मृदुला दाढे जोशी

पं. गजाननबुवा जोशी, पं. एस.के. अभ्यंकर, पं. मधुकर जोशी, डॉ. आशा पारसनीस जोशी यांच्याकडे प्रा. डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण झालं असून त्यांनी मानसशास्त्र या विषयात पदवी (विशेष प्रावीण्यासहित) प्राप्त केली आहे. त्यानंतर संगीत विषयात एम.ए. करून त्या विद्यापीठात प्रथम आल्या. त्यांनी ‘हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार’ या विषयात एस.एन.डी.टी. विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त केली असून हिंदी चित्रपट गीतांची वैशिष्ट्यं सांगत, त्यांतील बारकावे उलगडून दाखवत गायनाचे सादर केलेले वैशिष्ट्यपूर्ण असे हजारो जाहीर कार्यक्रम त्यांनी केले आहेत.
हिंदी चित्रपट गीतांवरचं त्यांचं लेखन केवळ गाण्याच्या चाली, शब्द एवढ्यापुरतं मर्यादित नसतं. तर त्यातलं ऑक्रेस्ट्रायझेशन, त्यातली वाद्यं, त्यांची वैशिष्ट्यं तसंच ते गाणं रचणाऱ्या संगीतकारांची वैशिष्ट्यं हे त्या नेमकेपणाने उलगडून सांगतात आणि त्याकडे पाहण्याचा एक सखोल दृष्टिकोन देतात. त्या संगीताबरोबरच विविध विषयावरील पुस्तकांचं वाचन करत असल्यामुळे त्याचे संदर्भ त्यांच्या लेखनात लीलया येतात. सध्या त्या मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत.

लेखकाची पुस्तकं

अफ़साना लिख रही हूँ

चित्रपट कथानक आणि गाणी यांच्यातील परस्पर मेळ उलगडणारे अफसाने


डॉ. मृदुला दाढे


एक जमाना होता जेव्हा हिंदी चित्रपटांत ‘गाणी’ हा एक अविभाज्य घटक असे. काही चित्रपटांतील काही गाणी तर कथानक पुढे नेण्याचा भार उचलत… कथानकाचा भागच जणू!
अशी गीतं रचताना, ती संगीतबद्ध करताना व ती चित्रित करताना त्यात कथेचं प्रतिबिंब पडेल असं पाहिलं जाई.
चित्रपटसंगीताच्या अभ्यासिका डॉ. मृदुला दाढे यांनी या पुस्तकात आपल्या भावविश्वात अढळपद मिळवलेल्या अशा १५ चित्रपटांची निवड केली आहे. त्या चित्रपटांच्या कथेला समर्थ जोड देणाऱ्या गीतांचं चित्रपटातलं स्थान, त्यांची सौंदर्यस्थळं, त्यांची सांगीतिक बलस्थानं डॉ. मृदुला यांनी पारखी नजरेने पुस्तकात उलगडून दाखवली आहेत. गीतकाराची तरलता, संगीतकाराची सर्जनशीलता अनेक ‘अफसाने’ या रसग्रहणात आढळत जातील. चित्रपट कथानक आणि गाणी यांच्यातील मेळ उलगडणारं…
अफ़साना लिख रही हूँ! 



260.00 Add to cart
Featured

रहें ना रहें हम

चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ बहाल करणा-या संगीतकारांची वैशिष्टयं आणि त्यांच्या अजरामर गाण्यातील सौंदर्यस्थळं…


[taxonomy_list name=”product_author” include=”426″]


हिंदी चित्रपटसृष्टीचा अर्थात चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ…

या कालखंडावर आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरणारे संगीतकार कोणते?
प्रत्येक संगीतकाराचा बाज वेगळा कसा? त्याची वैशिष्ट्यं कोणती?
त्यांची अजरामर गाणी कोणती?
त्या गाण्यांच्या चालींची, ऑर्केस्ट्रेशनची वैशिष्ट्यं कोणती?
त्यातील हरकतींचं, केलेल्या प्रयोगांचं महत्त्व काय?
त्यांतील कोणत्या जागा म्हणजे त्या गाण्यांची सौंदर्यस्थळं म्हणता येतील?
एकंदर सांगायचं तर, ही गाणी आपल्यावर
४०-५०-६० वर्षं कसं काय गारूड करू शकतात
हे नेमकेपणे सांगून, रसिकतेने केलेलं विश्लेषण म्हणजेच…
हिंदी चित्रपट संगीताच्या मर्मज्ञ
मृदुला दाढे-जोशी लिखित एक आस्वादात्मक पुस्तक
रहें ना रहें हम…



395.00 Add to cart