वैजयंती केळकर

अनेक वर्षं सातत्याने लिखाण केलं असून वैजयंती यांची विविध विषयांवरील २४ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांद्वारे त्यांनी आपले नवरात्र, आपली मंगळागौर, भोंडल्याची गाणी, असे करा साठवणीचे पदार्थ, पावाच्या विविध पाककृती, सूप-सरबते, सण वर्षाचे व त्यांची पक्वान्ने, पोळ्या, पराठे, विविध भाज्या, दमफूल बिर्याणी, कडधान्याचे विविध प्रकार, २०० प्रकारची लोणची, विविध वड्या, लाडू, मसाले, चटण्या, सॉस, लज्जतदार मसाले, वरीपासून खिरीपर्यंत, पौष्टिक पालेभाज्या, या विषयांसंबधी लेखन केलं आहे. ‘कलातरंग’, ‘अस्ताई’ हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी टीव्ही व आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम केले असून त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

लेखकाची पुस्तकं

असे करा साठवणीचे पदार्थ


[taxonomy_list name=”product_author” include=”491″]


नेहमीच लागणारे आणि प्रत्येक घरात असायला हवेत असे हे पदार्थ. या पुस्तकात विविध लोणची, पापड, कुरडया, सांडगे, चिकवडया इ. वाळवणं मुरांबा, जॅम, जेली इ. अशा सर्व पदार्थांच्या पाककृती तर आहेतच परंतु या सर्व प्रकारांची भरपूर विविधता आहे आणि नावीन्यही आहे. पैशाची बचत, नावीन्य, विविधता, लज्जत आणि घरगुतीपणा सर्व काही साधणारे असे हे पुस्तक प्रत्येक घराच्या ‘संग्रहात’ असावे!


45.00 Read more

आपली मंगळागौर

पूजा, खेळ, आरत्या


[taxonomy_list name=”product_author” include=”491″]


मंगळागौरीचे खेळ, त्यातील गाणी, काव्ये हा एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवाच आहे. हा ठेवा जतन व्हावा, नव्या पिढीला, परदेशस्थांना मंगळागौर अधिक विविधतेने साजरी करता यावी या दृष्टीने सौ. वैजयंती केळकर यांनी मोठया कसोशीने आणि काटेकोरपणे सर्व माहिती संग्रहीत केली आहे. मंगळागौरीचे सामाजिक महत्त्व, पूजेची तयारी, व्रतकथा, पूजा, आरत्या आणि प्रामुख्याने अनेकविध खेळ,असंख्य पारंपरिक गाणी, उखाणे… अर्थात् मराठी संस्कृतीचा एक जतनशील ठेवा आपल्यासाठी- ‘आपली मंगळागौर’ या पुस्तकाच्या स्वरूपात!



75.00 Add to cart

गाणी भोंडल्याची


वैजयंती केळकर


भोंडला, हादगा, भुलाबाई हे पोरीबाळींचे खेळण्याचे उत्सवातील प्रकार आहेत. त्याची गाणी ही वरवर अर्थहीन वाटतात. परंतु तसे नाही. त्यामध्ये खोल अर्थ आहे. समाज, संस्कृती यांचे त्यामध्ये प्रतिबिंब पडलेले बघायला मिळते. नवरात्रामध्ये रोज भोंडला होतो. हस्तनक्षत्र असल्याने पाटावर हत्तीचे चित्र काढतात. १०-१५ मुली एकत्र येऊन हातात हात धरून पाटाभोवती फेर धरतात. ”ऐलोमा पैलोमा गणेश देवा” ह्या गाण्याने ह्यांची सुरुवात होते. ”माझा भोंडला संपला किंवा करा हादग्याची बोळवण” या गाण्याने भोंडल्याची सांगता होते. अशी सर्व गाणी आजच्या पिढीला कळावीत आणि म्हणता यावीत यासाठीच हे पुस्तक! वऱ्हाडात जेव्हा भुलाबाईची पूजा बांधली जाते तेव्हा महाराष्ट्रात हादग्याची पूजा केली जाते. हादग्याची परंपरा कृषी परंपरेतून आली आहे तर भुलाबाईची सृजनशीलतेतून. हादगा व भुलाबाईची पारंपरिक गाणीही या पुस्तकात वाचायला मिळतील.


30.00 Add to cart

पावाच्या विविध पाककृती


[taxonomy_list name=”product_author” include=”491″]


केटरिंग कॉलेजचे कोर्सेस, पाककृती क्लासेस घेणे, स्पर्धात परीक्षकाची भूमिका आणि पाककृतींची विविध प्रकाशित पुस्तके यामुळे या पुस्तकाच्या लेखिका सौ. वैजयंती केळकर यांचा पाककृती क्षेत्रातील अधिकार लक्षात येतो. अंगभुत गुण व कृतीशील स्वभाव यामुळेच त्यांना ‘श्रीमती महाराष्ट्र’ हा पुरस्कारही नुकताच प्राप्त झाला आहे. या पुस्तकात त्यांनी पावाच्या पाककृतींची भरपूर विविधता दिली आहे.
० सँडविचेस
० ब्रेड रोल्स
० टोस्टस्
० पिझ्झा-बर्गर
० गोड पदार्थ
० ब्रेड वापरून केलेले पदार्थ…
…अशा सर्व पदार्थांबरोबरच ज्या पदार्थांची रंगत पावाबरोबर खाल्ल्याने वाढते अशा पदार्थांच्या पाककृतींचा समावेशही या पुस्तकात केला आहे.
थोडक्यात सांगायचे तर पावाची रंगत वाढविणारे खास नव्या पिढीसाठी हे एक परिपूर्ण पुस्तक होय!


35.00 Add to cart

रुचकर गोड पदार्थ


[taxonomy_list name=”product_author” include=”491″]


या पुस्तकात विविध प्रकारच्या गोड पदार्थांची रेलचेल आहे. उकडीच्या मोदकापासून ट्रायफल पुडिंगपर्यंत, गुलाबजामपासून बंगाली रसगुल्ल्यापर्यंत, बर्फीपासून पुरणपोळीपर्यंत आणि जिलेबीपासून बुंदीच्या लाडवापर्यंत विविध पद्धतीच्या गोड पदार्थांच्या पाककृती यात दिल्या आहेत.
या पुस्तकाचे मुख्य. वैशिष्टय म्हणजे पेढे, बर्फी व हालवे यांच्या विश्‍वसनीय पाककृती! आपण हे पदार्थ घरच्याघरी अगदी सफाईने करू शकाल.


25.00 Add to cart

लज्जतदार मसाले, चटण्या व सॉस


[taxonomy_list name=”product_author” include=”491″]


मसाले पदार्थांना चव देतात तर चटण्या सॉस पदार्थांची लज्जत वाढवितात. या पुस्तकात या सर्वांची भरपूर विविधता आहे. उदा.:
मसाले
० स्पेशल गरम ० संडे ० चाट ० पावभाजी ० सामोसा ० चिकन रोस्ट
चटण्या
० टोमॅटो-नारळ ० पुदिना ० वर्‍हाडी रंजका ० कढीलिंबाची
सॉस
० व्हाइट ० शेजवान ० गार्लिक ० मेयॉनीज ० सॅलेड ड्रेसिंग्ज इ. अनेक आधुनिक प्रकार


35.00 Add to cart