हृषीकेश पाळंदे

हृषीकेश पाळंदे याचा जन्म १९८५ सालचा. तो पुण्यातच शिकला आणि वाढला. आर्किटेक्चरची डिग्री अर्धवट सोडून त्याने बी.एस्सी. स्टॅटिस्टिक्स केलं. त्यानंतर एम.एस्सी व डिप्लोमा इन जर्नालिझम हे दोन्ही कोर्सेसही त्याने अर्धवट सोडून दिले. त्यानंतर कुठलीच नोकरी नीट केली नाही. अर्धवट सोडणं, हे त्याचं लक्षण बनलं. 'काय करणारेस तू पुढे?' या प्रश्नाला कंटाळून कुटुंब आणि पुण्याला सोडून २०११ साली अहमदाबाद ते जम्मू असा १९०० किमीचा एकांडा सायकलप्रवास त्याने केला. या सफरीत त्याला स्वत:बद्दल आणि आयुष्याबद्दल अनेक इंटरेस्टिंग प्रश्न पडले. तो डोक्यातला गुंता त्याने 'दोन चाकं आणि मी' या प्रवासवर्णनपर पुस्तकातून लिहिला. डोक्यातल्या प्रश्नांच्या चक्राला वाहिलेल्या 'बयो' आणि 'भरकटेश्वर' या दोन कादंबऱ्याही लिहिल्या. त्यानं अजूनतरी लिखाणाला सोडलं नाहीये. सध्या तो कोकणात राहतोय. चंगळवादाची झापडं लावून बसलेल्या जगात तो मिनिमलिस्ट जीवनशैलीनी जगू बघतोय . बुद्धाने सांगितलेल्या मध्यमार्गावर सध्या तो बरंच काही वाचतोय, त्यावर उलटसुलट विचार करतोय.

लेखकाची पुस्तकं

Featured

लव्ह इन द टाइम ऑफ करोना

कथा प्रेमाच्या… कथा ओढीच्या…


गणेश मतकरी, नीरजा,श्रीकांत बोजेवार, प्रवीण धोपट, मनस्विनी लता रवींद्र, प्रणव सखदेव, परेश ज. म., हृषीकेश पाळंदे


एका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं… Standstill!
या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल?


250.00 Add to cart

झुरांगलिंग


हृषीकेश पाळंदे


टडंगऽऽऽ टडंगऽऽऽ

मी आहे एक लेखकदेव…

एकदा काय झालं, पुण्यनगरीतल्या त्याच त्या रूटीनला वैतागून मी दूर हिमालयाच्या मुख्य रांगेच्याही पलीकडच्या रम्य प्रदेशात गेलो. हा लदाखी प्रदेश रूक्ष, बोडक्या मातकट पर्वतांचा. हिवाळ्यात तयार होणाऱ्या शुभ्र हिमगालिच्यांचा, खळाळ वाहणाऱ्या नद्यांचा, दरीतल्या हिरवाईचा, डोक्यावर असणाऱ्या गर्द निळ्याभोर आभाळाचा आणि त्याखाली ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाचा! तिथे मी खूप दिवस मुक्काम ठोकला. सामान्य टुरिस्ट म्हणून गेलो नसल्याने मनसोक्त भटकत असतांना मी एक गोष्ट ऐकली. मग झालं काय की, त्या गोष्टीतल्या घटनांच्या प्रवाहाचा माग काढता काढता त्यात अनेक प्रवाह मिसळत गेले. म्हणजे अनिता-लोब्झांग, झुरांग-निस्सू, मेमेले…अशा जिवंत माणसांचा, अवलोकितेश्वर-तारादेवी या देवांचा आणि लिंग केसरसारख्या आख्यायिकांचाही! या प्रवाहात मी पाहिलेलं, न पाहिलेलं, माझ्या डोक्यातलं, मनातलं..असं सगळंच वाहत वाहत आलं. थोडक्यात काय तर, या लेखकदेवानी एक गोष्टच विणून टाकली वाचकदेवासाठी… अस्तित्वातल्या आणि नास्तित्वातल्या घटनांची… झुरांगलिंग !


300.00 Add to cart