट आणि
वित्तव्यवस्थापन समजून घेणं महत्त्वाचं असतं.”
-अनिल लांबा



395.00 Add to cart

नावीन्यपूर्ण बदल घडवताना

११ भारतीय उद्योजकांनी अशक्य कोटीतल्या गोष्टी शक्य करून दाखवल्या… त्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रेरणादायी प्रवास…


पोरस मुंशी
अनुवाद : जॉन कॉलोसो


दुसर्‍यांच्या उत्पादनाची हुबेहूब नक्कल करणं किंवा त्यात थोडे बदल करणं अशा मानसिकतेतून भारतीय उद्योजक आता बाहेर पडले आहेत. स्वत:ची नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणणार्‍या भारतीय उद्योजकांचा उद्योग-क्षितिजावर उदय होऊ लागला आहे. इतकंच नव्हे, तर जागतिक बाजारपेठा काबीज करण्यासाठी नावीन्यपूर्ण बदल घडवतानाही ते दिसत आहेत. भारतीय कंपन्या केवळ जागतिक मापदंडांची पूर्तता करत नाहीत, तर त्या आज स्वत:चे मापदंड निर्माण करू लागल्या आहेत. आज ‘इनोव्हेशन’ हा भारतीय उद्योगाचा परवलीचा शब्द ठरू पाहात आहे. अशक्य कोटीतील वाटाव्या अशा गोष्टी शक्य करून दाखवणार्‍या ११ भारतीय कंपन्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रवास या पुस्तकात तपशिलात दिला आहे. या उपक्रमांनी नावीन्यपूर्ण बदल घडवले आणि उद्योगजगतातील संदर्भ बदलून टाकले आहेत… त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख देणारे हे नावीन्यपूर्ण पुस्तक सर्वांना निश्चितच रोचक वाटेल, प्रेरणादायी वाटेल… ‘‘नावीन्यपूर्ण बदलांमागील वैचारिक प्रक्रिया या पुस्तकात अधोरेखित केली आहे हेच या पुस्तकाचं वेगळेपण आहे. लेखनपद्धतही अभिनव असल्यामुळे ते मनाला अधिक भिडतं. हे लिखाण प्रेरक असून या आगळ्या वाटा अनेकांना अनुकरणीय वाटतील.’’ – रतन टाटा


325.00 Add to cart
1 2