हृषीकेश गुप्ते

शिक्षणाने आणि व्यवसायाने केमिकल इंजिनिअर असलेले हृषीकेश गुप्ते हे मराठी साहित्यातले आजचे आघाडीचे तरुण सर्जनशील लेखक आहेत. रायगड जिल्ह्यातील नागोठणे या गावी त्यांच्या जन्म झाला आणि शिक्षणही तिथेच झाले. 2000 सालापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि 2008 सालापासून त्यांचं लेखन विविध नियकालिकांमधून प्रसिद्ध झालं. मनातली भीतीची आदिम भावना, माणसाच्या लैंगिक प्रेरणा, त्याच्या भावभावनांची उलघाल ही त्यांच्या लेखनाची मुख्य आशयसूत्रं होतं. गूढ-अद्भुतता, चित्रमय, प्रासादिक व ओघवती भाषा या लेखनवैशिष्ट्यांमुळे त्यांचं लेखन खिळवून ठेवतं.
'दंशकाल’, 'चौरंग' या कादंबऱ्या, 'काळजुगारी’, 'हाकामारी' या लघुकादंबऱ्या आणि 'अंधारवारी’, ‘दैत्यालय’, 'घनगर्द’, 'परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष' हे कथासंग्रह अशी त्यांची एकूण साहित्यसंपदा प्रकाशित आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी 'दिल, दिमाग और बत्ती’ या चित्रपटाचं आणि 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ या स्वलिखित कथेवर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे.

लेखकाची पुस्तकं

गोठण्यातल्या गोष्टी

[taxonomy_list name=”product_author” include=”515″]


गोष्टी सांगण्यापूर्वी…

‘….प्रत्येक गावात काही आख्यायिका आणि दंतकथा असतात . एक लेखक म्हणून या आख्यायिका मला भुरळ पाडतात . कोणताही लेखक त्याच्या कानावर पडलेल्या आख्यायिका निव्वळ कपोलकल्पित प्रदेशात राहू देत नाही . कधी चिमूटभर आशयाच्या सूतावरून कल्पनेचा स्वर्ग गाठत , तर कधी आशयाच्या स्वर्गात कल्पनेचं सूत कातत या आख्यायिकांना लेखक कागदावर उतरवत राहतो . कधी कल्पनेतल्या माणसांना तो खरेखुरे सदरे चढवतो . तर कधी खऱ्या मानवी स्वभावांना लेखक कल्पित नियती देतो . नाव , गाव , देश , वेष बदलत ही माणसं , या आख्यायिका मग सर्वदूर पसरत जातात आणि चिरायू होतात . ” गोठण्यातल्या गोष्टी’तली ही माणसं खरी असली नसली तरीही जन्मापासून ही माणसं माझ्यासोबत आहेत . या माणसांना आदि – अंत नाही.

म्हणूनच ही माणसं स्वयंभू आणि चिरायू आहेत …..’



 

360.00 Add to cart

घनगर्द


[taxonomy_list name=”product_author” include=”515″]


हृषीकेशच्या सगळ्या कथांमधून आरपार जाणारं एक सूत्र आहे.

ते म्हणजे त्यात दिसणारी कल्पनाशिलता.

त्याच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी

मुठीतल्या काजव्यासारखी लुकलुकणारी एखादी कल्पना असते.

हृषीकेश त्या कल्पनेच्या सगळ्या शक्यतांचा शोध घेत जातो.

तिचे सगळे कोपरे धुंडाळतो.

महत्वाचं म्हणजे, तो या प्रक्रियेचा आनंद घेतो.

म्हणूनच त्याच्या कथांमध्ये

एक चैतन्य सळसळताना जाणवतं.

‘घनगर्द’ या कथांसंग्रहामधून

हृषीकेशच्या कथेने एक उंबरठा ओलांडला आहे.

ती आता अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होते आहे

भय आणि अदभूताचा मार्ग तिने सोडलेला नाही.

मात्र त्या मार्गाला आता अनेक नव्या वाटा फुटलेल्या आहेत.

त्या नेमक्या कुठे जाणार हे कोणीही सांगू शकणार नाही.

पण हा प्रवास दीर्घ आणि रोमहर्षक असेल.

याची खात्री ‘घनगर्द’ वाचल्यावर पटते, हे महत्वाचं.

– निखिलेश चित्रे (प्रस्तावनेतून)



300.00 Add to cart

काळजुगारी


[taxonomy_list name=”product_author” include=”515″]


काली स्वतःला आरशात पाहतो. कपाळाच्या मधोमध त्याला दिसतो जोकर! मरण्याआधी त्याच्या बाबानेच हा जोकर त्याच्या कपाळावर गोंदून जणू काही त्याच्या नशिबाचा रस्ता आखून ठेवलेला… आणि हा रस्ता जात होता कित्येक वर्षांनी होणा‍ऱ्या काळजुगारी स्पर्धेत!

जगाची व्यवस्था बदलण्याची संधी असलेल्या कालीचं नशीब या स्पर्धेत उजळेल की त्याच्या बाबासारखाच तोही नुसताच परत येईल?

मराठी साहित्यातील रूपककथांच्या दालनात मोलाची भर घालणारी लघुकादंबरी – काळजुगारी!


120.00 Read more

परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष


[taxonomy_list name=”product_author” include=”515″]


‘मनापासून पतंग उडवणा‍ऱ्या’वर

‘परफेक्ट बाई’चं प्रेम आहे खरं,

पण ती त्याच्यासोबत जाईल की

तिची सव्वीसावी गोष्ट अधुरीच राहील?

समस्त स्त्रीजातीला समाधान देईल

असा तीळ त्याला जन्मजात लाभला असला

तरी वास्तवात खरोखरीच

तिळा दार उघडचा मंत्र कामी येईल?

पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करणा‍ऱ्या दोन अनवट दीर्घकथा!


120.00 Add to cart

हाकामारी


[taxonomy_list name=”product_author” include=”515″]


ती तीनदा हाका मारते

आणि जो ओ देईल त्याला घेऊन निघून जाते!

हो, खरंच हाकामारी असते! खरंच असते!

त्या काळ्याकुट्ट रात्री…

त्याला हाक मारणारी नक्की कोण होती?

संध्या? निशा? की आणखी कोणी?

नेमकं काय घडलं होतं त्या रात्री?

या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधता येतील?

की आयुष्यभर ते त्याला टोकरत राहतील?

गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी – हाकामारी!


120.00 Read more