उल्का राऊत

"पत्रकारितेचा अभ्यासक्रम करताना, त्यात 'अनुवाद' हा विषय शिकताना आपल्याला अनुवाद बऱ्यापैकी जमतो असं उल्का राऊत यांना वाटलं. त्यानंतर त्यांनी काही कथा अनुवाद करून पाहिल्या. 'रोहन प्रकाशन'ने प्रकाशित केलेलं 'ऋतुशैशव' (आमचं बालपण) हे त्यांचं पहिलं अनुवादित पुस्तक होय. त्यानंतर राऊत यांनी अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले आणि ते गाजलेदेखील.
त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड असून त्या शास्त्रीय संगीताच्या मैफलींना आवर्जून जातात. तसंच चित्रप्रदर्शनंदेखील पाहतात. कविता करणं हा त्यांचा छंद आहे. आवडलेल्या इंग्रजी पुस्तकांचा मराठी वाचकांसाठी अनुवाद करणं हा त्यांच्या आनंदाचा भाग आहे.

लेखकाची पुस्तकं

अनफर्गेटेबल जगजित सिंग

गझल गायकीच्या दुनियेतील तरल स्वर


[taxonomy_list name=”product_author” include=”499″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”562″]


जगजित म्हटलं की, कानात आवाज घुमतात गझलांचे…मनाचा ठाव घेणाऱ्या, मन शांत करून जाणाऱ्या आवाजातल्या अनेक गझला ! नेमक्या भावना व्यक्त करत, काही अनपेक्षित सुरावटी गात, कधी पाश्चात्त्य वाद्यांचा आधार घेत जगजितने गझल गायकीचा चेहरामोहराच बदलून टाकला.
सत्या सरन यांनी लिहिलेल्या जगजितच्या या चरित्रात त्याचा विद्यार्थीदशेपासूनचा, स्ट्रगलर ते लोकप्रिय गायक असा प्रवास उल्का राऊत यांनी मराठीत रसाळपणे उलगडला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने जगजित मैफिलीचं वातावरण भारून टाकत असे. रसिकांच्या डोळ्यांतून अश्रुधारा बरसवणारा जगजित एखादा चुटकुला सांगून त्याच मैफलीत रसिकांना हसायलाही भाग पाडत असे. जगजितचे असे अनेक पैलू या पुस्तकात विविध प्रसंगांतून खुलून येतात. नियतीने जगजित-चित्राला अनेक बरे-वाईट रंग दाखवले. ते दोघं कधी या नियतीला गायनाचा, आध्यात्माचा आधार घेत धिरोदात्तपणे सामोरे गेले, तर कधी कोलमडून गेले.
एक मित्र, मुलगा, वडील, गायक, चित्राचा साथी, नवगायकांसाठी मसीहा अशा अनेक भूमिकांमधून पुस्तकात भेटत जाणारा…अन्फर्गेटेबल जगजित सिंग.


270.00 Add to cart

मदुराई ते उझबेकिस्तान

१० ठिकाणांचे हटके अनुभवकथन


[taxonomy_list name=”product_author” include=”585″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”562″]


‘कन्डक्टेड टुर्स’मधून प्रवास करणं म्हणजे भोज्जास हात लावून येणं…असा एक सर्वसाधारण समज ! या पुस्तकाचा लेखक
श्रीनाथ पेरुर याने अशा प्रकारच्या टुर्सचं अंतरंग समजून घेण्यासाठी देश-विदेशातल्या विविध छटा असणाऱ्या १० ठिकाणांची भ्रमंती केली. वेगळा दृष्टीकोन ठेवल्यामुळे लेखक त्या भ्रमंतीत अनपेक्षितपणे रमला. त्याच भ्रमंतीचं नवी दृष्टी देणारं, हे खुसखुशीतपणे रंगवलेलं अनुभवकथन वाचायलाच हवं!
या भ्रमंतीतील काही ठिकाणं अगदी नेहमीचीच होती तर काही वेगळ्या वाटेवरची ! अशा या वैविध्यपूर्ण ठिकाणांमध्ये दक्षिण भारतातली मंदिरं, सात दिवसात आटोपलेली युरोप टूर, कबीर संगीत गाणाऱ्या कलाकारांसोबतची यात्रा, थरच्या वाळवंटातील उंटावरची थरारक राइड, हजारो भाविकांसोबत अनुभवलेली वारी, उझबेकिस्तानमधील सेक्स टुरिझमचा बाजार अशा हटके ठिकाणांचा समावेश आहे.
साहस, वासना, कुतूहल आणि अगदी ईश्वरभक्तीपर्यंतचा अनुभव कधी उपरोधिक, तर कधी खट्याळ शैलीत वाचायला मिळतो. लेखकाच्या निरिक्षणक्षमतेमुळे हे सगळे अनुभव आपल्यापर्यंत जिवंतपणे पोहोचतात.
‘कन्डक्टेड टुर्स’ची वेगळी अनुभूती देणारं, थोडं अंतर्मुख करणारं प्रवासवर्णन… अर्थात ‘मदुराई ते उझबेकिस्तान !’



240.00 Add to cart

आमचं बालपण


[taxonomy_list name=”product_author” include=”561″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”562″]


बालपणीच्या नीलरंगी विश्वामध्ये पुन्हा एकदा रमून गेलेल्या आर.के.लक्ष्मण यांना भुताच्या गोष्टी सांगून त्यांची भंबेरी उडवणारा माळीबुवा आठवतोय. तर एम.एस.सुब्बलक्ष्मींच्या आठवणींना चिंच, मिरच्या आणि मीठ कुटून त्याच्या छोटयाछोटया गोळ्यांना काडया खुपसून बनवलेल्या कँडीची आंबटगोड चव आहे. या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत. केलुचरण महापात्रांनी नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली तीच मुळी मुलीच्या वेषामध्ये, तर हुसेननी आपली चित्रकारी प्रथम आजमावली ती सिनेमाच्या पोस्टरवर! तेंडुलकरांचे शिक्षकच वर्गात आपण पाहिलेल्या चित्रपटांच्या गोष्टी रंगवून सांगत, अमजद अली खान सरोदवर चित्रपटगीतं वाजवून आपल्या वर्गमित्रांना खूष करत. या विख्यात कलाकारांच्या बालपणीची वर्णनं वाचून तुमच्या देखील मनात विचार आल्याशिवाय राहणार नाही, ‘‘अरे, मीही ह्या सर्वांपेक्षा फारसा वेगळा नाही. कदाचित मलादेखील जमेल की…’’



125.00 Add to cart

थोरा-मोठ्यांचं बालपण संच

३ पुस्तकांचा संच


[taxonomy_list name=”product_author” include=”510,562,378″]


आपण भविष्यात कोण होऊ, काय करू

याची बीजं बरेचदा आपल्या बालपणातल्या,

अत्यंत संवेदनशील मनावर रुजलेली असतात.

मोठ्या व्यक्तीच्या बालपणाची रंजक पद्धतीने

ओळख करून देऊन, प्रेरणा देणारा…

३ पुस्तकांचा संच

कलामांचं बालपण

अभ्यासावरचं कलामांचं प्रेम, शिक्षकांविषयी असलेला आदर,

आई-वडलांविषयी असलेला जिव्हाळा, जिज्ञासूवृत्ती,

कष्टाळूवृत्ती, ध्यास आणि आध्यात्मिक प्रवृत्ती…

एका तपस्वी संशोधकाच्या अनुभवांचं विश्व

बालपणीच्या किश्श्यांमधून उलगडून दाखवणारं पुस्तक…

थोरांचं बालपण

या पुस्तकात राजकारण, विज्ञान, पर्यावरण, कला, साहित्य,

समाजसेवा, अध्यात्म व क्रीडा या विविध क्षेत्रांतील;

४० व्यक्तिमत्त्वांचं बालपण त्यांच्या लहानपणचे प्रभाव

टाकणारे काही प्रसंग, काही आठवणी देत चितारलं आहे.

आमचं बालपण

या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील

आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात

विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण

झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत.



325.00 Add to cart

MBA @ वय वर्ष 16

शाळा व कॉलेजच्या दिवसांपासूनच व्यवस्थापन व व्यवसायाचे बाळकडू


[taxonomy_list name=”product_author” include=”506″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”562″]


सकाळी उठल्यापासून रात्री निर्धास्तपणे झोपेपर्यंत आपण जे काही केलं त्यात किती उद्योग-व्यवसाय इनव्हॉल्व्हड् होते याची मनीषाला जराही कल्पना नव्हती. विविध व्यवसायांच्या कार्यक्षम अस्तित्त्वाविषयी तिला जराही देणं-घेणं नव्हतं आणि अचानक एक दिवस शाळेत एक अभिनव उपक्रम राबवला गेला…हा उपक्रम होता वेगवेगळे व्यवसाय कसे चालतात हे जाणून घेण्याचा व विविध उद्योजकांची माहिती गोळा करण्याविषयीचा!
या उपक्रमानंतर मनीषासारख्या ३१ मुला-मुलींचं जीवनच बदलून गेलं…अनेक उद्योजक या विद्यार्थ्यांचे हिरो बनले.
आजच्या या जनरेशनपुढे नोकरी-व्यवसायाचे अनेक पर्याय खुले आहेत. पण पौगंडावस्थेतल्या या मुलांना व्यवसायजगत् म्हणजे नक्की काय हे माहीत असतं का? आपलं करिअर ठरवताना युवकांना व्यावसायिक जगाबद्दल उत्सुकता वाटावी, त्यांचं कुतूहल जागं व्हावं यादृष्टीने सुब्रोतो बागची यांनी या पुस्तकाद्वारे हा एक आगळा प्रयोग केला आहे.
बोजड पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा मुलांना आवडेल, रुचेल अशा भाषेत उद्योगविश्वाची, प्रसिध्द उद्योजकांची व व्यवसायातील विविध संज्ञा-संकल्पनांची ओळख हसत्याखेळत्या वातावरणात करून देणारं पुस्तक…


125.00 Add to cart

मैत्री व्यावसायिकतेशी

‘प्रोफेशनल’ वृत्ती जोपासून विकास साधण्यासाठी अनुभवाचे बोल


[taxonomy_list name=”product_author” include=”506″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”562″]


सुप्रसिद्ध व्यावसायिक व MindTree या यशस्वी कंपनीचे प्रवर्तक सुब्रोतो बागची यांच्या गाजलेल्या ‘The PROFESSIONAL’ या पुस्तकाची मराठी आवृत्ती म्हणजे ‘मैत्री व्यावसायिकतेशी’! सुब्रोतो बागची यांच्या अंतर्मनाचा आविष्कार आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांवर आधारित त्यांचे विचार या पुस्तकात अंतर्भूत आहेत. केवळ व्यवसाय करणे आणि तो व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून करणे यात फरक आहे. यशस्वी होण्याच्या वृत्तीबरोबरच व्यावसायिक वृत्ती अंगी बाणावी लागते. व्यावसायिकता म्हणजे त्यात विशिष्ट पद्धती रूढ करणं आलं, सचोटी आली, भविष्याचा वेध घेणं आलं आणि त्यात विकास साधणंही आलं. तसंच उत्तम नियोजन करणं आणि कामाची शिस्त पाळणंही आलं. त्याचप्रमाणे काही मूल्य जोपासणही आलं. व्यावसायिकता म्हणजे केवळ प्रचंड नफा मिळवणं नव्हे, तर उच्च नीतिमूल्यांची जोपासना करून उत्तम नियोजनातून तो मिळविणं. सुब्रोतो बागची या पुस्तकात व्यावसायिकता कशी जोपासावी, हे कधी सूचकपणे तर कधी अनुभवांच्या आधारे सांगतात. सर्व व्यावसायिकांना, उद्योजकांना किंवा तो करू इच्छिणार्‍यांना, तसेच महत्त्वाकांक्षी नोकरदारांनाही हे पुस्तक मौलिक मार्गदर्शन करणारं ठरेल.


250.00 Add to cart

आर.के. नारायण संच

४ पुस्तकांचा सप्रेमभेट संच


[taxonomy_list name=”product_author” include=”354″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”518″]


‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.

अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.

संचात असलेली ४ पुस्तकं :

१. द इंग्लिश टीचर

२. द बॅचलर ऑफ आर्टस

३. मालगुडीचा नरभक्षक

४. महात्म्याच्या प्रतीक्षेत…


855.00 Add to cart

गाइड


आर. के. नारायण
अनुवाद : उल्का राउत 


आर. के. नारायण हे जगभरात मान्यताप्राप्त असे इंग्रजी साहित्यिक.
त्यांच्या ‘द गाइड’ या इंग्रजी कादंबरीला १९६०मध्ये ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला आणि एक श्रेष्ठ पौर्वात्य साहित्यकृती म्हणून ती जगभर बहुचर्चित ठरली. १९६५मध्ये याच कादंबरीवर आधारित विजय आनंद दिग्दर्शित ‘गाइड’ हा कलात्मक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कादंबरीचा व्यापक आशय व त्यातील राजू गाइड, नृत्यांगना रोझी, तिचा पती मार्को आदी या मातीतल्या व्यक्तिरेखा सर्वतोमुखी झाल्या.
आज पाच दशकं उलटून गेली तरी अनेक प्रश्न चर्चेत राहिले.
एका सामान्य भोगवादी राजू गाइडचं आध्यात्मिक ‘स्वामी’मध्ये रूपांतर होऊ शकतं?
एका कलासक्त विवाहित स्त्रीने पतीला सोडून नृत्यकलेचा ध्यास घेणं, राजूसारख्या परपुरुषासोबत राहणं नैतिकतेच्या चौकटीत बसतं?
मूळ कथेत व चित्रपट कथेत काय फरक होता? तो योग्य होता का?
यांसारख्या अनेक प्रश्नांचा उलगडा ही कादंबरी वाचल्याशिवाय होणं अशक्यच.
सर्जनशीलतेचा ध्यास, ज्ञान-संशोधनाचा ध्यास, भोगवाद व अध्यात्म अशा अनेक गोष्टींचं एकात्म चिंतन करायला लावणार्‍या मूळ इंग्रजी कादंबरीचा उल्का राऊत यांनी सिध्द केलेला हा अनुवाद. कल्पनारम्यता आणि अध्यात्म यांचा अभूतपूर्व मेळ घालणारी, अत्यंत रोचक व तत्त्वज्ञानात्मक डूब असलेली ही कादंबरी मराठी वाचकांसाठी आजही एक आगळी आनंदपर्वणी ठरते- गाइड!


200.00 Read more

द इंग्लिश टीचर


[taxonomy_list name=”product_author” include=”354″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”562″]


‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.

अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.

व्यवसायाने शिक्षक असणार्‍या एका शिक्षकाची आणि त्याच्या पत्‍नीची ही खूप सुंदर व गूढगम्य प्रेमकथा आहे. हलक्याफुलक्या आणि विनोदी शैलीत कथेची सुरुवात होते आणि अचानक कथेमध्ये एक अनपेक्षित वळण येते. ‘मृत्यू’ या संकल्पनेचा काहीशा विनोदी पद्धतीने आणि त्याचवेळी प्रगल्भपणे विचार करायला लावणारे अनेक किस्से लेखकाने या पुस्तकात रेखाटले आहेत. पत्‍नी-पत्‍नीमधील प्रेमळ सहजीवन, या नात्यामधील नाजूक गुंतागुंत आणि मृत्यू-जीवन यामधील सीमारेषा गडद करणारा शेवट वाचकांच्या हृदयाचा ठाव घेईल…


260.00 Add to cart