पद्मजा फाटक (मजेत)

नागपूर इथे 14 नोव्हेंबर 1943 साली पद्मजा फाटक यांचा जन्म झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली, तर पदव्युत्तर शिक्षण सोशॉलॉजीतून पूर्ण केलं. त्या मुंबईत आकाशवाणी व दूरदर्शन क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी दूरदर्शनवरील विविध कार्यक्रमांचं संचालन केलं. लेखनानिमित्ताने त्यांनी जपान व अमेरिकेचा प्रवास केला. मिश्कील, खुमासदार लेखनशैली हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. विविध मासिकं, वृत्तपत्रं यांमध्ये त्यांनी सातत्याने लेखन केलं. त्यांच्या साहित्याला राज्य पुरस्कारासारखी अनेक पारितोषिकंही मिळाली. 2014 साली त्यांचं निधन झालं.

लेखकाची पुस्तकं

रत्नांचं झाड


पद्मजा फाटक (मजेत)


ताराबाई मोडक यांच्या चरित्रलेखनापासून ते समाजशास्त्रीय, वैज्ञानिक संशोधनपर लेखनाकडून कथालेखन व अनुभवपर लेखन- अशी वळणं घेत पद्मजा फाटक (मजेत) यांच्या ‘रत्नांचं झाड’ या अनोख्या ललित संग्रहाकडे आपण पोहोचतो.
या संग्रहात एकूण चौदा लेखांची वीण अतिशय सुंदरपणे गुंफली आहे. हा संग्रह म्हणजे केवळ तरल भावना आणि शब्दसौंदर्याने नटलेल्या लेखांचा संग्रह नव्हे; तर यामधील प्रत्येक लेखात विषयविविधता, मार्मिक भाष्य, अभिजात व कसदार भाषाशैली, मधूनच डोकावणारी तल्लख विनोदबुध्दी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनाकडे बघण्याचा प्रगल्भ दृष्टिकोन अशा सर्वच गोष्टी अनुभवता येतात. त्यामुळे प्रत्येक लेखाचा विषय व धाटणी जरी वेगळी असली तरी त्यात दिलेले अनुभव, संवेदना आणि सहजपणे मांडलेला वैचारिक व चिंतनशील दृष्टिकोन हे या लिखाणाचे समान धागे ठरतात.
विविध रत्नांनी डवरलेलं हे झाड वाचकाला निश्चितच एक व्यापक जीवनानुभूती आणि एक वेगळं समाधान देईल!


200.00 Add to cart