विद्या बाळ

महाराष्ट्रातल्या परिवर्तनशील चळवळींमध्ये, त्यातही खासकरून स्त्रीवादी चळवळींमध्ये विद्या बाळ यांचं योगदान भरीव आहे. त्यांनी किर्लोस्कर प्रकाशनाच्या 'स्त्री' या मासिकात 22 वर्षं काम केल्यानंतर ऑगस्ट 1989 मध्ये 'मिळून साऱ्याजणी’ या मासिकाची सुरुवात केली. नंतर मिळून साऱ्याजणी हे केवळ मासिक न राहता ती एक चळवळ झाली आणि तिचा विस्तार शहरं-निमंशहरं आणि गावं असा झाला. अनेक स्त्रिया या मासिकाशी जोडल्या गेल्या, तसंच लिहित्या झाल्या. त्यांना लिहितं करण्यात विद्याताईंचा मोलाचा वाटा होता.
1982 साली त्यांनी 'नारी समता मंचा’ची स्थापन केली. स्त्रियांवरील अन्यायाविरोधात काम करणाऱ्या या संघटनेत आरंभापासून पुरुषांचाही सहभाग होता. शहर तसंच गाव पातळीवर कार्यशाळा, परिषदा आयोजित करून प्रबोधन करणं व प्रशिक्षण देणं असं भरीव काम या मंचाने केलं. यासोबतच इच्छामरण या महत्वाच्या विषयावर गेली काही वर्षं एका गटासोबत जनजागरणाचे उपक्रम विद्याताईंनी केले होते. त्यांनी संपादित केलेली तसंच त्यांच्या स्फुट लेखनाची पुस्तकं प्रकाशित असून त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा (यु.एस.ए.) समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार, तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार यांसारखे अनेक मानसन्मान प्राप्त झाले.

लेखकाची पुस्तकं

No products were found matching your selection.