रचना बिश्त-रावत

लेखिका रचना बिश्त - रावत या मुक्त पत्रकार आहेत . प्रवास करणं हा त्यांचा छंद आहे . अनेक ठिकाणांच्या सफरी त्यांनी केल्या आहेत . २००५ साली त्यांना हॅरी ब्रिटन फेलोशिप मिळाली . तर २००६ सालच्या कॉमनवेल्थ प्रेस क्वार्टीज रोल्सराईज पारितोषिकासाठी त्यांची निवड करण्यात आली . त्या प्रथितयश कथालेखिकाही आहेत . त्यांच्या ' मुन्नी - मौसी या पहिल्याच कथेला २००८-२००९ मध्ये राष्ट्रकुल लघुकथा स्पर्धेचा पुरस्कार मिळाला . त्यांचे पती लष्करात आहेत . ' द ब्रेव्ह ' हे त्यांचं पहिलंच पुस्तक आहे .

लेखकाची पुस्तकं

परमवीर-गाथा

सर्वोच्च लष्करी सन्मानप्राप्त शूरांच्या परमवीर-गाथा


[taxonomy_list name=”product_author” include=”582″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”430″]


परमवीर चक्र या सर्वोच्च लष्करी सन्मानाने गौरवण्यात आलेल्या २१ शूरवीरांच्या पराक्रमाची ही आहे परमवीर-गाथा !
कधी २०००० फूट उंचीवर दुर्गम भागात लढलेलं प्रत्यक्ष युद्ध असो, तर कधी शून्यापेक्षा कमी तापमानात शत्रुच्या कारवाईला दिलेलं सडेतोड उत्तर असो, कधी कुशल डावपेच आखून प्राण पणाला लावून जिंकलेली बाजी असो…या २१ वीरांनी भारताची सुरक्षा हेच जीवनाचं ध्येय मानलं.आई-वडील, पत्नी, मुलं, भावंडं या नात्यांपेक्षाही देशनिष्ठा त्यांनी महत्त्वाची मानली. ज्या युद्धांत अथवा चकमकीत दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्राने सन्मानित केलं गेलं त्या लढतींचं पुस्तकात केलेलं जिवंत चित्रण वाचून प्रत्यक्ष लढाईच आपल्या डोळ्यांसमोर उभी राहील.
या वीरांचे सहकारी, अधिकारी, कुटुंबीय यांच्याशी थेट संवाद साधून परमवीरचक्र मानकर्‍यांचं नेमकं योगदान काय आहे, हे सांगणार्‍या या कथा लष्कराच्या कार्यपद्धतीचीसुद्धा ओळख करून देतात.
कुशल लष्करी डावपेच आणि अपरिमित शौर्य यांची ही आहे…परमवीर-गाथा!



250.00 Add to cart